For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

प्रेयसी बनली डीपफेकची शिकार, नकार मिळताच प्रियकराने नग्न फोटोच...

11:42 AM Nov 13, 2023 IST | mahadev kamble
प्रेयसी बनली डीपफेकची शिकार  नकार मिळताच प्रियकराने नग्न फोटोच
प्रेयसीचा डीपफेक फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी बेळगाव पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
Advertisement

Karnataka Crime News: प्रेयसीचा डीपफेक फोटो (Deepfake photo) मॉर्फ करून सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केल्याप्रकरणी बेळगाव पोलिसांनी (Belgaum Police) एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 22 वर्षाच्या मंथन पाटील (Manthan Patil) या तरुणाचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंथन पाटील या तरुणाचे एका मुलीवर प्रेम होते. त्यानंतर त्याने तिला प्रप्रोजही केले होते. मात्र मुलीने त्याला नकार दिला होता. त्या नकाराचा मनात राग धरुनच तरुणाने डीपफेक अॅप (Deepfake App) वापरून तरुणीच्या फोटोमध्ये फेरफार करून तो न्यूड फोटो म्हणून सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

Advertisement Whatsapp share

फोटो केले मॉर्फ

तरुणाकडून मुलीचे डीपफेक अॅप वापरुन फोटो मॉर्फ करुन तो व्हायरलही केला होता. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मुलीचे नग्न छायाचित्रं दाखवून तिला तो ब्लॅकमेलही करण्याचा प्रयत्न करत होता. तरीही त्या मुलीने त्याला नकार दिला होता. धमकी देऊनही मुलगी नकार देत असल्याचा मनात राग धरुन मंथन पाटीलने आपल्या मित्र मैत्रिणींच्या सोशल मीडियावर तिचे नग्न फोटो पाठवण्यास सुरुवात केली. त्यानंतर पीडित मुलीने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला तात्काळ अटक केली. मंथन पाटील हा बेंगळुरूमध्ये एका खासगी कंपनीत काम करत होता.

Advertisement

हे ही वाचा >> हात-पाय बांधून पुजाऱ्याची केली हत्या, 2 महिलांनी घडवलं भयानक कांड

प्रेमाची किंमत चुकवावी लागेल

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, खानापूर येथील एका घटनेत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मुलीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी मंथन पाटीलचे एका मुलीवर प्रेम होते, मात्र त्याच्या प्रेमाला तिच्याकडून नकार मिळत होता. त्यामुळे संतापलेल्या मंथन पाटीलने मुलीला धमकी देत तुला याची किंमत चुकवावी लागेल अशा शब्दात तिला त्याने सुनावले होते. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर मुलीच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार केले होते. त्या माध्यमातून मुलीचे आणि तिच्या मित्रांचे मॉर्फ केलेले फोटो अपलोडही त्याने केले होते.

Advertisement सब्सक्राइब करा

डीपफेक सॉफ्टवेअरचागैरवापर

आरोपींनी डीपफेक सॉफ्टवेअरचा वापर करून मुलींच्या फोटोंचा गैरवापर केला होता. त्यांचे नग्न फोटो तयार करुन ते सर्व फोटो त्याने सोशल मीडियावरुन व्हायरल केले होते. या प्रकरणी त्याला आता अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा >> अनैतिक संबंधातून पतीसोबत भयानक कांड, झोपेत गळा घोटला, मृतदेहाचे तुकडे तुकडे…

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज