For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Crime: माय-लेकाला हाडं मोडेपर्यंत बॅटीनं मारलं, दाम्पत्याने जीवघेणा हल्ला का केला?

08:42 PM Nov 13, 2023 IST | mahadev kamble
crime  माय लेकाला हाडं मोडेपर्यंत बॅटीनं मारलं  दाम्पत्याने जीवघेणा हल्ला का केला
गेल्या काही दिवसांपासून लातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मारामारी, चोरी आणि दरोड्याचे प्रकार चालू असतानाच आता लातूर शहरात मारहाणीच्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
Advertisement

Latur Crime : गेल्या काही दिवसांपासून लातूर शहरासह (Latur City) जिल्ह्यातील काही भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मारामारी, चोरी आणि दरोड्याचे प्रकार चालू असतानाच आता लातूर शहरात मारहाणीच्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कारण एका ज्येष्ठ महिलेला आणि तिच्या मुलाला क्षुल्लक कारणावरुन मारहाण (beating) करण्यात आल्याने या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली आहे.

Advertisement Whatsapp share

महिलेला बॅटने झाली मारहाण

लातूर शहरात एका जोडप्याने 53 वर्षीय महिला आणि तिच्या मुलाला क्रिकेटच्या बॅटने प्रचंड मारहाण करण्यात आली आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांनी सांगितले की, शनिवारी दिलेल्या तक्रारीनुसारश्रीनिवास नगर परिसरात सकाळी मारहाणीचा प्रकार घडला आहे. या घटनेप्रकरणी गोपाल आणि सपना दरक या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ज्येष्ठ महिलेला का मारहाण करण्यात आली आहे, त्याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Advertisement

हे ही वाचा >> दिवाळी दिवशीच प्रायव्हेट पार्टजवळ फटाके फोडले, अन् ‘त्याचा’ जीवच…

मायलेकरांचा गुन्हा काय?

पोलिसांनी सांगितले की, मंतीनगर येथील रहिवासी संगीता राजकुमार भोसले या मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. यावेळी त्यांना दरक दांपत्याने अडवून त्यांना क्रिकेटच्या बॅटने जोरदार मारहाण केली. या घटनेची माहिती देताना पोलीस म्हणाले की, काही अंतरावर पायी जात असताना महिलेवर हल्ला केला. त्यावेळी मध्यस्थी करायला आलेल्या मुलावर त्यांनी बॅटने हल्ला केला. त्यामुळे या मारहाणीत दोघंही जखमी झाले आहेत.

Advertisement सब्सक्राइब करा

बॅटने अर्धा तास मारहाण

दरक दांपत्याने मायलेकरांना किमान अर्धा तास मारहाण केली आहे. त्यामुळे महिला गंभीर जखमी झाली आहे. बॅटने मारहाण करण्यात आल्याने दोघंही जखमी झाली आहेत. या प्रकरणी अजूनपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही.

हे ही वाचा >> Maratha Reservation: भर चौकात विष पिऊन तरूणाची आरक्षणासाठी आत्महत्या

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज