For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Crime: बेडवर अल्पवयीन दिरासोबत वहिनी, पतीने 'ते' दृश्य पाहिलं अन्...

07:35 PM Oct 31, 2023 IST | मुंबई तक
crime  बेडवर अल्पवयीन दिरासोबत वहिनी  पतीने  ते  दृश्य पाहिलं अन्
पत्नी आणि अल्पवयीन दिराचे संबंध असल्याचे पतीला समजले आणि पतीने लहान भावाचा काटा काढला.
Advertisement

UP Murder: उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये एका पत्नीने (Wife) आपल्या पतीबरोबर विश्वासघात करत आपल्याच अल्पवयीन दिराबरोबर प्रेमसंबंध (Extramarital affair) जुळवले होते. ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तिचा नवरा घरातून बाहेर गेल्यानंतर मात्र अल्पवयीन दीर आणि वहिणी दोघंही एकत्रच वेळ घालवायचे. ही दोघंही एकदिवस घरात असताना नको त्या अवस्थेत तिच्या नवऱ्याला (Husband) आढळून आली. त्यानंतर त्या दोघांचे संबंध नवऱ्याचे लक्षात आले. मात्र त्यानंतर त्याने आपल्या लहान भावाला (little brother) कट रचला आणि वेळ साधून त्याचा काटा काढला.

Advertisement Whatsapp share

अल्पवयीन दिराबरोबर जुळले सूत

ही घटना घडली आहे, ती बदायूंच्या बिल्सीमधील अहमदगंज येथे, त्यामुळे अनेकांना त्याचा धक्का बसला आहे. त्या गावामध्ये एका विवाहित महिलेचे आपल्याच अल्पवयीन दिराबरोबर प्रेमसंबंध जुळले होते. यामध्ये ती दोघंही एकमेकांवर प्रेम करत होती. त्यामुळे तिचा नवरा कामावर गेल्यानंतर मात्र ही दोघं एकत्रच वेळ घालवत होती.

Advertisement

हे ही वाचा >>महिला टिचर आणि बॉयफ्रेंड… विद्यार्थ्याच्या हत्येची अंगावर काटा आणणारी कहाणी जशीच्या तशी…

भाऊ-पत्नी नको त्या अवस्थेत

नवरा कामावर गेल्यानंतर ही दोघंही त्याच्या भावाच्याच खोलीत थांबत होती. एक दिवशी अचानाक त्या महिलेचा नवरा घरात आला, त्यावेळी त्या दोघांनाही नको अवस्थेत त्याने पाहिले होते. त्या घटनेनंतर त्याने आपल्या भावाला आणि बायकोला समज दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा ही दोघं एकत्र दिसू लागली. त्यामुळे तिचा नवरा दोघांवरही चिडून होता.

Advertisement सब्सक्राइब करा

गांजा देऊन केला घात

पतीने समज दिल्यानंतरही वहिणी आणि दीर एकत्रच दिसत असल्याने तिच्या नवऱ्याने ठरवून आपल्या भावाचा काटा काढला. काही दिवसांनी अहमदगंजमध्ये एका 16 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृतदेह शेतात सापडला होता. त्यावेळी त्याच्या गळ्यात घट्ट टॉवेल बांधला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्या प्रकरणाचा तपास सुरु केला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी शोध सुरु केल्यानंतर मृत युवकाच्या वडिलांना बोलवण्यात आले. त्यावेळी त्याच्या वडिलांनी सांगितले की, 23 ऑक्टोबरपासून तो बेपत्ता झाला होता. त्यामुळे 23 ऑक्टोबरपासून त्याच्यासंदर्भातील माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली.

हे ही वाचा >> Maratha Protest: जाळपोळ भोवणार; फडणवीस म्हणाले, “त्या आंदोलकांवर जीवे…”

वाद चिघळून टोकाला गेला

याप्रकरणी त्याच्या वडिलांनी पोलिसांनी सांगितले की, दोन्ही भावांमध्ये वारंवार वाद होत होते. त्यानंतर पोलिसांना त्याच्या मोठ्या भावावरच संशय बळावला होता. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर औषधाच्या बहाण्याने त्याला बाहेर घेऊन गेला होता. त्यानंतर दोघांनीही गांजाची नशा केली. त्याचवेळी मोठ्या भावाने लहान भावाचा गळा आवळला आणि त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह शेतात टाकून मोठा भाऊ घरी परतला. त्यानंतर पोलिसांना हा मृतदेह मिळाल्यानंतर तपास करुन त्याच्या मोठ्या भावाला पोलिसांनी अटक केली.

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज