For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Crime : दरवाजा उघडायला केला उशीर अन् मुलांसमोरच पत्नीवर सपासप वार, जागेवरच सोडला जीव

08:25 PM Nov 05, 2023 IST | भागवत हिरेकर
crime   दरवाजा उघडायला केला उशीर अन् मुलांसमोरच पत्नीवर सपासप वार  जागेवरच सोडला जीव
उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये एका व्यक्तीने पत्नीची हत्या केली.
Advertisement

Husband killed Wife : कधी कधी क्षणाचा राग तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील अलया अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आदित्य कपूरसोबत घडला. आदित्यचा कपड्यांचा शोरूम होता, पण कोरोना लॉकडाऊनमुळे त्याचा व्यवसाय बंद पडला. परिस्थिती इतकी बिकट झाली की कुटुंब जगवण्यासाठी त्याला दुसऱ्याच्या कपड्यांच्या दुकानात काम शोधावे लागले. त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये राहू लागला. अनेकवेळा त्याने आत्महत्या करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तो वाचला. दु:ख विसरण्यासाठी तो दारूच्या आहारी गेला. नशेत त्याचे पत्नीशी अनेकदा भांडणं होत असे. एका छोट्या कारणावरून भांडण विकोपाला गेलं आणि जे घडू नये तेच घडलं.

Advertisement Whatsapp share

आदित्य कपूरला शनिवारी (४ नोव्हेंबर) रात्री उशीर झाला होता. आदित्य रोजप्रमाणे नशेत घरी पोहोचला. उशीर झाल्यामुळे पत्नी शिवानी कपूर रागावली आणि लवकर दरवाजाच उघडला नाही. खूप वेळा आवाज दिल्यानंतर जेव्हा तिने दार उघडले तेव्हा आदित्य त्याच्या भांडू लागला.

Advertisement

हे ही वाचा >> किंग ‘कोहली’ सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत, बॅट तळपली घडवला ‘विराट’ इतिहास!

दोघांमधील भांडण इतके टोकाला गेले की, चिडलेल्या आदित्यने किचनमधून चाकू घेतला आणि शिवानीच्या अंगावर वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये तिच्या पाठीला व मानेला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ होऊन ती तिथेच पडली. इथे धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलांच्या डोळ्यासमोर सर्व काही घडत होते. भीती आणि दहशतीमुळे मुले सुरुवातीला काहीच बोलली नाहीत, मात्र आईची हत्या झाल्याचे पाहून त्यांनी वडिलांवर तुटून पडले.

Advertisement सब्सक्राइब करा

बापाला खोलीत कोंडायला गेले, पण...

दोन्ही मुलांनी आदित्यला एका खोलीत नेलं आणि बाहेरून कुलूप लावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्यांना ढकलून दिले आणि तेथून पळ काढला. स्वतःला वाचवण्यासाठी आदित्य कपूरने तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला मेडिकल कॉलेजच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Video : पिटबुल तोडत होता लचके अन् कुटुंब पाहत राहिलं, भयंकर घटना कॅमेऱ्यात कैद

दुसरीकडे त्याच्या मुलांनी लगेच पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून शिवानीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला. सध्या आदित्य आणि शिवानी एकाच हॉस्पिटलमध्ये आहेत, पण एकाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा जीवन-मरणाच्या मध्ये झुलत आहे. एकीकडे आई गमावली आणि बापही मृत्यू झुंज देत आहे, त्यामुले निरागस मुले धक्क्यात आहेत.

Advertisement

आदित्य-शिवानीने हलक्यात घेतली भांडणं

शिवानी आणि आदित्यचं सगळं उद्ध्वस्त झालंय. संपूर्ण कुटुंब विखुरले आहे. दोघांची इच्छा असती तर अशी परिस्थिती टाळता आली असती. पहिली गोष्ट म्हणजे आदित्यने आपला व्यवसाय पूर्ण झाल्यावरही हार मानायला नको होती. त्याचं झालं असं की तो दुसऱ्याच्या दुकानात कामाला होता. असे केल्याने तो हळूहळू त्याची परिस्थिती सुधारू शकला. पण सकारात्मक राहून विचार करण्याऐवजी तो डिप्रेशनमध्ये गेला. आधी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि आता पत्नीची हत्या केली. शिवानीलाही रोजचे भांडण सहन करावे लागले नसते. हे थांबवण्यासाठी ती समुपदेशकाची किंवा कायद्याची मदत घेऊ शकली असती.

शिवानी कौटुंबिक हिंसाचार कायद्याची मदत घेऊ शकली असती

शिवानी कपूर तिच्यावर होत असलेल्या हिंसाचारापासून स्वतःला वाचवण्यासाठी घरगुती हिंसाचार कायद्याची मदत घेऊ शकली असती. तिने हे केले असते तर कदाचित आज ती आपल्या मुलांसह जिवंत असती. आदित्य रोज तिच्यासोबत विनयभंग करायचा. दोघे दररोज भांडायचे, पण त्यांनी या गोष्टी क्षुल्लक समजल्या आणि एके दिवशी परिस्थिती इथपर्यंत आली.

हे ही वाचा >> लव्ह, सेक्स आणि धोका! ब्रेकअपनंतर अश्लील व्हिडीओ बनवून..,तरूणीसोबत काय घडलं?

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी 2005 मध्ये घरगुती हिंसाचार कायदा आणण्यात आला. IPC च्या कलम 498A नुसार हुंड्यासाठी महिलेचा शारीरिक किंवा मानसिक छळ करणे हा गुन्हा आहे. दोषी आढळल्यास, एखाद्या व्यक्तीला दोन वर्षांपर्यंत कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज