For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Mumbai Rain: मुंबईत तुफान पाऊस, हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन बंद

04:48 PM Jul 21, 2023 IST | रोहित गोळे
mumbai rain  मुंबईत तुफान पाऊस  हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन बंद
Mumbai Rain: मुंबईत तुफान पाऊस, हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन बंद
Advertisement

मुंबई: मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने (Heavy Rain) आज (21 जुलै) आज दुपारी 12 वाजेनंतर पुन्हा एकदा तुफान बरसण्यास सुरुवात केली. ज्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. याचा फटका हार्बर मार्गावरील (Harbor Railway) लोकल सेवेला बसला आहे. कुर्ला स्थानकात पाणी साचल्यामुळे हार्बर मार्गावरचा वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. हार्बर मार्गावरील वडाळा-मानखुर्द या (Wadala-Mankhurd) डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा ही पूर्णपणे ठप्प झाली आहे. तासाभरापासून या मार्गावरुन एकही ट्रेन धावू शकलेली नाही. दरम्यान, मध्य आणि पश्चिम मार्गावरील वाहतूक ही सुरुळीत आहे. मात्र लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. (heavy rain mumbai waterlogging low lying area harbor railway line wadala mankhurd route local train services suspended mumbai news in marathi)

Advertisement Whatsapp share

यामुळे हार्बर मार्गावरील कुर्ला स्टेशन, वडाळा, मानखुर्द या स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. हार्बर मार्गावर कुर्ला रेल्वे स्टेशननजीक ट्रॅक हे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरच्या ट्रेन या पूर्णपणे थांबविण्यात आल्या आहेत.

Advertisement

मागील दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आजही मुंबईला पुन्हा झोडपून काढलं आहे. आज दुपारी एक वाजेपासून अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ज्याचा फटका हा हार्बर मार्गावरील लोकल सेवेला बसला आहे. दुपारी पावणेतीन वाजेपासून हार्बर मार्गावर वडाळ्यापासून मानखुर्दपर्यंत एकही ट्रेन धावलेली नाही.

Advertisement सब्सक्राइब करा

कुर्ल्यात रेल्वे रुळ पाण्याखाली

नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गावरील पाण्याचा निचरा करण्यात आलेला आहे. पण अद्यापही या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे वडाळा ते मानखुर्द ही डाऊन मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे बंद आहे. तर अप मार्गावरील वाहतूक ही अर्धा तास उशिराने सुरू आहे.

तूर्तास प्रवाशांची गर्दी ही काहीशी कमी आहे. मात्र, पाच वाजेपर्यंत लोकल सेवा पूर्ववत न झाल्यास त्याचा फटका हा चाकरमान्यांना मोठा प्रमाणात बसू शकतो. कारण पाच वाजेनंतर अनेक कार्यालये सुटतात. त्यामुळे गर्दी प्रचंड वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

वडाळा रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी

मानखुर्दच्या दिशेने एकही ट्रेन न गेल्याने वडाळा स्थानकावर सध्या प्रचंड गर्दी झाली आहे. अनेक प्रवाशी हे गेल्या तासाभरापासून ट्रेनची वाट पाहत आहेत. मात्र, अद्याप तरी या मार्गावरून ट्रेन आलेली नाही.

BMC मधून मुंबईवर नजर

दरम्यान, मुंबई महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन कक्षातून मुंबईतील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. मुंबईत दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत काही ठिकाणी 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचवेळी 2.27 मिनिटांनी उधाणाची भरती होती. या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्यामुळे मुंबईतील काही सखल भागांमध्ये पाणी भरलं. पण साधारण तासाभरानंतर उधाणाची भरती कमी झाली आणि पावसाचा जोरही कमी झाल्यानंतर सखल भागातील पाणी हे ओसरलं आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज