For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Israel-Hamas war: हमासच्या हल्लाने इस्त्रायल चिडला, सगळ्यात आधी 'या' देशाचा घेणार बदला?

10:27 AM Oct 10, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
israel hamas war  हमासच्या हल्लाने इस्त्रायल चिडला  सगळ्यात आधी  या  देशाचा घेणार बदला
Israel-Hamas war Possibility of Israel attack on Iran after Hamas attack
Advertisement

Is Israel Will make Iran the first target after the Hamas attack? : पॅलेस्टाईनची कट्टरतावादी संघटना हमास (Hamas) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रायलवर वारंवार हल्ला करणाऱ्या हमासने इस्रायलवर (Hamas-Israel) पाच हजार रॉकेटचा मारा केला. या हल्ल्यात सुमारे 1300 हून अधिक इस्रायली लोक मारले गेले आहेत. इस्रायलनेही तत्काळ कारवाई करत गाझावरील हल्ला तीव्र केला. इस्रायली सैन्याने संपूर्ण गाझाला घेरलं आहे. पण इस्रायली सूडाचा खरा चेहरा तो आहे ज्याने हमासला आर्थिक मदत केली, शस्त्रे पुरवली आणि हल्ल्यांसाठी प्रशिक्षण दिले. (Israel-Hamas war Possibility of Israel attack on Iran after Hamas attack)

Advertisement Whatsapp share

आता या भीषण हल्ल्यामागे हमासला इराणकडून मदत मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील वैर खूप जुने आहे. इस्रायल त्याच्या प्रत्येक शत्रूशी युद्ध करेल, पण इराणच त्यात पहिलं असणार असं दिसतंय. इराणवर इस्रायल हल्ला करण्यामागे केवळ हेच कारण दिसत नाही, तर आणखी पाच कारणे दिसत आहेत ज्यांमुळे इराणवर लवकरच हल्ला होण्याची शक्यता युद्धतज्ज्ञांना वाटते. चला तर मग, ही पाच कारणं कोणती आहेत याविषयी जाणून घेऊयात.

Advertisement

Israel Hamas War: हमासने इस्रायलला पुन्हा डिवचलं, म्हणाले; ‘चुन चुन के..’

पहिलं कारण- 'इराण, हमास आणि हिजबुल्लाला उघडपणे पाठिंबा देत आहे'

जवळपास 4 वर्षांपूर्वी लेबनॉनस्थित दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने इशारा दिला होता की, जर अमेरिकेने इराणविरुद्ध युद्ध सुरू केले तर त्यांना इस्रायलवर निर्दयीपणे बॉम्बफेक करून प्रत्युत्तर दिले जाईल. याचा अर्थ, इराण समर्थित आतंकी संघटना हिजबुल्ला, इस्रायलवर हल्ला करण्याची संधी मिळण्यासाठी वाटच पाहत होती. खरं तर, इराणने आपला अणुकार्यक्रम बर्‍याच प्रमाणात पूर्ण केल्याचे त्यावेळी उघड झाले होते. त्याचवेळी इराणच्या लष्कराने अमेरिकेचे ड्रोन पाडले होते.
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचे आदेशही दिले होते, पण नंतर ते मागे घेतले असल्याचे सांगितले जाते. हिजबुल्लाला इराणकडून लष्करी प्रशिक्षण, शस्त्रे आणि निधीही मिळत आहे. त्याला सीरियातूनही पाठिंबा मिळत आहे. इराण आपल्या विरोधात सीरियाची भूमी वापरतो, असे इस्रायल सुरुवातीपासून म्हणत आहे. जुलै 2006 मध्येही हिजबुल्लाहच्या सैनिकांनी इस्रायलवर रॉकेट डागले होते. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने लेबनॉनवर हवाई हल्ला केला ज्यात सुमारे 1200 लोक मरण पावले. 160 इस्रायली सैनिकही मारले गेले. अमेरिका, युरोपियन युनियन, कॅनडा आणि इतर अनेक देशांमध्ये हिजबुल्लाहवर बंदी आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

हिजबुल्ला हा सुरुवातीपासूनच पाश्चिमात्य आणि इस्रायलसाठी काटा आहे. मध्य आशियातही अनेक देशांना ही संघटना आवडत नाही. आता इस्रायल हिजबुल्लाच्या मुळ ठिकाणाला धडा शिकवणार हे निश्चित. त्यामुळे इराणवर हल्ला निश्चित मानला जात आहे.

