For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Cabinet Meeting: मंत्रिमंडळांच्या बैठकीत 2 मोठे निर्णय, संपूर्ण निर्णयांची यादी एका क्लिकवर

04:44 PM Jun 28, 2023 IST | मुंबई तक
cabinet meeting  मंत्रिमंडळांच्या बैठकीत 2 मोठे निर्णय  संपूर्ण निर्णयांची यादी एका क्लिकवर
Cabinet Meeting: मंत्रिमंडळांच्या बैठकीत 2 मोठे निर्णय, संपूर्ण निर्णयांची यादी एका क्लिकवर
Advertisement

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखालील आज (28 जून) राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting)पार पडली. यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र, यामधील दोन महत्त्वाचे निर्णय म्हणजे वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचा आणि दुसरा निर्णय हा एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा-शेवा अटल सेतू असे नाव देण्याचा. या दोन्ही निर्णयांशिवाय इतरही अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पाहा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले सगळे महत्त्वाचे निर्णय. (maharashtra government cabinet meeting two major decisions versova bandra sagari setu swatantra veer savarkar shivdi nava sheva atal setu cm eknath shinde)

Advertisement Whatsapp share

मंत्रिमंडळ निर्णय:

* वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव
(सार्वजनिक बांधकाम)

Advertisement

* एमटीएचएल ला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव
( नगर विकास विभाग)

Advertisement सब्सक्राइब करा

* राज्यात 700 ठिकाणी हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. 210 कोटीस मान्यता
( सार्वजनिक आरोग्य विभाग )

* भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ
(जलसंपदा विभाग )

Advertisement

* महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित 2 कोटी कार्ड्स वाटणार आता 5 लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण.
(सार्वजनिक आरोग्य विभाग)

* संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ
(सामाजिक न्याय्य व विशेष सहाय विभाग)

* आता असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ. करोडो कामगारांना लाभ मिळणार
(कामगार विभाग)

* नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भातील जिल्हयांचा समावेश (कृषी विभाग)

* मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे उभारणार. 100 कोटींच्या खर्चास मान्यता.
( सामान्य प्रशासन विभाग)

* पूर प्रतिबंधासाठी राज्यातील 1648 किमीच्या नद्यांमधील गाळ काढणार
( जलसंपदा विभाग)

* मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भूखंड
(महसूल विभाग)

* भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण
(महसूल विभाग)

* मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल, वरूड, फलटण येथे न्यायालये
(विधी व न्याय विभाग)

* राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र
(उच्च व तंत्रशिक्षण विभाग)

* सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी करार
(वित्त विभाग)

हे ही वाचा >> सासऱ्याने सुनेचं मुंडकंच केलं धडावेगळं, क्रूर हत्येमागचं कारण काय?

* बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित
(गृहनिर्माण विभाग)

* जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी 3352 कोटी खर्चास मान्यता
(परिवहन विभाग)

* राज्यात 9 ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. 4365 कोटी खर्चास मान्यता
( वैद्यकीय शिक्षण विभाग)

* बुलढाणा येथे शासकीय कृषी महाविद्यालय
(कृषी विभाग)

* दीनदयाळ अंत्योदय योजना आता 143 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबवणार (नगरविकास विभाग)

* दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. 12 लाख विद्यार्थ्यांना लाभ
( शालेय शिक्षण)

*देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता
( मृद व जलसंधारण)

* चांदूर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट
( कृषी विभाग)

हे ही वाचा >> NCP: भाकरी फिरवली अन् अजित पवारांचा फोटो गायब, शरद पवारांच्या मनात काय?

* सर जे जे कला आणि वास्तूशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ
(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

* गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता
( जलसंपदा विभाग)

*ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
(ग्रामविकास विभाग)

* पाकिस्तानने पकडलेल्या मासेमाऱ्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार
( मत्स्य व्यवसाय विभाग)

* पर्यटन उपविभागासाठी उप सचिव
(पर्यटन विभाग)

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज