For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

शारीरिक संबंधाला विरोध केल्याने संतापलेल्या बॉयफ्रेंडने प्रेयसीची केली हत्या, लोखंडी रॉडने....

02:57 PM Nov 12, 2023 IST | mahadev kamble
शारीरिक संबंधाला विरोध केल्याने संतापलेल्या बॉयफ्रेंडने प्रेयसीची केली हत्या  लोखंडी रॉडने
आरोपीने महिलेला भेटल्यानंतर तिला आपल्या बरोबर येण्यासाठी जबरदस्ती करत होता. मात्र त्याला तिने विरोध केल्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला.
Advertisement

Murder Case : उदयपूरमधील लेक सिटीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अंबामाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसांपूर्वी झालेल्या एका महिलेच्या हत्येचा (Girlfriend Murder) आज पोलिसांनी उलघडा केला आहे. या महिलेची हत्या प्रेमप्रकरणातून (Love) झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्याने महिलेची हत्या केली, त्याला महिलेला सोबत घेऊन जायचे होते असंही तपासात उघड झालं आहे. त्याच्या बरोबर जाण्यास महिलेने विरोध केला होता. यावेळी आरोपीने महिलेवर बलात्कार (Rape Case) करण्याचाही प्रयत्न केला होता. त्याच वादातून महिलेच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याने त्यातच तिचा मृत्यू झाला आहे. ही हत्या झाल्यानंतर काही वेळातच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Advertisement Whatsapp share

लोखंडी रॉडने हल्ला

या महिलेची हत्या झाल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीचा शोध चालू केला. याप्रकरणाचा खुलासा करताना पोली अधीक्षक भुवन भूषण यादव यांनी सांगितले की, 8 नोव्हेंबर रोजी एका महिलेवर लोखंडी रॉडने हल्ला करून तिची हत्या करण्यात आली होती.

Advertisement

हे ही वाचा >> Maratha Reservation : ”ओबीसी नेत्यांच्या राजकीय हट्टापायी…”, जरांगे पाटलांची भूजबळांवर टीका

बलात्काराचा प्रयत्न

आरोपीने महिलेला भेटल्यानंतर तिला आपल्या बरोबर येण्यासाठी जबरदस्ती करत होता. मात्र त्याला तिने विरोध केल्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला. आपल्या बरोबर येण्यास नकार दिल्यानंतर त्या महिलेला त्याने मारहाण केल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्नही केला, मात्र त्याला विरोध करण्यात आल्याच्या कारणावरूनच त्याने लोखंडी रॉडने डोक्यात हल्ला केला. त्यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement सब्सक्राइब करा

गळफास घेतल्याचं नाटक

लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोपीने महिलेच्या गळ्यात साडी बांधून तिला एका झुडपात टाकून देण्यात आले होते. त्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला होता.या घटनेतील ही दोघंही मोबाईल वापरत नव्हती. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे अवघड होते. तरीही पोलिसांच्या तपासामुळे काही वेळातच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

हे ही वाचा >>Crime News: जमिनीवर पडलेला मृतदेह, मानेवर जखमेच्या खुणा अन्… नवविवाहितेच्या सासरी नेमकं काय घडलं?

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज