For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

मृतदेहासोबत केला 600 Km प्रवास, प्रवाशांनी भीत भीत काढली रात्र

09:13 PM Nov 07, 2023 IST | mahadev kamble
मृतदेहासोबत केला 600 km प्रवास  प्रवाशांनी भीत भीत काढली रात्र
तामिळनाडू संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एका घटनेमुळे धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले आहे. रेल्वेच्या डब्यात मृतदेहासह अनेक प्रवाशांना 600 किलोमीटरचा प्रवास करावा लागला आहे. त्यामुळे अनेक जणांनी भीत भीत प्रवास केला आहे.
Advertisement

Traveling with dead body : तामिळनाडू संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या (Tamil Nadu Sampark Kranti Express) जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एका घटनेमुळे धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले आहे. रेल्वेच्या डब्यात मृतदेहासह (dead body) अनेक प्रवाशांना 600 किलोमीटरचा प्रवास करावा लागला आहे. त्यामुळे अनेक जणांनी भीत भीत प्रवास केला आहे. मृतदेहाची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाला (Railway Administration) मृतदेह उतरवण्याची विनंती करण्यात आली मात्र त्याला कोणताही प्रतिसाद रेल्वे प्रशासनाकडून मिळाला नाही.

Advertisement Whatsapp share

रेल्वेतच मृतदेह

चेन्नईहून हजरत निजामुद्दीनला जाणारी ट्रेन 6 नोव्हेंबर रोजी झाशी स्थानकावर पोहचली होती. त्यावेळी रेल्वेच्या डब्यातून एक मृतदेह खाली उतरवण्यात आला. त्यानंतर पंचनामा करुन तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. ही घटना घडल्यानंतर मात्र रेल्वे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा मृतदेह याआधीच उतरवला पाहिजे होता मात्र 10 तासांपेक्षा जास्त उशीर मृतदेह रेल्वेतच पडून असल्याने अनेक जणांनी त्याविषयी नाराजी व्यक्त केली.

Advertisement

आजारपणातच केला प्रवास

रेल्वेतून जो मृतदेह उतरवण्यात आला, त्यांचे नाव रामजीत यादव असे आहे. ते बांदा जिल्ह्यातील कमसिन पोलीस स्टेशन परिसरात राहणारे होते. चेन्नईमध्ये रामजीत बांधकामाचे काम करत होते. मात्र ते काही दिवसांपासून आजारी होते, त्यामुळे ते नातेवाईकासोबत तामिळनाडू संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून घरी जात होते.

Advertisement सब्सक्राइब करा

हे ही वाचा >>Prahlad Patel: भीषण अपघात, केंद्रीय मंत्री थोडक्यात बचावले; दुचाकीस्वाराची दुर्दैवी मृत्यू

तब्येत अचानक बिघडली

गोवर्धन यांनी सांगितले की, रविवारी रात्री ट्रेन नागपूरला पोहोचली होती. तेव्हा रामजीत यांची तब्येत अचानक बिघडली. मात्र त्यांच्यावर उपचार करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. रामजीत यांच्या हृदयाचे ठोके तपासण्यात आले तेव्हा त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तात्काळ रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांकावर (139) फोन करण्यात आला मात्र त्यानंतर कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही.

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

रामजीत यांचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर त्यांचा मृतदेह सीटवर ठेवण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह सीटवर ठेवण्यात आला. त्यानंतर त्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांनी अनेक जणांनी भीत भीत प्रवास केला. त्यानंतर रेल्वे भोपाळला पोहचल्यावरही रेल्वे प्रशासनाकडे मदत मागण्यात आली. मात्र तिथेही कोणत्याच प्रकारची मदत देण्यात आली नाही.

Advertisement

वारंवार तक्रार करुनही निर्णय नाही

रेल्वेच्या डब्यातील मृतदेह उतरवण्यासाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रार करुनही त्याबाबत कोणताच निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला नाही असा आरोप रेल्वे प्रशासनावर करण्यात आला आहे. ट्रेन झाशीला पोहोचल्यानंतर मृतदेह खाली उतरवण्यात आला. त्यावेळी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

मदत नाकारली

रेल्वेतून मृतदेह घेऊन प्रवास करणारे गोवर्धन यांनी सांगितले की, रामजीतची तब्येत पूर्वीपासूनच खराब होती. इटारसीजवळ त्यांची तब्बेत आणखी बिघडली. आणि त्यानंतर मध्यंतरी त्यांचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी उतरता आले नाही त्यामुळे तिथे उतरलो नाही. मात्र, अनेकवेळा रेल्वे क्रमांकावर फोन करूनही त्यांच्याकडून कोणतीही मदत देण्यात आली नाही. त्यानंतर प्रदीर्घ काळ गेल्यानंतर झाशीला रेल्वे पोहोचल्यानंतर त्यांचा मृतदेह खाली उतरवण्यात आला.

मृतदेह रेल्वेतून  बाहेर

याप्रकरणी रेल्वेच्या झाशीच्या कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार यांनी सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर मृतदेह झाशी रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आला. त्यानंतर पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यामुळे त्यांचा मृत्यू कशामुळे झाला आणि किती वाजता झाला ते आता स्पष्ट होईल. ही घटना काल ट्रेन क्रमांक 12651 मध्ये घडली आहे. डायल 139 वर मदत मागण्यात आली होती, मात्र रेल्वे झाशी विभागात आल्यानंतर डॉक्टरांना बोलावून त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर रेल्वेतून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

हे ही वाचा >> ‘आज महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंची गरज होती’, ‘हा’ मराठी अभिनेता थेटच बोलला!

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज