For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

OYO हॉटेलमध्ये विवाहित महिला, पुरूषाचा मृतदेह, तपासात वेगळंच कारण आलं समोर

02:21 PM Nov 09, 2023 IST | मुंबई तक
oyo हॉटेलमध्ये विवाहित महिला  पुरूषाचा मृतदेह  तपासात वेगळंच कारण आलं समोर
सोहराब आणि आयशा या दोघांच्याही मृत्यूबद्दल 27 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता पोलिसांना माहिती मिळाली होती. सोहराब आणि आयशा यांनी रात्री 1 वाजता OYO हॉटेलमध्ये चेक इन केले होते, मात्र त्यानंतर त्या दोघांचेही मृतदेह हॉटेलात सापडल्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला
Advertisement

Murder Case: दिल्लीतील मौजपूर मेट्रो स्टेशनजवळील OYO हॉटेलमध्ये तरुण आणि तरुणीचा मृतदेह (Girl Dead Body) सापडला आहे. त्या मृतदेहांचे शवविच्छेदन (Postmortem) झाल्यानंतर महिलेचा गळा आवळून हत्या (Murder) केल्याचे स्पष्ट झाले आहे. तर महिलेची हत्या करुन त्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Advertisement Whatsapp share

महिलेची झाली हत्या

पोलिसांना 27 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता फोन वरुन माहिती देण्यात आली होती. मौजपूर मेट्रो स्टेशन जवळ असलेल किंग्स स्टे ओया हॉटेलमध्ये दोन मृतदेह सापडल्याचे पोलिसांना सांगण्यात आले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सांगितले की, महिलेची हत्या करणाऱ्याचे नाव सोहराब असून त्याचे वय 28 आहे. तर तो उत्तर प्रदेशमधील राहणारा होता.

Advertisement

हे ही वाचा >> Manoj Jarange : “तुमची मस्ती…”, तानाजी सावंतांवर जरांगे भडकले, काय घडलं?

दोघंही विवाहित

या प्रकरणातील दुसरा मृतदेह आयशा यांचा असून त्यांचे वय 27 वर्षे आहे. त्या मोहम्मद गुलफाम यांची पत्नी, असून त्या उत्तर प्रदेशातील लोणी या ठिकाणच्या राहणाऱ्या होत्या. त्यांना दोन मुले असून एक 9 वर्षांचा मुलगा आणि दुसरी मुलगी असून ती चार वर्षांची आहे. शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर महिलेच्या मृत्यूचे कारण सांगताना पोलिसांनी सांगितले की, महिलेचा गळा आवळून तिला ठार करण्यात आले आहे. तर सोहराबचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Advertisement सब्सक्राइब करा

चेक इन केलं आणि...

सोहराब आणि आयशा या दोघांच्याही मृत्यूबद्दल 27 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता पोलिसांना माहिती मिळाली होती. सोहराब आणि आयशा यांनी रात्री 1 वाजता OYO हॉटेलमध्ये चेक इन केले होते. त्यानंतर ती दोघंही त्या रुममध्ये 4 तास थांबली होती. त्यानंतर सकाळी रुममधून कोणीच बाहेर आले नाही. त्यामुळे सकाळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने पोलीस आल्यानंतर रुमचा दरवाजा तोडून पोलिसांसह कर्मचाऱ्यांनी आतमध्ये प्रवेश केला.

आयुष्य एकत्रच संपवलं

सोहराबन फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली, तर आयशा यांचा मृतदेह बेडवर आढळून आला होता. यावेळी महिलेच्या मानेवर जखमेच्या खुणा दिसून आल्या होत्या. यावेळी पोलिसांनी सांगितले की, आयेशाच्या पलंगावर अर्ध्या पानांची सुसाईड नोट सापडली होती. त्यामध्ये लिहिले होते की, आम्हा दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यामुळे आम्ही दोघांनीही एकत्रच आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यामध्ये लिहिण्यात आले होते. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Advertisement

हे ही वाचा >> मंडल विरुद्ध कमंडल! भाजप पुन्हा अडवाणींचा फॉर्म्युला स्वीकारणार?

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज