For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Crime : संतापलेल्या पतीने डोक्यात प्रेशर कुकर घातला, पत्नीचा जागीच गेला जीव

06:16 PM Nov 12, 2023 IST | mahadev kamble
crime   संतापलेल्या पतीने डोक्यात प्रेशर कुकर घातला  पत्नीचा जागीच गेला जीव
उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून कुकर डोक्यात मारुन पतीकडून पत्नीची हत्या
Advertisement

Wife Murder: उत्तर प्रदेशातील कौशांबी (Kaushambi, Uttar Pradesh) जिल्ह्यातील एका तरुणाने दारुसाठी (wine) बायकोने पैसे दिले नाहीत, म्हणून प्रेशर कुकरने (pressure cooker ) मारहाण करुन तिची हत्या (murder) केल्याची घटना घडली आहे. दारुसाठी एका महिलेची हत्या झाल्याचे कळताच पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेहाची पाहणी केली. त्यानंतर मृतदेहही शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पत्नीची हत्या करुन आरोपी फरार झाला असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Advertisement Whatsapp share

दारुसाठी टोकाचे वाद

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी वारंवार आपल्या पत्नीला मारहाण करत होता. त्यामुळे त्याने नेहमीप्रमाणेच शुक्रवारी रात्री आपल्या पत्नी मीन देवी (32) हिच्याकडे त्याने दारुसाठी पैसे मागितले होते. मात्र त्यानंतर त्याला पत्नीने सांगितले की, माझ्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे मी देऊ शकत नाही. त्यावरुन आधी दोघांचे भांडण झाले.

Advertisement

हे ही वाचा >> Video : अफगाणिस्तानच्या खेळाडूने दाखवला मनाचा मोठेपणा, गरिबांची दिवाळी केली गोड

प्रेशर कुकर डोक्यात घातला

पत्नीने दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून त्याने तिला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यावेळी दोघांची शाब्दिक वादही जोरदार झाला. त्यावेळी नवऱ्याने जवळच असलेल्या कुकर डोक्यात मारल्यामुळे पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ही घटना महिलेच्या माहेरी समजताच तिच्या भावाने येऊन भेट घेतली. त्यावेळी आपल्या बहिणीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात बहिणीच्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्नीची हत्या करुन नवरा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Advertisement सब्सक्राइब करा

दारुसाठी सतत मारहाण

ज्या नवऱ्याने दारुसाठी पत्नीची हत्या केली आहे. त्याच्याकडून वारंवार तिला मारहाण करण्यात येत होती. दारुच्या कारणामुळे याआधीही त्याने अनेकदा पत्नीवर हल्ला केला होता. मात्र शुक्रवारी त्याने घरातील कुकर थेट तिच्या डोक्यात घातल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

हे ही वाचा >> भयंकर! आईसह 3 मुलांचाही चिरला गळा, रक्ताच्या थारोळ्यात आख्ख्यं कुटुंब

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज