For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

ST Bus Strike: गुणरत्न सदावर्तेंमुळे CM शिंदेंचं ऐन दिवाळीत वाढणार टेन्शन?

10:32 AM Nov 06, 2023 IST | भागवत हिरेकर
st bus strike  गुणरत्न सदावर्तेंमुळे cm शिंदेंचं ऐन दिवाळीत वाढणार टेन्शन
गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कामगार संघटनेने चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे.
Advertisement

ST Bus Strike Latest News : मराठा आरक्षण आंदोलनातून सुटकेचा निश्वास टाकत नाही, तोच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं आहे. ऐन दिवाळीतच राज्यात लालपरी ठप्प होण्याची भीती आहे. कारण गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाने सोमवारपासून (6 नोव्हेंबर) राज्यात चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे.

Advertisement Whatsapp share

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात एसटी कामगार दीर्घकाळ संपावर गेले होते. त्यामुळे एसटी महामंडळाला प्रचंड मोठा तोटा सहन करावा लागला. तर राज्यातील जनतेचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, आता गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली एसटी संघटनेने पुन्हा एकदा जुन्या मागणीवरून चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे.

Advertisement

एसटी चक्का जाम आंदोलनाची हाक का?

एसटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी सर्वसमावेश समिती स्थापन करावी, महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी आणि राज्यातील 85 टक्के एसटी वाहनांचा विमा काढलेला नाही, त्यांचा विमा काढण्यात यावा, अशा मागण्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेने केल्या आहेत.

Advertisement सब्सक्राइब करा

हेही वाचा >> Virat Kohli Sachin Tendulkar : कोहलीला सचिन म्हणाला, “मला 365 दिवस लागले, पण तू…”

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे एसटी कामगार संघटनेच्या वतीने गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. संघटनेच्या अध्यक्षा जयश्री पाटील यांनी यासंदर्भात महामंडळाला तशी नोटीस दिली आहे. हा संप लांबला तर ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत.

हेही वाचा >> मोबाईलमधील अश्लील फोटोमुळे आत्महत्येचं उलगडलं गूढ; सांताक्रुझमधील ‘ते’ प्रकरण काय?

सरकारकडून चर्चा

सदावर्तेंच्या एसटी कामगार संघटनेकडून चक्का जाम आंदोलनाची हाक दिली. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडली. "एसटीच्या संदर्भात उदय सामंत युनियनसोबत बोलत आहेत. नक्की मार्ग निघेल. ज्या समस्या आधी सुटल्या नव्हत्या, त्या सुद्धा आम्ही सोडवल्या आहेत. उद्या चर्चेमधून प्रलंबित प्रश्न सुद्धा सुटतील", असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Advertisement

मराठा आंदोलनानंतर शिंदेंसमोर आणखी एक टेन्शन

मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केल्यामुळे मराठा आरक्षण मुद्द्यावरून शिंदे सरकार चांगलेच पेचात अडकले होते. जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रयत्न केले. त्यांची शिष्टाई फळाला आली आणि जरांगेंनी उपोषण स्थगित केले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी सुटकेचा निश्वास टाकला. पण, गुणरत्न सदावर्तेंच्या संघटनेमुळे त्यांचं टेन्शन पुन्हा वाढल्याचं दिसत आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज