For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Crime News: धावत्या ट्रेनमधून तरुणाला फेकलं, लातूर स्थानकातील धक्कादायक प्रकार!

09:19 AM Nov 16, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
crime news  धावत्या ट्रेनमधून तरुणाला फेकलं  लातूर स्थानकातील धक्कादायक प्रकार
Maharashtra Latur Crime News Man thrown from train over dispute
Advertisement

Maharashtra Crime News: लातूरमध्ये (latur) किरकोळ वादातून एका तरूणाला चालत्या रेल्वेतून फेकून दिल्याची धक्कादायक घटना दिवसाढवळ्या घडली आहे. या घटनेत तरूणा गंभीर जखमी झाली असून त्याच्या डोक्याला, हाताला, पायाला इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेवेळी तरुणाची पत्नी आणि दोन मुलेही त्याच्यासोबत होती. पत्नीने चेन ओढून ट्रेन थांबवली होती. आरपीएफने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे. (Maharashtra Latur Crime News Man thrown from train over dispute)

Advertisement Whatsapp share

बालाजी दिगंबर जानोळे पत्नी मुक्ता जानोळे आणि दोन मुलांसह छत्रपती संभाजी नगरहून हैदराबादकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले होते. ट्रेन लातूर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर आली असता बालाजीचा खाद्यपदार्थ विकणाऱ्या एका व्यक्तीसोबत काही किरकोळ कारणावरून वाद झाला.

Advertisement

वाचा : ‘महागाई वाढेल; विशेष काय?’, सामनातून केंद्र सरकारवर आगपाखड

पतीला ढकलताच, पत्नीनेचेन ओढली अन् रेल्वे थांबली

त्या व्यक्तीने बालाजीला चालत्या ट्रेनमधून ढकलले. यानंतर कोचमध्ये एकच गोंधळ उडाला. घाबरलेल्या पत्नी मुक्ताने घाईघाईने ट्रेनची चेन ओढली आणि ट्रेन थांबली. ती मुलांसह खाली आली तेव्हा पती बालाजी गंभीर जखमी होऊन रुळाच्या बाजूला पडलेले तिने पाहिले.

Advertisement सब्सक्राइब करा

वाचा : Crime News: …अन् माकडांच्या टोळक्याने मुलाचं पोट फाडलं, नेमकं घडलं काय?

पतीला धक्काबुक्की करणाऱ्याला अटक करावी- मुक्ता जानोळे

या घटनेची माहिती आरपीएफ टीमला मिळाली. त्यांनी बालाजी दिगंबर जानोळे यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. बालाजीच्या डोक्याला, हाताला, पायाला आणि शरीराच्या इतर भागावर जखमा झाल्या. यानंतर बालाजीची पत्नी मुक्ता म्हणाली की, 'तिच्या पतीला चालत्या ट्रेनमधून फेकल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अटक करावी.'

वाचा : भारताची सेमी फायनलमध्ये धडक, 2019 च्या वर्ल्ड कप पराभवाचा घेतला बदला

खाद्यपदार्ख विक्रेत्याविरूद्ध गुन्हा दाखल!

या घटनेबाबत तिचे आरपीएफ स्टेशन प्रभारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज