For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

कार रिपेअर करायला गेले अन्... 6 जणांचा जीवच गेला, असं घडलं तरी काय?

01:21 PM Nov 13, 2023 IST | mahadev kamble
कार रिपेअर करायला गेले अन्    6 जणांचा जीवच गेला  असं घडलं तरी काय
हैदराबादमधील या दुर्घटनेचे अनेक व्हिडीओ आता व्हायरल झाले आहेत. त्या व्हिडीओमध्ये अग्निशमन दलाचे जवान इमारतीतून नागरिकांना कशा प्रकारे वाचवत आहेत ते दिसून येत आहे.
Advertisement

Hyderabad Accident : हैदराबादमध्ये एक भयंकर दुर्घटना घडली आहे. कार दुरुस्ती (Car Repair) करत असताना मोठा अपघात होऊन त्यामध्ये 6 जणांचा मृत्यू (6 people died) झाला आहे. हैदराबादमधील नामपल्ली परिसरात ही दुर्घटना घडली आहे. एका कारच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना जवळच ठेवलेल्या केमिकलने पेट घेतल्यामुळे ही मोठी दुर्घटना घडली आहे.

Advertisement Whatsapp share

आगीने घेतले रौद्ररुप

केमिकलला आग लागताच काही वेळातच आगीने इतके भीषण रुप घेतले की, त्यामध्ये अनेक जण अडकून पडले. त्यामधील 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. ही आग लागल्याचे कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आघ विझवण्याचे काम सुरु असून इमारतीतील लोकांना वाचवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु आहेत.

Advertisement

हे ही वाचा >> Gajanan Kirtikar : ‘शरद पवारांच्या गाडीत…’, कीर्तिकरांनी सांगितला कदमांच्या गद्दारीचा इतिहास

आगीचा व्हिडीओ व्हायरल

हैदराबादमधील या दुर्घटनेचे अनेक व्हिडीओ आता व्हायरल झाले आहेत. त्या व्हिडीओमध्ये अग्निशमन दलाचे जवान इमारतीतून नागरिकांना कशा प्रकारे वाचवत आहेत ते दिसून येत आहे. घटना घडत असतान प्रत्यक्षात हजर असणाऱ्या नागरिकांनी सांगितले की, कार दुरुस्ती करत असताना केमिकलमुळे आग लागली, मात्र क्षणात आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे ती आग पाण्याने विझवता आली नाही. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला सकाळी मिळाल्यानंतर तात्काळ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

Advertisement सब्सक्राइब करा

नेमकं कारण अस्पष्ट

सध्या आगीमुळे मोठे नुकसान झाले असून आगीचे नेमकं कारण व नुकसानीचा अंदाज सध्या तरी सांगता येणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ही घटना घडण्याआधी आजच हैदराबादमधील कोठापेट येथील ललिता हॉस्पिटलजवळील एका दुकानालाही आग लागली होती, मात्र या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. यापूर्वी हैदराबादमध्ये 18 मार्च रोजीही भीषण आग लागली होती, कालापठार येथील अन्सारी रोडवरील प्लास्टिक कचरा गोदामाला ही आग लागली होती. त्यावेळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

हे ही वाचा >> प्रेयसी बनली डीपफेकची शिकार, नकार मिळताच प्रियकराने नग्न फोटोच…

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज