For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

भारताला 'सुवर्ण' गिफ्ट! नागपूरच्या ओजस देवतळेने चीनमध्ये मारलं मैदान!

भारताला  सुवर्ण  गिफ्ट  नागपूरच्या ओजस देवतळेने चीनमध्ये मारलं मैदान
Advertisement

Nagpur's Ojas Devtale : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा मराठमोळा ओजस देवतळे आणि ज्योती सुरेखा वेण्णम यांनी कंपाऊंड आर्चरी मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं आहे. चीन येथे सुरू असलेल्या तिरंदाजीच्या या मिश्र दुहेरी स्पर्धेत भारताच्या नावे हे 16 वे सुवर्णपदक आहे. नागपूरकर ओजस इतक्यावरच थांबलेला नाही तर, सिंगल्स च्या अंतिम फेरीत त्याने प्रवेश केल्याने त्याचे पदक निश्चित झाले आहे. आता तो सुवर्ण पदक आणेल की रौप्य पदक हे अंतिम सामन्यानंतरच कळेल. (Nagpur's Ojas Devtale won the gold medal in archery mixed doubles event)

Advertisement Whatsapp share

ओजसच्या या कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी खेळामध्ये पदक जिंकणारा तो पहिला नागपूरकर ठरला आहे. ओजसने उपांत्य फेरीत 22 वर्षीय कोरियाच्या जेओन यांग याचे आव्हान 150 विरुद्ध 140 गुणांनी मोडीत काढले होते. उल्लेखनीय म्हणजे ओजसने 15 ही बाण अचूक निशाण्यावर लावले होते आणि एक नवा विक्रम नोंदवला होता.

Advertisement

Aaditya Thackeray लोकसभा निवडणूक लढवणार?, India Today Conclave मध्ये सांगितला प्लॅन

यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तिरंदाजीमध्ये पटकावलेल्या या सुवर्ण पदकासह भारताने जिंकलेल्या पदकांची संख्या 71 वर पोहोचली आहे. यामध्ये 16 सुवर्णपदक, 26 रौप्यपदक आणि 29 कांस्यपदकांचा समावेश आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

ओजस देवतळेचा संघर्षमय प्रवास

ओजस ची अंतिम लढत भारतीय वेळेनुसार, शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.15 वाजता भारतीय खेळाडू अभिषेक वर्मा याच्यासोबत होणार आहे. ओजसने विपरीत परिस्थितीमध्ये मोठी झेप घेतली. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात आर्चरी म्हणजेच तिरंदाजी खेळासाठी अनुकूल वातावरण आणि सुविधाही नाहीत मात्र तेजस सारख्या खेळाडूने जिद्द आणि चिकाटी या बळावर इथपर्यंत मजल मारली आहे.

Nallasopara : ‘डॉन को पकडना…’, अमिताभ बच्चनचा डायलॉग मारला अन् पोलिसांनी मुसक्या आवळल्या, नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी त्याने जर्मनी व फ्रान्समध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेतही देशासाठी विश्वविक्रमी कामगिरीसह सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यावेळी त्याने जगातील नंबर वन तिरंदाज व मिस्टर परफेक्ट समजल्या जाणाऱ्या नेदरलँडच्या माईक स्लॉसरसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना हरवले होते. तब्बल 92 वर्षाच्या इतिहासात भारताच्या पुरुष तिरंदाजी संघाने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदाच सुवर्ण जिंकले होते.

Advertisement

ओजसला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. त्यामुळे आई-वडिलांनी त्याला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. ओजसचे वडील प्रवीण देवतळे व्यावसायिक असून आई अर्चना देवताळे या स्वतःची खासगी शाळा चालवतात. तिरंदाजी हा महागडा खेळ असून सुद्धा त्याच्या घरच्यांनी त्याला आवश्यकता असताना प्रत्येक वेळी क्रीडा साहित्य घेऊन दिले, त्यामुळे मुलाने तिरंदाजी खेळात जे काही कमावले त्यात त्याच्या आई-वडिलांचं सुद्धा तितकंच योगदान आहे.

Parul Chaudhary: शिंदे-फडणवीसांनीही कौतुक केलेली पारुल चौधरी आहे तरी कोण?

ओजस नागपुरातील हिंगणा टी पॉइंट परिसरात राहतो. त्याने दीड वर्षांपूर्वी नागपूरातील स्पोर्ट्स अकॅडमी सोडून साताऱ्याला जाण्याचा निर्णय घेतला, या निर्णयाने त्याच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली. कारण साताऱ्यामध्ये दर्जेदार प्रशिक्षण मिळाल्याने त्याची झपाट्याने प्रगती होत गेली आणि त्यामुळे तो आता मिश्रमध्ये गोल्ड मेडल जिंकल्यावर आशियाई क्रीडा स्पर्धेत सिंगल मध्ये सुद्धा सुवर्णपदकाचा दावेदार आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज