For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Heart Attack : अचानक छातीत कळ आली अन् हृदयविकाराच्या झटक्याने 28 वर्षीय डॉक्टरचा मृत्यू

04:08 PM Nov 17, 2023 IST | प्रशांत गोमाणे
heart attack   अचानक छातीत कळ आली अन् हृदयविकाराच्या झटक्याने 28 वर्षीय डॉक्टरचा मृत्यू
sudden chest pain 28 year doctor dies due to heart attack in gorakhpur uttar pradesh
Advertisement

Doctor dies due to Heart Attack : देशात हार्ट अटॅकच्या (Heart Attack) घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या घटनांमध्ये हसता खेळता, चालता बोलता,नाचताना हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका डॉक्टरलाच हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली आहे. अभिषेक कुमार असे या 28 वर्षीय डॉक्टरचे (Doctor) नाव आहे. या घटनेने वैद्यकीय महाविद्यालय परिसरात शोककळा पसरली आहे. (sudden chest pain 28 year doctor dies due to heart attack in gorakhpur uttar pradesh)

Advertisement Whatsapp share

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोरखपूरमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत डॉ. अभिषेक कुमार देवरियाहून बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये आपल्या माजी डॉक्टर सहकाऱ्यांना भेटण्यासाठी आणि एनओसी घेण्यासाठी आले होते. या दरम्यान डॉक्टरांच्या छातीत अचानक दुखू लागले. आणि काही सेंकदातच ते बेशुद्ध पडले. या घटनेनंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आले होते.मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अचानक हृदयविकाराच्या झटक्याने तरुण डॉक्टरचा मृत्यू झाल्याने वैद्यकीय महाविद्यालय परिसरात शोककळा पसरली आहे.

Advertisement

हे ही वाचा : Chhagan Bhujbal:’तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही…’, भुजबळांनी थेट जरांगेंचं खाणंच काढलं!

अभिषेक कुमारने गोरखपूर बीआरडीमधून एमबीबीएस केले होते. सध्या ते देवरिया रेल्वे रुग्णालयात तैनात होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान अभिषेकचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

दरम्यान डॉ. अभिषेक कुमार हा बीआरडी मेडिकल कॉलेजचा 2016 च्या बॅचचा विद्यार्थी आहे. तो त्याच्या काही मित्रांना भेटण्यासाठी येथे आला होता. या भेटीदरम्यान त्यांना अचानक छातीत दुखू लागले. यावेळी गॅस आहे असे समजून त्यांनी अ्ॅसिडिटीचे औषध घेतले आणि ते त्यांच्या एका डॉक्टर सहकाऱ्याच्या बाईकवरून कार्डिओ विभागात जात होते. यावेळी अचानक अभिषेक दुचाकीवरून बेशुद्ध होऊन त्याच्या मित्राच्या पाठीवर पडला. त्यांना तातडीने आयसीयूमध्ये आणण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने सध्या परीसरात खळबळ माजली आहे.

हे ही वाचा : ‘मराठा समाजावर तुम्ही…’, गोपिचंद पडळकरांचा नाव न घेता पवारांवर हल्लाबोल

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज