For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

हॉटेलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडले गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, जखमी जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?

03:50 PM Nov 08, 2023 IST | mahadev kamble
हॉटेलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडले गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड  जखमी जोडप्यासोबत नेमकं काय घडलं
हॉटेल नंदमध्ये युवक आणि युवती दोघंही गंभीर अवस्थेत सापडले आहेत. ही दोघंही मांट परिसरातील राहणारे आहेत. ही दोघंही गंभीर अवस्थेत आढळून आल्यानंतर असं सांगण्यात येत आहे की, दोघांमध्ये आधी वाद झाला होता.
Advertisement

Uttar Pradesh Crime : उत्तर प्रदेशातील कोतवाली परिसरातील नंद हॉटेलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेल नंदमध्ये (Hotel Nand) युवक आणि युवती दोघंही गंभीर अवस्थेत सापडले आहेत. ही दोघंही मांट (Mant) परिसरातील राहणारे आहेत. ही दोघंही गंभीर (Boyfriend-Girlfriend Injured) अवस्थेत आढळून आल्यानंतर असं सांगण्यात येत आहे की, दोघांमध्ये आधी वाद झाला होता. त्यानंतर मुलीबरोबर आलेल्या तरुणाने तिच्या चाकूने हल्ला केला. त्याने केलेल्या हल्यात मुलगी जखमी झाल्यानंतर तरुणाने स्वतःकडे असलेल्या चाकूने स्वतःवरच वार (Knife Attack) करुन घेतले. गळ्यावर आणि हातावर वार करुन घेतल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन सगळी खोली रक्ताने माखलेली होती.

Advertisement Whatsapp share

नाष्टा करतानाच वाद

पोलिसांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्गावरुन ही दोघंही हॉटेल नंदमध्ये पोहचली होती. हॉटेलमध्ये गेल्यानंतर दोघांनीही चहा आणि नाष्टाही केला. चहा-नाष्टा करत असतानाच त्यांच्यामध्ये वाद होण्यास सुरुवात झाली होती. हा वाद इतका टोकाला गेला की, त्यावरुन दोघांनी एकमेकांना मारहाणही केली. त्यावेळी त्यांच्यातील वाद टोकाला गेल्यानंतर हॉटेलमधील कर्मचारी त्यांचेजवळ गेले. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्यातील वादही मिठवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद घालतच ती दोघंही आपल्या रुममध्ये निघून गेली.

Advertisement

हे ही वाचा >>Maratha Reservation : ’24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर…’, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

गळ्यावर चाकूने वार

हॉटेलमध्ये नाष्टा करत असताना वाद सुरु होता, कर्मचाऱ्यांनी वाद मिठवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ही दोघंही रुममध्ये निघून जाताच तरुणाने मुलीवर चाकून हल्ला केला. चाकूने हल्ला केल्यानंतर त्याच्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न मुलीने केला होता. त्यावेळी तिच्या हातावर आणि गळ्यावरही त्याने वार केला. त्या हल्ल्यात तरुणी जखमी झाल्याचे कळताच त्याने स्वतःवरही वार केला. या चाकू हल्ल्यात दोघंही जखमी झाली असून या घटनेची माहितीही पोलिसांना देण्यात आली.

Advertisement सब्सक्राइब करा

तरुणीची अवस्था गंभीर

हॉटेलमध्ये वाद घालून एकमेकांना जखमी करणाऱ्या युवक-युवतीला पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यानंतर पोलिसांनी तरुणीची अवस्था गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तर तरुणाची अवस्था चांगली असून हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणाची अवस्था चांगली असून आता हा वाद नेमका कशामुळे झाला आहे त्याची चौकशी पोलीस करत आहेत.

हे ही वाचा >> Maratha Reservation : …तर फडणवीसांच्या थेट गळ्यातच पडतो, जरांगे पाटील काय म्हणाले?

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज