For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Kalyan: अल्पवयीन विवाहित मुलीचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, नेमकं काय घडलं?

05:28 PM Nov 08, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
kalyan  अल्पवयीन विवाहित मुलीचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह  नेमकं काय घडलं
Kalyan Crime News Dead Body of minor married girl hanging case filed against her husband and in-laws What exactly happend
Advertisement

Kalyan Crime News : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी संबधीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. कल्याणमधून (Kalyan News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन विवाहित मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तिच्यासोबत बळजबरीने लग्न करण्यात आले आणि कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून तिला ब्लॅकमेल केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. (Kalyan Crime News Dead Body of minor married girl hanging case filed against her husband and in-laws What exactly happend)

Advertisement Whatsapp share

त्याचबरोबर मुलगी तीन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Advertisement

वाचा : हॉटेलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडले गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, जखमी जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?

याप्रकरणी मृत मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा पती आणि सासरच्या मंडळींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच रुग्णालयाबाहेर सासरच्या मंडळींना मारहाण करून त्यांनी त्यांच्या तोंडाला काळे फासले.

Advertisement सब्सक्राइब करा

15 वर्षीय विवाहित मुलीने उचललं टोकाचं पाऊल?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील निगडी परिसरात राहणारे राजेंद्र रणदिवे यांची 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांपूर्वी अचानक बेपत्ता झाली होती. तिने रोहन म्हस्के नावाच्या मुलाशी लग्न केले होते. पोलीस या प्रकरणाचा अनेक बाजूंनी तपास करत आहेत.

वाचा : Dhanteras 2023 : भगवान धन्वंतरीची ‘अशी’ करा पूजा, जाणून घ्या शुभमुहूर्त आणि पूजा विधी

पीडितेचे वडील राजेंद्र रणदिवे यांनी पोलिसांना सांगितले की, एक दिवसापूर्वीच त्यांच्या मुलीने फोन करून सांगितले की, बाबा, मला घरी घेऊन जा, मला येथे मारहाण केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना फोन आला आणि त्यांच्या मुलीने गळफास घेतल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

पोलिसांनी सासरच्या मंडळींविरुद्ध दाखल केला गुन्हा!

पोलिसांनी मृत मुलीचा पती आणि सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार नोंदवल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासानुसार पुढील कारवाई केली जाईल. सासरच्या मंडळींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज