For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Maratha Reservation : बीडमध्ये आत्महत्येचं सत्र सुरुच, मराठा आरक्षणासाठी तरूणाने संपवलं आयुष्य

05:36 PM Oct 29, 2023 IST | प्रशांत गोमाणे
maratha reservation   बीडमध्ये आत्महत्येचं सत्र सुरुच  मराठा आरक्षणासाठी तरूणाने संपवलं आयुष्य
beed youth commit suicide for maratha reservation manoj jarange patil agitation antarawali sarati
Advertisement

Beed Youth Suicide for Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)  मागणीसाठी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यातील सर्वांधिक आत्महत्येच्या घटना या बीडमधून (beed)  समोर आल्या आहेत. असे असतानाच आता पुन्हा एकदा बीडमधून मराठा आरक्षणासाठी तरूणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या तरूणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. गंगाभीषण रामराव मोरे, (वय 33) असे या आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. विशेष म्हणजे दोन दिवसापुर्वी बीडच्या गिरवलीतही एका तरूणाने पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. या घटनेने बीडमध्ये खळबळ माजली आहे. (beed youth commit suicide for maratha reservation manoj jarange patil agitation antarawali sarati)

Advertisement Whatsapp share

बीडच्या गिरवलीतील मराठा तरूणाच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच आता परळी तालुक्यातील गोवर्धन येथे एका तरूणाने गळफास घेत आपले जीवन संपवण्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंगाभीषण रामराव मोरे, वय 33, राहणार गोवर्धन हिवरा असे या आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. गंगाभिषणने घरातचं गळफास लावून आयुष्य संपवलं आहे. गंगाभिषण यांच्या आत्महत्येने त्याच्या 3 छोट्या मुली, पत्नी आणि आईवडीलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान गोवर्धन येथील घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

Advertisement

हे ही वाचा : Manoj Jarange : ‘त्यांच्या मृतदेहांवर आरक्षणाचा आदेश ठेवणार का?’, ठाकरे सरकारवर कडाडले

मराठा तरूणाची टाकीवरून उडी मारून आत्महत्या

बीड जिल्ह्यातील गिरवली येथे आणखी एका युवकाने पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवार 27 ऑक्टोबरला रात्री 11.30 वाजता घडली आहे. शत्रुघ्न काशीद असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षण देण्याची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी शत्रुघ्न शुक्रवारी रात्री पाण्याच्या टाकीवर चढला. तिथे शत्रुघ्न याने दोन तास आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली. यासोबतच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचीही इच्छा व्यक्त केली. त्यानंतर जरांगे पाटील यांच्याशी त्याचे बोलणेही करून देण्यात आले होते.

Advertisement सब्सक्राइब करा

शत्रुघ्नच्या या आंदोलनाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले.या घटनेनंतर परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे ही वाचा : डॉक्टर की सैतान! मरणयातना भोगणाऱ्या एचआयव्ही पेशंटला अमानुष मारहाण

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज