For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Crime : लव्ह, सेक्स आणि धोका! ब्रेकअपनंतर अश्लील व्हिडीओ बनवून..,तरूणीसोबत काय घडलं?

02:56 PM Nov 04, 2023 IST | mahadev kamble
crime   लव्ह  सेक्स आणि धोका  ब्रेकअपनंतर अश्लील व्हिडीओ बनवून   तरूणीसोबत काय घडलं
प्रियकराने मुलीचे बनवलेले अश्लील व्हिडीओ अनेक ठिकाणी त्याच्या मित्राने अनेक ठिकाणी शेअर करुन ते त्यांनी व्हायरल केले होते. त्यानंतर प्रियकराच्या मित्रानीही तिला ते व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. त्या साऱ्या प्रकारामुळे तिची झालेली बदनामी आणि ब्लॅकमेल केल्यामुळे ती जास्त घाबरली होती.
Advertisement

Crime News : झारखंडच्या (Jharkhand) चाईबासामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत प्रेम (Love) आहे, वासना (Sex) आहे आणि ज्याच्यावर प्रेम केले आहे, त्या माणसाचा केलेला विश्वासघातही आहे. त्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा केली जात आहे. ज्या मुलीवर प्रेम केले होते, त्या दोघांचं कोणत्या तरी एका कारणामुळे ब्रेकअप (Breakup) झालं. त्यानंतर दोघांनीही एकमेकांचे संबंध तोडले. दोघांनी संबंध तोडल्यामुळे त्यांच्या नात्यात कटुता आली.

Advertisement Whatsapp share

मैत्रिणीच्या अब्रुचे धिंडवडे

आपली प्रेयसी आपल्यापासून दूर गेल्याचं दुःख आणि त्याचं त्याला वाईट वाटलं होते. आपल्याबरोबर संबंध तोडल्याचा त्याचा त्याला राग आला होता. त्यामुळे त्याने मैत्रिणीच्या अब्रुचे धिंडवडे काढले. प्रेयसीने आपल्याला नाकारल्याचे जसं त्याला दुःख झालं होते, त्याचा त्याला रागही आला होता. त्यामुळे त्याने आपल्याला सोडून गेलेल्या प्रेयसीचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

Advertisement

हे ही वाचा >>Elvish Yadav: रेव्ह पार्टीमध्ये का नेतात नाग, विषारी साप अन् नशा.. काय आहे कनेक्शन?

अश्लील व्हिडीओ व्हायरल

मुलीचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियामधून व्हायरल झाल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनीही ठोस कारवाईला सुरुवात केली. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार झाला होता. त्याच्याबरोबर त्याच्या मित्रानेही मुलीचे ते अश्लील व्हिडीओ व्हायरल केले होते. त्यामुळे पोलिसांनी मित्रांवरही कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.

Advertisement सब्सक्राइब करा

प्रेयसीचा घेतला बदला

चाईबासामधील किरुबुरूमध्ये प्रेयसीने संबंध तोडल्याने तिचे बनवलेले अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या माजी प्रियकराच्या 3 मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रकरणी 'त्या' प्रेयसीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दोघांचा ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसीचा बदला घेण्यासाठी माजी प्रियकराने तिचे अश्लील व्हिडिओ बनवून त्याने ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले असल्याची तक्रार प्रेयसीने दिली आहे. या प्रकारामुळे तिला मानसिक धक्का बसला असून बदनामी झाल्यामुळे ती आत्महत्या करण्याचा विचार करील म्हणून पोलिसांनी तिची समजूत काढून संबंधितांवर लवकरच कारवाई करणार असल्याचे अश्वासन त्यांनी दिले आहे.

मैत्रीचं रुपांतर प्रेमात

या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधितावर ठोस कारवाई करण्याचा विश्वास दिला आहे. त्या युवतीने या प्रकरण आत्महत्या करु नये यासाठीही पोलिसांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याबरोबर घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना देताना त्या युवतीने सांगितले की, मी जेव्हा ओडिशामध्ये शिकत होते. त्यावेळी तेथील एका मुलाबरोबर तिची मैत्री झाली होती. त्या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं होतं. ती दोघं प्रेमात असताना त्या तरुणाने तिच्या नकळत तिचे काही अश्लील व्हिडीओ बनवले होते.

Advertisement

मित्रांकडूनही धमकी

काही दिवसांनी दोघांच्या नात्यामध्ये वाद झाले होते, त्यामुळे दोघांनीही ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांचा अजिबात संबंध नव्हता. मात्र पूर्वीच्या प्रियकराने ब्रेकअप झालेल्या प्रेयसीचा बदला घेण्यासाठी पूर्वी कधी तरी बनवलेले तिचे अश्लील व्हिडीओ आपल्या मित्रांना पाठवून ते त्यांनी व्हायरल केले होते. त्यामुळे मुलीचीही प्रचंड बदनामी झाली.

ब्लॅकमेल करताच पोलिसात दिली तक्रार

प्रियकराने मुलीचे बनवलेले अश्लील व्हिडीओ अनेक ठिकाणी त्याच्या मित्राने अनेक ठिकाणी शेअर करुन ते त्यांनी व्हायरल केले होते. त्यानंतर प्रियकराच्या मित्रानीही तिला ते व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. त्या साऱ्या प्रकारामुळे तिची झालेली बदनामी आणि ब्लॅकमेल केल्यामुळे ती जास्त घाबरली होती. त्यामुळे तिने नंतर या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली.

प्रियकर अद्याप फरारच

या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन पोलिसांनीही तात्काळ कारवाईला सुरुवात केली. मुलीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करणे आणि नंतर तिला त्या प्रकरणी ब्लॅकमेल करणे या प्रकरणी 6 जणांपेक्षा अधिक जणांना अटक केली आहे.  तर काही निर्दोष लोकांना सोडून देण्यात आले आहे. तर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कान्हा मुखी, दिनेश दास उर्फ राजू आणि शुभम प्रसाद या तिघांना व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेले सर्व तरुण किरुबुरू येथील रहिवासी आहेत. या घटनेतील मुख्य आरोपी प्रेयसीचा माजी प्रियकर मात्र अद्याप फरार आहेत. त्यामुळे त्यांच्या संबंधित नातेवाईकांच्या घरावर पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत.

हे ही वाचा >> भ्रष्टाचाराची भली मोठी कीड… 1 कोटीची लाच घेणारा महाराष्ट्रातील हा अधिकारी तरी कोण?

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज