Thane : नाचली गौतमी पाटील, पण शिंदेंच्या शिवसेनेवर टीकेची झोड, प्रकरण काय?
Gautami Patil Eknath shinde News : गौतमी पाटील हे नाव आता महाराष्ट्रासाठी अनोळखी नाही. खेड्यापाड्यापासून ते शहरांपर्यंत गौतमी पाटील फेमस झालीये. अपवाद वगळता गौतमी पाटीलचा प्रत्येक कार्यक्रम प्रसिद्धी झोतात येतो. चर्चेचा विषय ठरतो. आता दिवाळीनिमित्त गौतमी पाटीलचा प्रथमच ठाण्यात लावणीचा कार्यक्रम झाला. पण, हा कार्यक्रम हुल्लडबाजी आणि गोंधळामुळे चर्चेत आला नाही, तर त्याचं कारण वेगळंच आहे. पण, या सगळ्यात विरोधकांच्या रडावर आलीये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना. गौतमी पाटील ठाण्यात नाचून गेली, पण टीकेची धनी झाली शिंदेंची शिवसेना.
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने म्हणजे ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या वतीने ठाण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिंतामणी चौकात झालेल्या या दिवाळी पहाट निमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. १२ नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम झाला.
गौतमीच्या नृत्य... शिंदेंची उपस्थिती..
ठाण्यात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. एकनाथ शिंदेंनी गौतमी पाटीलचं स्वागत केलं. दिवाळी पहाट कार्यक्रमात गौतमी पाटीलने लावणी सादर करत उपस्थितांचं मनोरंजनही केलं. पण, त्यानंतर विरोधकांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं.
गौतमी पाटीलने नुकतीच ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमातील गौतमीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.#GautamiPatil #Thane #EknathShinde pic.twitter.com/Q9QKeYLKk9
— Mumbai Tak (@mumbaitak) November 13, 2023
Advertisement
ओव्हरस्मार्ट ठाणे... जितेंद्र आव्हाडांनी काढला चिमटा
दिवाळी पहाट कार्यक्रमात गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रमाचे आयोजन केल्यावरून जितेंद्र आव्हाडांनी थेट शिवसेनेवर टीका केली. आव्हाड म्हणाले, "महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा दिवाळी पहाट लावणीने साजरी केली गेली. संस्कृती बदलली, ठाणे स्मार्ट नाही ओव्हर स्मार्ट झाले", असा चिमटा आव्हाडांनी काढला.
हे ही वाचा >> प्रेयसी बनली डीपफेकची शिकार, नकार मिळताच प्रियकराने नग्न फोटोच…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही यावरूनच शिंदेंच्या सेनेला लक्ष्य केले. अंधारेंनी एक ट्विट केलंय, ज्यात त्या म्हणतात, "दिवाळी पहाटनिमित्त आम्ही पं. बिस्मिल्ला साहेबांची सनई, पं. भीमसेन जोशी यांचे भक्ती गीत किंवा पद्मजा फेणानी यांचा गोड गळा हे सगळं ऐकून होतो. ठाण्यामध्ये आज उजाडलेली दिवाळी पहाट ही वंदनीय बाळासाहेबांनाच काय अवघ्या महाराष्ट्राला सुद्धा अपेक्षित नसेल", असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला आहे.
हे ही वाचा >> ‘शरद पवारांच्या गाडीत…’, गजानन कीर्तिकरांनी वाचला रामदास कदमांच्या गद्दारीचा इतिहास

एरवी गौतमी पाटीलचा कार्यक्रम चर्चेत येतो, तो गोंधळ अथवा उपस्थितांच्या भांडणामुळे. पण, यावेळी राजकारणाचा मुद्दा ठरलाय. पण, शिंदेंच्या सेनेकडून काय उत्तर दिलं जाणार, हे यात महत्त्वाचं आहे.