For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

धक्कादायक! दारुच्या नशेत तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घुसवला

10:17 AM Nov 16, 2023 IST | मुंबई तक
धक्कादायक  दारुच्या नशेत तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घुसवला
दारुच्या नशेत वाद होऊन एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड घालण्यात आला आहे.
Advertisement

Delhi Crime : पश्चिम दिल्लीमधील ख्याला भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. दारुच्या नशेत अनैसर्गिक कृत्य करण्यास नकार दिल्याने एका तरुणाला घृणास्पद वागणूक दिल्याची घटना घडली आहे. दारुच्या नशेत अनैसर्गिक कृत्य करण्यास नकार देणाऱ्या मुलाला बेदम मारहाण (brutal beating) करुन त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये (Private part) लोखंडी रॉड (Iron rod) घातल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र तो गंभीररित्या जखमी झाल्याने आता त्याला सफरदरजंग रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच जखमीच्या सांगण्यावरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (iron rod inserted in young boy private part in delhi accused absconding)

Advertisement Whatsapp share

ढाब्यावर गेल्यानंतरच वाद उफाळला

जखमीच्या सांगण्यावरून या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे, तर अन्य काही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घातल्याने जखमी झालेल्या तरुणाचे नाव संजय कुमार असून तो एका खासगी कारखान्यात काम करतो. दिवाळी असल्याने संजय कुमार आणि त्याचे काही मित्र ढाब्यावर जेवायला गेले होते, मात्र दिवाळीच्या काळात ढाबा बंद असल्याने ते पुन्हा आपापल्या घरी परतले. संजय कुमार आपल्या कुटुंबीयासमेवत विष्णू गार्डन परिसरात राहतो. संजय घरी जात असताना अचानक अशोक यादवने त्याला अडवून त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

Advertisement

विरोध करताच मारहाण

शिवीगाळ देण्यावरुन पीडित संजय कुमारने त्याला विरोध केला होता. त्यानंतर आरोपी अशोकने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांचे वाद सुरु झाल्यानंतर आरोपी अशोकने आणखी 3-4 जणांना बोलवून संजयला मारहाण करण्यास सुरुवात केली.

Advertisement सब्सक्राइब करा

हे ही वाचा >>‘महागाई वाढेल; विशेष काय?’, सामनातून केंद्र सरकारवर आगपाखड

प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड

संजय कुमारला चार-पाच जणांकडून मारहाण करण्यात येत असताना त्याचे कपडे फाडून टाकण्यात आले. त्याच्या अंगावरचे कपडे काढून त्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड घालण्यात आला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. संजयला मारहाण होत असताना त्याने जोरात आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोकांनी त्याच्याकडे धाव घेतली.

दोघंही दारुच्या नशेत

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमीला रुग्णालयात दाखल केले. संजय हा जखमी झाल्याने तात्काळ त्याचे म्हणणे नोंद करण्यात आले नसले तरी माहिती काढून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता मुख्य आरोपी अशोक यादवला पोलिसांनी ताब्यात घेतले असून फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी यावेळी सांगितले की, जखमी आणि आरोपी हे दोघंही मद्यधुंद अवस्थेत होते अशी माहितीही पोलिसांनी दिली.

Advertisement

हे ही वाचा >> Crime News: …अन् माकडांच्या टोळक्याने मुलाचं पोट फाडलं, नेमकं घडलं काय?

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज