Crime : फ्लॅट बघायला गेली अन् झाला गँगरेप, प्रॉपर्टी एजंटनेच केला घात, काय घडलं?
Delhi Gang Rape News : राहण्यासाठी फ्लॅट शोधत असलेल्या एका महिलेसोबत भयंकर घटना घडली. फ्लॅट बघण्यासाठी गेल्यानंतर प्रॉपर्टी एजंटवर विश्वास ठेवून पाणी पिणं महिलेसाठी मोठा आघात ठरला. प्रॉपर्टी एजंट आणि त्याच्या मित्राने सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सोमवारी हा प्रकार समोर आला. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (A 30-year-old woman was allegedly gang-raped by two people, including a property dealer)
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर दिल्लीतील बुराडी परिसरात ही घटना घडली. एका 30 वर्षीय महिलेवर वासनांध प्रॉपर्टी एजंट आणि त्याच्या मित्राने आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.
हे ही वाचा >> नववधू हादरली… Honeymoon च्या रात्री व्हायग्रा घेऊन पतीकडून अनैसर्गिक संबंध
पोलिसांनी सांगितले की, आरोपी रविवारी महिलेला एका रिकाम्या फ्लॅटवर घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर आरोपींनी फ्लॅट बघायला आलेल्या महिलेला पाणी प्यायला दिले. या पाण्यात आरोपींनी आधीच गुंगी आणणारा पदार्थ मिसळलेला होता.
प्रॉपर्टी एजंट कोण?
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पीडित महिला राहण्यासाठी भाड्याने फ्लॅट शोधत होती. घराचा शोध घेत होती. याच काळात तिची आणि प्रॉपर्टी एजंट जितेंद्र चौधरींची भेट झाली. त्यानंतर फ्लॅटच्या संबंधाने त्यांच्यात चर्चा झाली.
हे ही वाचा >> Love, Sex आणि… ‘शरीराच्या प्रत्येक भागावर त्याने..’ Facbook मित्रासोबतची ‘ती’ रात्र!
प्रॉपर्टी एजंट चौधरीने पीडित महिलेला फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. महिला सांगितलेल्या ठिकाणी आल्यानंतर आरोपी प्रॉपर्टी एजंट चौधरी तिला फ्लॅट दाखवण्यासाठी घेऊन गेला. यावेळी आरोपी एजंटने त्याच्या मित्रालाही सोबत घेतले.
फ्लॅटवर नेले... पाणी दिले आणि...
आरोपी महिलेला एका फ्लॅटवर घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर आरोपी चौधरीने महिलेला पाणी प्यायला दिलं. या पाण्यात आरोपीने आधीच गुंगी आणणारा पदार्थ मिसळेला होता.
पाणी प्यायल्यानंतर महिलेला गुंगी आली आणि ती बेशुद्ध झाली. त्यानंतर प्रॉपर्टी एजंट जितेंद्र चौधरी आणि त्याच्या मित्राने आळीपाळीने महिलेवर बलात्कार केला. सामूहिक अत्याचार केल्यानंतर आरोपी फरार झाले.
हे ही वाचा >> भावाच्या कृत्याने अलिबाग हादरलं! सख्ख्या बहिणींना ‘सूप’मधून दिला विषाचा ‘घोट’
शुद्धीवर आल्यानंतर महिलेला घडलेला प्रकार कळला. त्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. बुराडी पोलिसांनी पीडित महिलेने घडलेली आपबिती सांगितली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.