दुसरं कारण- 'येमेनचे इराण समर्थित हुथी सौदीसाठी डोकेदुखी'

इराणला कमकुवत करून इस्रायलला मध्य आशियात पाठिंबा मिळवायचा आहे. सौदी अरेबियाने गेल्या वर्षीच हुथींच्या ठिकाणांवर प्राणघातक हवाई हल्ले केले होते, पण हुथी गरिलस अजूनही त्याला धमकावत आहेत. हुथींविरुद्ध सौदीच्या नेतृत्वाखालील युतीतील सदस्य UAE देखील आहे. गेल्या वर्षी 17 जानेवारी रोजी, हुथींनी अबू धाबीजवळ एका औद्योगिक तळावर हल्ला केला आणि या हल्ल्यात तेल ट्रकला धडक दिली. या हल्ल्यात तीन परदेशी कामगारांचाही मृत्यू झाला. हुथींनी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळही हल्ला केला. सौदी अरेबियाने 2015 मध्ये हुथी बंडखोरांना सामोरे जाण्यासाठी आणि येमेनमधील सरकारची पुनर्स्थापना करण्यासाठी अरब देशांची लष्करी आघाडी तयार केली होती.

Advertisement

Nagpur: मटणाच्या दुकानात वाद, चॉपरनेच सपासप वार करत घेतला गिऱ्हाईकाचा जीव!

येमेनवर कब्जा करण्याच्या लढाईत सौदी अरेबिया आणि इतर आखाती देश आणि इराण यांच्यात प्रॉक्सी युद्ध सुरू आहे. ऑगस्ट 2020 मध्ये, इस्रायल आणि UAE मध्ये एक करार झाला, इस्रायलने देखील इराण विरोधी आघाडीत प्रवेश केला. कारण, हुथींना मिळालेली बहुतेक शस्त्रे इराणकडून आहेत. यूएईने इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा खरेदी करण्यात प्रचंड रस दाखवल्याचे अनेक अहवाल आले आहेत.आता या देशांचा विश्वास जिंकून इस्रायल आपल्या समान शत्रूचा नायनाट करेल असे दिसते.

तिसरं कारण- 'इस्रायलच्या सर्व समस्यांचे मूळ इराण!'

हमासला इराणच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी प्रशिक्षण दिल्याचे एका वृत्तपत्रात म्हटले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डच्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'हमास ऑगस्टपासून इस्रायलवर हवाई, जमीन आणि सागरी हल्ले करण्याच्या तयारीत आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डच्या अधिकाऱ्यांनीच हमासवर हल्ल्याची सविस्तर रणनीती तयार केली होती. इराणच्या सहकार्याची चर्चा खरी ठरल्यास इराणची इस्रायलशी लढाई आता आमने-सामने होईल.' असा दावा वृत्तपत्राने केला आहे.

चौथं कारण- 'रिपब्लिकन आणि उजव्या विचारसरणीचा बिडेन यांच्यावर इराण प्रति पडणारा दबाव'

इस्रायलवर झालेल्या प्राणघातक आणि आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी संपूर्ण मदत देऊ केली आहे. पण बिडेन यांना त्यांच्या प्रशासनाने कैद्यांच्या अदलाबदलीसह इराणसाठी सहा अब्ज डॉलर्सचा निधी का मंजूर केला, असा सवाल केला जात आहे. हा मुद्दा इतका जोर धरत आहे की रिपब्लिकन पक्ष आता 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीतून बिडेन यांची हकालपट्टी करण्याची मागणी करत आहे.

फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस म्हणाले, 'इराणने इस्रायलविरुद्धच्या या युद्धासाठी आर्थिक मदत केली आहे आणि जो बिडेन यांच्या धोरणांमुळे इराणची तिजोरी भरली आहे. बिडेनची धोरणे इराणसाठी फायदेशीर आहेत आणि आता इस्रायलला त्याची किंमत मोजावी लागत आहे.'

अंगावर शहारे आणणारा मणिपूरचा व्हिडीओ व्हायरल, तरुणाला जिवंतच जाळलं

पाचवं कारण- 'इराण कधीही आण्विक शस्त्रे मिळवू शकतो'

इराण कधीही अणुबॉम्ब बनवू शकतो, असा दावा अनेक वर्षांपासून केला जात आहे. अलीकडेच पुन्हा एकदा अशा बातम्या आल्या आहेत की इराण अवघ्या दोन आठवड्यात आण्विक शस्त्रे बनवू शकतो. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने स्ट्रॅटेजी फॉर काउंटरिंग वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन रिपोर्ट 2023 मध्ये ही माहिती दिली आहे. इराणने 60 टक्क्यांपर्यंत युरेनियम समृद्ध केले आहे. मे 2023 मध्ये मिळालेल्या सॅटेलाईट इमेजेसमध्ये इराण डोंगरांच्या खाली आण्विक शस्त्रे बनवत असल्याचेही समोर आले होते.

2010 पासून, इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, युरोपियन युनियन इत्यादींकडून निर्बंध लादले होते. यादरम्यान इराणला सुमारे पाच वर्षे दिलासा मिळाला. पण जानेवारी 2020 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा इराणवर कडक निर्बंध लादले. मात्र बिडेन आल्यानंतर अमेरिकेची इराणबाबतची भूमिका पुन्हा मवाळ झाल्याचे बोलले जात आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज