For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

धक्कादायक! सूरत रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, एका प्रवाशाचा मृत्यू; 4 बेशुद्ध

04:02 PM Nov 11, 2023 IST | प्रशांत गोमाणे
धक्कादायक  सूरत रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी  एका प्रवाशाचा मृत्यू  4 बेशुद्ध
surat railway station man dies in chaos in crowd bihar board train diwali 2023
Advertisement

Surat railway station : गुजरातमधील (Gujrat) सुरत रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. दिवाळी निमित्त रेल्वे स्थानकावर (Railway station) प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी ट्रेन स्थानकावर येताच प्रवाशांनी चढण्यासाठी एकच गर्दी केली. या गर्दीत चेंगराचेंगरी झाली. यावेळी एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर तीन ते चार जण बेशुद्ध झाले आहेत.सध्या सुरत रेल्वे स्थानकावर रुग्णवाहिकेद्वारे जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. (surat railway station man dies in chaos in crowd bihar board train diwali 2023)

Advertisement Whatsapp share

देशभरात दिवाळी सण सुरू आहे. त्यामुळे अनेक कामगार वर्ग आपआपल्या कामावर निघाला आहे. त्यामुळे दिवाळी निमित्त रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होतेय. अशीच गर्दी सुरतच्या रेल्वे स्थानकावरही होती. यावेळी बिहारला जाणारी ट्रेन स्टेशनवर
येताच त्यात चढताना प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली.यावेळी तीन ते चार जण बेशुद्ध झाले. सुरत रेल्वे स्थानकावर रुग्णवाहिकेद्वारे जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. तर एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर सुरतच्या खासदार आणि केंद्र सरकारमधील रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्या होत्या.

Advertisement

हे ही वाचा : ‘तुमचं विमान वेळेवर टेक ऑफ झालं नसतं, तर माझ्या आयुष्याचं विमान..’, खडसेंचा CM शिंदेंना फोन

सुरत रेल्वे स्थानकावरून ताप्ती गंगा एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली, त्यामुळे गोंधळ झाला आणि काही लोक बेहोश झाले. रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होती. ज्यात काही प्रवाशांना अस्वस्थता आणि चक्कर आली, असे पोलिस अधीक्षक (पश्चिम रेल्वे) सरजो कुमारी यांनी सांगितले.

Advertisement सब्सक्राइब करा

'गर्दीमुळे एक व्यक्ती कोसळला आणि त्याला मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल. अन्य दोन प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती एसएमआयएमईआर रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी जयेश पटेल यांनी दिली.

हे ही वाचा : ब्रह्मकुमारी आश्रमात सख्खा बहिणींनी संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये आसाराम बापूचा उल्लेख

दरम्यान सुरतमधील हिरे आणि कापड उद्योगात गुंतलेले अनेक कामगार छठपूजेसाठी बिहार आणि उत्तर प्रदेशमधील त्यांच्या गावी जातात. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर रेल्वे स्थानकावर गर्दी झाली होती. तर दिवाळीत पश्चिम रेल्वे 46 जोड्या स्पेशल ट्रेन्स चालवणार आहे. ज्यात 400 वेगवेगळ्या स्थळी फेरफटका मारला जाणार आहेत, त्यापैकी 27 जोड्या सुरत किंवा उधना रेल्वे स्थानकांवरून सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वेने दिली आहे.

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज