For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Mumbai Crime : मेहंदीवाले केस, कानातले...; महिलेची हत्या करणारा कसा सापडला?

10:37 AM Nov 02, 2023 IST | प्रशांत गोमाणे
mumbai crime   मेहंदीवाले केस  कानातले     महिलेची हत्या करणारा कसा सापडला
elderly women killed two youth Mehndi-covered hair and earring solves the mumbai murder mystery
Advertisement

Mumbai Crime news : मुंबईच्या वडाळ्यातील (Wadala) रेल्वे ट्रॅकनजीक एका 70 वर्षीय महिलेचा मृतदेह काही दिवसापूर्वी आढळला होता. पाच दिवसांपूर्वीच ही घटना घडली होती.ही घटना पाहता ट्रेनमधून कोसळून महिलेचा मृत्यू झाला असावा असा अनेकांचा समज झाला होता. मात्र या घटनेत आता तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांना या हत्येचं गुढ उकळण्यात यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका 27 वर्षीय भोंदू बाबाला अटक केली आहे. आता नेमकं या भोंदू बाबाने या महिलेची हत्या का केली? हे जाणून घेऊयात.(elderly women killed two youth Mehndi-covered hair and earring solves the mumbai murder mystery)

Advertisement Whatsapp share

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 70 वर्षीय मृत महिलेचे नाव सुग्रावी मुल्ला आहे. मृत महिला ही शहिद भगत सिंह नगरच्या चिंदी गली परीसरात एकटीच राहायची. तिला दोन मुले आहेत, त्यातला एक मुलगा हा संगम नगरमध्ये तर दुसरा मुलगा उलवेमध्ये राहतो. सुग्रावी यांच्याजवळ खूप दागिने होते. त्यामुळे हे दागिने पाहून आरोपीने तिच्या हत्येचा कट रचला होता.

Advertisement

हे ही वाचा : Maratha Reservation : “…तर तुम्ही मूर्ख, मुर्दाड आहात”, किरण मानेंची खरमरीत पोस्ट

या घटनेतील आरोपी भोंदू बाबा फैज रफीक सैयद उर्फ बाबा हा आधी हाउसकिपींगचे काम करायचा. पण गेल्या 7 महिन्यापासून तो बेरोजगार होता. तर त्याचा एक मित्र तंत्रमंत्र करायचां. हा दुसरा आरोपी देखील त्यांच्याच परीसरात राहत होता. दोघांनी सुग्रावीचे दागिने पाहून तिच्या हत्येचा कट रचला.

Advertisement सब्सक्राइब करा

या कटाचा भाग म्हणून आरोपींनी 26 ऑक्टोबरला दागिने लुटण्याच्या बहाण्याने सुग्रावीला चहा पिण्यासाठी घरी बोलावले. आरोपी तरूण तिच्याच ओळखीचे असल्याने महिलेने देखील लगेच होकार दिला. त्यानंतर महिला आरोपींच्या घरात पोहोचली. मात्र हे तरूण तिच्यासोबत काय करतील, याची तुला पुसटशी कल्पना नव्हती. महिलेने चहा पिल्यानंतर तरूणांनी तिचा गळा आवळून खून केला. या हत्येनंतर अटक होण्याच्या भीतीने पळ काढला होता.

हे ही वाचा : Maratha Reservation History : पहिल्यांदा कधी झाली होती मागणी? असा आहे इतिहास

या घटनेनंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह आढळला होता. मात्र या मृतदेहाची इतकी वाईट अवस्था होती की तिची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्यामुळे पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही तपासले, खबऱ्यांना देखील कामाला लावले. यावेळी महिलेच्या मेहंदीच्या केसांमुळे कानातल्यामुळे महिलेची ओळख पटवण्यात यश आले. पोलीस महिलेच्या दोन मुलापर्यंत पोहोचली. त्यानंतर घटनेचा तपास करून पोलीस भोंदूबाबा पर्यंत देखील पोहोचली. पोलिसांनी या प्रकरणी भोंदू बाबा फैज रफीक सैयद उर्फ बाबाला अटक केली. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज