For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Maratha Reservation: 'त्या' कुणबी जात प्रमाणपत्राला मराठा तरुणाने लावली आग!

11:28 PM Nov 01, 2023 IST | मुंबई तक
maratha reservation   त्या  कुणबी जात प्रमाणपत्राला मराठा तरुणाने लावली आग
'त्या' कुणबी जात प्रमाणपत्राला मराठा तरुणाने लावली आग!
Advertisement

Sumit Mane Kunbi Certificate: गणेश जाधव, धाराशिव: धाराशिव तालुक्यातील कारी येथील सुमित माने या तरुणाला आजच (1 नोव्हेंबर) जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले होते. मात्र त्याने स्वीकारलेल्या या प्रमाणपत्राला होणाऱ्या विरोधानंतर लाभार्थी युवक सुमित माने व मराठा आंदोलकांनी दिलेल्या मराठा कुणबी प्रमाणपत्राची होळी करीत निषेध व्यक्त केला. सरसकट मराठा कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. (kunbi certificate distribution to maratha but sumit mane maratha youth set fire to kunbi caste certificate)

Advertisement Whatsapp share

निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीने प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर शिंदे सरकारने वंशावळीत कुणबी उल्लेख असलेल्या मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली.

Advertisement

हे ही वाचा>> Maratha Reservation: ‘साहेब याचे परिणाम बघा कसे भोगायला लागतील..’, जरांगे-पाटलांचा कोणाला थेट इशारा?

मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबीच आहे. त्यांना कुणबी म्हणून जात प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत सरकारने निजाम काळात कुणबी म्हणून उल्लेख असलेल्या वा महसूली नोंदीमध्ये कुणबी असा उल्लेख असलेल्यांना जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.

Advertisement सब्सक्राइब करा

सुमित माने या मराठा तरुणाला मिळालेलं पहिलं कुणबी जात प्रमाणपत्र, पण...

धाराशिव तालुक्यातील कारी या गावातील सुमित भारत माने या पात्र मराठा व्यक्तीला कुणबी जातप्रमाण देण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बसे यांच्या हस्ते हे जात प्रमाणपत्र देण्यात आले. पण अवघ्या काही तासातच या प्रमाणपत्राची होळी करण्यात आली.

सुमितला कसं मिळालं कुणबी जात प्रमाणपत्र?

सुमित माने या लाभार्थी व्यक्तीचे पंजोबा कृष्णा दादा माने यांचे गाव नमुना 14 वरील 1917 मध्ये कुणबी असल्याचा पुरावा सापडला आहे. त्या आधारावर कुणबी म्हणून जात प्रमाणपत्र देण्यात आले आहे. महसूल प्रशासनानेच हा पुरावा शोधला होता.

Advertisement

हे ही वाचा>> Maratha Reservation: शहाजी बापूंची गाडी अडवली, आमदार साहेब खाली उतरले, कानात कुजबुजले अन्…

धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाने 40 लाख कागदपत्रे तपासली. त्यात 459 प्रकरणात मराठा कुणबी पुरावे आढळून आले आहेत. सुमित माने याचं वय 30 वर्ष असून, BCA पदवीचे शिक्षण घेतले आहे. ते शेती करतात. माने यांना दोन भाऊ आहेत. त्यांच्या एका भावाचे कृषी विषयात एमबीए झाले आहे.

पण आता हे प्रमाणपत्र जाळून टाकण्यात आल्याने मराठा समाजाची नेमका विरोध देखील समोर आला आहे. त्यामुळे आता यामधून नेमका मार्ग काढण्याचं आव्हान शिंदे-फडणवीस सरकारसमोर उभं राहिलं आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज