For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Ganeshotsav 2023: भारतातील गणेशोत्सवाचा इतिहास, लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांच्यातील वाद काय?

03:05 PM Sep 18, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
ganeshotsav 2023  भारतातील गणेशोत्सवाचा इतिहास  लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांच्यातील वाद काय
Advertisement

Lokmanya Tilak and Bhausaheb Rangari Controversy : सध्या महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्ये गणेशोत्सवाचा प्रचंड उत्साह आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाची सारेच आतुरतेने वाट पाहत आहेत. गणपती बाप्पा विराजमान होण्याआधी लोकांमध्ये जे उत्साहाचे वातावरण असतं ते काही औरच. दरवर्षी हा १० दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. यंदा हा सण १९ सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे. (History of Ganeshotsav What is the controversy between Lokmanya Tilak and Bhausaheb Rangari)

Advertisement Whatsapp share

पण तुम्हाला गणपती बाप्पाच्या या सणाचा इतिहास माहितीये का? महाराष्ट्रात प्रथम गणपती उत्सव साजरा करण्यात आला, हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून ओळखू जाऊ लागला. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात भारतीयांना एकत्र करून स्वातंत्र्याची रणनीती बनवण्यासाठी बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला होता. आज संपूर्ण भारतात हा सण अगदी थाटामाटात साजरा केला जातो.

Advertisement

वाचा: PM Modi Speech in Parliament : मोदींनी नेहरूंचं केलं कौतुक, काय म्हणाले?

गणेश उत्सवाची सुरूवात कुठे झाली?

हा उत्सव धार्मिक न होता राजकीय कारणांसाठी सुरू करण्यात आला होता. ब्रिटीश राजवटीत जेव्हा अत्याचार वाढू लागले आणि कलम 144 नुसार, इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांना गटांमध्ये एकत्र येण्यापासून रोखले, तेव्हा प्रसिद्ध क्रांतिकारक लोकमान्य टिळकांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक नवीन आणि अनोखा मार्ग शोधून काढला. टिळकांनी 1894 मध्ये पुण्यातील शनिवाड्यात गणपती उत्सव सुरू केला. त्यांच्या केसरी वृत्तपत्रातही याचा उल्लेख करण्यात आला होता. देशातील हा पहिला सार्वजनिक गणपती उत्सव होता. पूर्वी लोक फक्त घरातच गणपती उत्सव साजरा करत असत.

Advertisement सब्सक्राइब करा

लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांच्यातील वाद काय?

पहिला सार्वजनिक गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी यांनी 1892 साली सुरू केल्याचा दावा, 2017 मध्ये भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने केला होता. त्यांच्या मते, लोकमान्य टिळकांनी 1894 मध्ये विंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. याआधी, 2 वर्ष अगोदर म्हणजे 1892 मध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.

वाचा : ‘खासदार बायका नाचवतो, जिल्ह्यात फिरला तर कपडेच…’, ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाची शिंदेंच्या खासदाराला धमकी

भाऊसाहेब रंगारी आहेत तरी कोण?

भाऊसाहेब लक्ष्मण जावळे म्हणजेच भाऊसाहेब रंगारी हे व्यवसायानं वैद्य होते. त्यांच्या दुमजली घरात धर्मार्थ दवाखाना होता. त्या ठिकाणी येणाऱ्या रूग्णांची ते मनोभावे सेवा करायचे. तसंच त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रातही मोठा अधिकार होता. त्यांचे आणि संत जंगली महाराज यांचे संबंध अतिशय सौहार्दपूर्ण होते असं जंगली महाराजांचे शिष्य सांगतात. भाऊसाहेबांचा परंपरागत व्यवसाय हा शालूंना रंग देण्याचा होता. त्यावरूनच त्यांना रंगारी हे उपनाव पडलं. महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या चरित्रकोशात त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.

Advertisement

भाऊ साहेब रंगारींचा गणपती कसा होता?

भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने केलेल्या दाव्यानुसार, 'भाऊसाहेबांनी 1892 मध्ये गणेश मूर्तीची स्थापना केली. ते सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते. असुर रूपातील ब्रिटिशांच्या सत्तेचा, गणपती बाप्पा नायनाट करत आहे, अशी संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी मंडळाची मूर्ती बनवली होती. ही मूर्ती राक्षसावर प्रहार करून त्याचा नायनाट करणारी होती. लाकूड व भुशाचा वापर करून ती तयार करण्यात आली होती.'

वाचा : कार-कंटेनरची भीषण धडक ! धुळ्याच्या नगरसेवकांसह चौघे जागेवरच ठार

लोकमान्य टिळक आणि रंगारी यांच्यात खरंच होता का वाद?

खरं तर, टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांच्यात कोणतेही वाद नव्हते हे टिळकांच्याच वृत्तपत्रातून दिसते. कारण जेव्हा रंगारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली, यानंतर केसरी वृत्तपत्रातून टिळकांनी त्यांचं कौतुक केलं होतं. टिळक हे रंगारी यांच्या गणपती ट्रस्टचे विश्वस्त असल्याचा दावाही या प्रकरणी केला जातो.

काही तज्ज्ञांच्या मते, भाऊ साहेब रंगारी यांनी गणेशोत्सवाला सर्वप्रथम सार्वजनिक रूप दिलं असलं तरी, त्याला व्यापक स्वरूप व दिशा देण्याचे काम टिळकांनी केलं. गणेशोत्सव व शिवजयंतीचे निमित्त साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत केले. त्यांनी 1893 पासून गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रवादी विचारांच्या प्रसार-प्रचारासाठी केला.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज