For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

कसाबच्या फाशीवेळी नेमकं वातावरण कसं होतं, मीरा बोरवणकरांनी सांगितली कहाणी

10:06 PM Oct 29, 2023 IST | mahadev kamble
कसाबच्या फाशीवेळी नेमकं वातावरण कसं होतं  मीरा बोरवणकरांनी सांगितली कहाणी
दहशवादी अजमला कसाबला ज्यावेळी फाशी देण्यात आली त्यावेळी राज्यातील परिस्थिती आणि तुरुंगातील परिस्थिती काय होती ती गोष्ट मीरा बोरवणकर यांनी सांगितली आहे.
Advertisement

Meera Borwankar: माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी 'मॅडम कमिशनर' (Madam Commissioner) आत्मचरित्र लिहिले आणि खळबळ उडवून दिली आहे. मीरा बोरवणकर यांनी पोलीस प्रशासनातील भ्रष्टाचारापासून ते पोलीस खात्यातील राजकीय हस्तक्षेपापर्यंतच्या अनेक गोष्टींबर त्यांनी बोट ठेवले. पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी पोलीस खात्यात आणि गृहमंत्रालयातील (Home Ministry) चाललेल्या भ्रष्टाचारावर (Corruption) त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. मीरा बोरवणकर यांनी दिलेल्या मुलाखतीत अनके गोष्टींबर त्यांनी चर्चा केली असली तरी त्यांनी यावेळी दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबच्या (Ajmal Kasab) फाशी (hanged) वेळी नेमकी परिस्थिती काय होती आणि राजकीय नेतृत्वाचा सहभाग कसा होता तेही त्यांनी या मुलाखतीत दिली.

Advertisement Whatsapp share

राजकीय हस्तक्षेप

मीरा बोरवरणकर म्हणाल्या की, दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब आणि याकूब मेमन यांना माझ्या कार्यकाळात फाशी देण्यात आली. मात्र त्यावेळी राजकीय हस्तक्षेपही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे त्यावेळी त्या फाशीचीही जोरदार चर्चा सुरु होती.

Advertisement

हे ही वाचा >> नीलम गोऱ्हेंनी पुण्यात केला होता दंगल घडवण्याचा प्रयत्न, मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप

फाशी देणे हे सिक्रेट

राज्याचे आर. आर. पाटील हे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी सांगितले होते की, याकूब मेमनला फाशी देणे हे सिक्रेट प्रकरण होते. त्यामुळे त्याला फाशी देताना कोणताही दबाव नव्हता मात्र सूचना मोठ्या प्रमाणात मिळत होत्या असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Advertisement सब्सक्राइब करा

कायद्याच्या चौकटीत केलं काम

अजमल कसाबला फाशी देतानाही त्यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. मात्र हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेला गेलं तर मात्र भारताच्या प्रतिमेला धक्का पोहचू शकतो असंही त्यांनी यावेळी सांगितले. या दोन्ही फाशी त्यांच्या कार्यकाळात झाल्या असल्या तरी त्या काळात माझ्यावर राजकीय सूचना देण्याचे प्रमाण वाढले होते. मात्र कायद्याच्या चौकटीत राहून मी काम करत होते. त्यामुळे दबाव असला तरी कायद्याच्या चौकटीत राहून हे काम मी करत होतो असंही त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा >> याकूब मेमनच्या मुलीला पासपोर्ट मिळावा यासाठी मीरा बोरवणकरांनी का केला होता प्रयत्न

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज