For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

फ्लॅटचा दरवाजा उघडला अन्... रक्ताच्या थारोळ्यात बाप-लेकीचा मृतदेह, मुलगा फरार

03:30 PM Nov 09, 2023 IST | mahadev kamble
फ्लॅटचा दरवाजा उघडला अन्    रक्ताच्या थारोळ्यात बाप लेकीचा मृतदेह  मुलगा फरार
गेल्या दोन दिवसांपासून वडिल आणि मुलीचा मृतदेह एकाच खोलीत पडून होते. मृताच्या मुलानेच वडिलांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना घडल्यापासून तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Advertisement

Murder Case: मध्य प्रदेशातील इंदौरमधील (Indore) एका फ्लॅटमध्ये वृद्ध वडील (old father) आणि त्यांच्या मुलीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह (Dead Body) सापडल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वडील आणि मुलीचा मृतदेह एकाच खोलीत पडून होते. वडिलांची हत्या (Father Murder) मुलानेच केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना घडल्यापासून तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हे मृतदेह मिळाल्यानंतर दोन्हीही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Advertisement Whatsapp share

रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

ही घटना पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्यावेळी पोलीस त्या फ्लॅटमध्ये गेले, त्यावेळी दोन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या प्रकरणात ठार झालेल्या व्यक्तींची नाव कमल किशोर आणि मुलगी रमा अरोरा अशी आहेत. यामध्ये ठार झालेली मुलगी ही 53 वर्षांची होती. या दोघांनाही मारुन खोलीत पडलेले रक्ताचे डाग पुसून टाकण्यात आले होते.

Advertisement

हे ही वाचा>> OYO हॉटेलमध्ये सापडले विवाहित महिला, पुरूषाचा मृतदेह, तपासात वेगळंच कारण आलं समोर

फोनमुळं झाला उलघडा

मृत झालेले वडील मुलगा पुलकिलसोबत राहते होते, त्यांना तीन मुलीही आहेत. त्या नेहमी आपल्या वडिलांना भेटायला येत होत्या. रमा ज्यावेळी आपल्या वडिलांना भेटायला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्या पतीला एकही फोन केला नव्हता. म्हणून रमा यांच्या पतीनेच रमाला फोन केला होता. मात्र रमाने त्यांचा फोन उचलला नव्हता. त्यामुळे त्यांनी सासऱ्यांना फोन केला मात्र त्यांनीही त्यांचा फोन घेतला नाही.

Advertisement सब्सक्राइब करा

फ्लॅटमध्ये रक्ताचा सडा

दोघंही फोन उचलत नाहीत, त्यामुळे त्यांनी थेट त्यांच्या फ्लॅटवर जाऊन त्यांची भेट घेण्याची ठरवले. ते जेव्हा फ्लॅटवर पोहचले तेव्हा समोरील दृश्य पाऊन त्यांना धक्काच बसला. कारण दोघांचेही मृतदेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर त्यांनी आता या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा>> Manoj Jarange : “तुमची मस्ती…”, तानाजी सावंतांवर जरांगे भडकले, काय घडलं?

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज