For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

छठपूर्वी बिहारमध्ये शोककळा! दारूची नशा जीवावर बेतली, 5 जणांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर!

09:06 AM Nov 19, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
छठपूर्वी बिहारमध्ये शोककळा  दारूची नशा जीवावर बेतली  5 जणांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर
Bihar Sitamarhi News 5 people died after drinking alcohol one Person is Serious
Advertisement

Bihar News : मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये दारू पिऊन 5 जणांचा धक्कादायक मृत्यू झाला. आता यानंतर नितीशकुमार कोणती महत्त्वाची पावले उचलतील? यावर सर्वांचं लक्ष आहे. जिथे संपूर्ण राज्यात छठ उत्सव साजरा होत होता. त्यावेळी बिहारमधील सीतामढी येथील बाजपट्टी गावात शोककळा पसरली. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 1 ची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांच्या नातेवाईकांनी मृत्यूचे कारण दारू असल्याचे सांगितले आहे. (Bihar Sitamarhi News 5 people died after drinking alcohol one Person is Serious )

Advertisement Whatsapp share

दारू पिणं 5 जणांच्या जीवावर बेतलं!

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण एकत्र पार्टीसाठी गेले होते. जिथे सगळे एकत्र दारू प्यायले. त्यानंतर सगळ्यांची तब्येत हळूहळू बिघडू लागली. त्यानंतर कुटुंबीयांनी सर्वांना रुग्णालयात दाखल केले. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस पोहोचेपर्यंत कुटुंबीयांनी दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पोलिसांनी 3 मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

Advertisement

वाचा : IND vs AUS Final : भारत-ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कपची फायनल लढत! खेळपट्टी आणि हवामान कसं आहे?

पोलीस तपासात गुंतले

त्याचवेळी पुपरी डीएसपी विनोद कुमार यांनीही दारू प्यायल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला. सध्या एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. डीएसपींनी अवधेश राय नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. मात्र, स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

वाचा : डेप्युटी एसपीच्या बायकोचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह…पोटच्या पोराचच भयंकर कृत्य

सीतामढीचे एसपी मनोज तिवारी यांनी सांगितले की, या प्रकरणाचा अहवाल नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे चौकीदार आणि पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेनंतर छठ या सणाच्या उत्सवावेळी संपूर्ण गावात शोककळा पसरली. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.

वाचा : Murder Case: मायलेकींची गळा चिरून हत्या, सासऱ्याने सांगितली धक्कादायक घटना

मिळालेल्या माहितीनुसार महेश कुमार, विक्रम राय, रामबाबू राय, अवधेश कुमार आणि संतोष महतो अशी मृतांची नावे आहेत. तर रोशनची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टर प्रवीण कुमार यांनी सांगितले की, विषारी दारू प्यायल्याने हे सर्व घडलं

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज