अनैतिक संबंधातून पतीसोबत भयानक कांड, झोपेत गळा घोटला, मृतदेहाचे तुकडे तुकडे...
Murder Case: त्रिचीमध्ये (Trichy) एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल (Extramarital affair) पतीकडून संशय घेणाऱ्या पतीच्या हत्येप्रकरणी (Husband Murder) पोलिसांनी 26 वर्षीच्या महिलेला आणि 23 वर्षाच्या एका तरुणाला अटक केली आहे. या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 30 वर्षाचे असणारे फूल विक्रेते प्रभू यांचे 12 वर्षांपूर्वी विनोदिनीसोबत लग्न झाले होते. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगाही आहे. त्यानंतर 5 नोव्हेंबर रोजी प्रभूचा भाऊ विनोदिनीला भेटायला तिच्या घरी गेला होता. मात्र त्यावेळी 5 नोव्हेंबरपासून प्रभू घरी आलाच नसल्याचे तिने प्रभूच्या भावाला सांगितले.
पत्नीने आपला नवरा आला नसल्याचे सांगितल्याने त्यानेही बाजारात जात त्यांचा शोध घेतला. त्यावेळी आपल्या भावाचा शोध लागला नसल्याने त्याने समयापुरम पोलिसांकडे भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
पत्नीला घेतले समजून तरीही...
पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर मात्र एकापेक्षा एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. कारण विनोदिनीचे 23 वर्षाच्या भारतीसोबत अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर विनोदिनीचा पती प्रभूचे नेमकं काय झाले याबद्दल पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. विनोदिनी आणि भारती यांनी 3 महिन्यांपूर्वी संधई गेटजवळ एक घर भाड्याने घेतले होते, त्या ठिकाणी ती दोघं गुपचूप येऊन भेटत होती. त्यानंतर ही गोष्ट विनोदिनीच्या नवऱ्याला समजली. ती परस्पर आपल्या प्रियकराला भेटायला जाते ही गोष्ट समजल्यानंतरही प्रभून तिला समजवण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा >> कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची पूजा कोण करणार ? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘माझ्या मनात…’
संपवण्याचा रचला कट
मात्र विनोदिनीला पतीच्या रोजच्या कटकटीतून सुटका पाहिजे होती. त्या घटनेनंतर विनोदिनी भारतीला सुमारे 10 दिवस भेटली नव्हती. त्यानंतर मात्र तिने भारतीला बोलून आपण प्रभूला संपवण्याचा कट रचला. 4 नोव्हेंबर रोजी विनोदिनीने प्रभू यांची तब्येत बरी नसल्याचे सांगत तिने त्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. त्याच रात्री तिने आणि भारतीने प्रभू यांचा गळा आवळून हत्या केली.
अन् मृतदेहाचे केले तुकडे
विनोदिनीने पतीची गळा आवळून हत्या केल्यानंतर विनोदिनीचा प्रियकर भारतीने त्याचा मित्र रुबेन बाबू, दिवाकर आणि सरवन यांना बोलवून घेतले. त्यांनी 5 नोव्हेंबरच्या मध्यरात्री एका कारमधून मृतदेह त्रिची-मदुराई महामार्गाजवळ घेन जाऊन तिथे जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पावसामुळे मृतदेह त्यांना जाळता आला नव्हता. त्यानंतर भारती आणि त्याच्या मित्रांनी प्रभूच्या शरीराचे तुकडे केले, आणि ते तुकडे कावेरी नदीत आणि कोल्लीडम नदीत फेकण्यात आले. त्यानंतर आता याप्रकरणी विनोदिनी, भारती, रुबेन बाबू, दिवाकर, सरवन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.