For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Chandrayaan-3 : इस्रोसाठी वाईट बातमी! चंद्रावर झाली सकाळ पण, विक्रम लँडर...

04:57 PM Sep 25, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
chandrayaan 3   इस्रोसाठी वाईट बातमी  चंद्रावर झाली सकाळ पण  विक्रम लँडर
इस्रोसाठी वाईट बातमी! चंद्रावर झाली सकाळ पण, विक्रम लँडर...
Advertisement

Chandrayaan-3 Mission : विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर अजूनही झोपेतून उठलेले नाहीत. 20 सप्टेंबर 2023 रोजी त्यांच्या लँडिंग पॉईंटवर म्हणजेच शिवशक्ती पॉईंटवर सकाळ झाली. सूर्याचा प्रकाश पोहोचला होता. पण त्या प्रकाशाने विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर अजूनही जागे झालेले नाहीत. (ISRO chandrayaan-3 vikram lander and pragyan rover not Active Yet)

Advertisement Whatsapp share

इस्रो टीम 22 सप्टेंबर 2023 पासून विक्रम लँडरला सतत संदेश पाठवत आहे. पुढील काही दिवस सूर्यास्त होईपर्यंत आणखी संदेश पाठवत राहतील. पण यावरून तरी असं दिसतंय की, चांद्रयान-3 मोहीमेचा शेवट झालेला आहे. भारताने जगाला जे दाखवायचं होतं ते दाखवून दिलं आहे.

Advertisement

पंकजा मुंडेंना मोठा धक्का! वैद्यनाथ साखर कारखान्यावर कारवाई, 19 कोटींची…

इस्रोने विक्रम लँडरची यशस्वीपणे लँडिंग केली. प्रज्ञान रोव्हर 105 मीटर चालवण्यात आला. विक्रम लँडरनेही उडी मारून दाखवले. अनेक आवश्यक वायू आणि ऑक्सिजन सारख्या खनिजांच्या उपस्थितीची पुष्टी झाली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारी ही जगातील पहिली मोहीम होती. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश ठरला.

Advertisement सब्सक्राइब करा

आता फक्त आशेचे किरण... पण अॅक्टिव्ह होणं कठीण!

याआधी फक्त अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि चीनकडे सॉफ्ट लँडिंगचे प्रभुत्व होते. जेव्हा रात्र झाली तेव्हा इस्रोच्या शास्त्रज्ञांनी विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला स्वीच केलं होतं. पण यापूर्वी त्याच्या दोन्ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होत्या. प्रज्ञानचे सोलर पॅनल सूर्याकडे तोंड करून होते. जेणेकरून सकाळ होताच सूर्यप्रकाश थेट त्यावर पडेल. प्रकाश मिळाल्यानंतर ते पुन्हा अॅक्टिव्ह होतील, अशी आशा होती.

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचे मिशन लाइफ पूर्ण!.

हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, विक्रम आणि प्रज्ञान हे दोघे केवळ 14-15 दिवसांच्या मिशनसाठी बनवले गेले होते. ते पूर्ण झाले आहे. त्यापेक्षा जास्त वेळ त्यांनी तिथे घालवला आहे. ते जागे झाले तर ते वैज्ञानिकांसाठी चमत्कारापेक्षा कमी नसेल. पण आता हे घडणे अवघड वाटते. कारण उणे 120 ते उणे 240 अंश सेल्सिअस तापमानात त्यामध्ये बसवलेल्या उपकरणांचे सर्किट उडून जाण्याचा धोका होता.

Advertisement

Rape Case : नात्याला काळीमा! सावत्र बापाचा मुलीवर बलात्कार,अश्लील व्हिडिओ बनवून…

विक्रम लँडरला ज्यावेळी स्वीच करण्यात आलं होतं त्यावेळी त्याच्या एका सर्किटला अॅक्टिव्ह राहण्याची सूचना देण्यात आली. जेणेकरून 22 सप्टेंबरला इस्रोने पाठवलेला संदेश त्यांना मिळू शकेल. इस्रो सतत संपर्क करत आहे. मात्र विक्रम लँडर काही प्रतिक्रिया देत नाही.

याबाबत इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ म्हणाले की, 'विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरमध्ये असे तंत्रज्ञान आहे ज्यामुळे त्यांना सूर्यप्रकाशापासून पूर्णपणे ऊर्जा मिळेल. ते आपोआप अॅक्टिव्ह होतील. आपण फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. '

‘…अन् PM मोदी RBI गव्हर्नरला म्हणाले, ‘नोटांच्या ढिगाऱ्यावर बसलेला साप’

युरोपियन स्पेस एजन्सीनेही पाठवला संदेश

22 सप्टेंबर 2023 च्या पहाटे युरोपियन स्पेस एजन्सीने विक्रमला सतत संदेश पाठवले होते. पण लँडरकडून कमकुवत प्रतिसाद मिळाला. ज्या प्रकारची पॉवरफुल रेडिओ फ्रिक्वेन्सी त्यातून यायला हवी होती ती येत नव्हती. विक्रम 2268 MHz वर रेडिओ उत्सर्जित करत होता. हा एक कमकुवत बँड आहे.

चांद्रयान सतत ऑन-ऑफ सिग्नल पाठवत होते. चंद्रावरून येणारे सिग्नल कधी स्थिर होते तर कधी नाही. विक्रमचा ट्रान्सपॉन्डर आरएक्स फ्रिक्वेन्सीचा आहे. ते 240/221 च्या फ्रिक्वेन्सीवर ऑपरेट केले पाहिजे. पण ते 2268 MHz चे सिग्नल देत आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज