For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

वडिलांच्या हत्येसाठी मुलाने तुरुंगातच रचला कट, अर्ध्या रात्रीच कांड फसलं अन्...

10:43 PM Nov 08, 2023 IST | mahadev kamble
वडिलांच्या हत्येसाठी मुलाने तुरुंगातच रचला कट  अर्ध्या रात्रीच कांड फसलं अन्
मथुरामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. तुरुंगामध्ये असलेल्या मुलाने वडिलांची करोड रुपयांची संपत्ती हडप करण्यासाठी वडिलांच्याच हत्येचा कट रचला आहे.
Advertisement

UP Crime: मथुरामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. तुरुंगामध्ये असलेल्या मुलाने वडिलांची करोड रुपयांची संपत्ती हडप करण्यासाठी वडिलांच्याच हत्येचा कट (Father Murder plan) रचला आहे. कलयुगीच्या मुलाने (Son) हा गुन्हा करण्यासाठी 11 जणांना त्यांना मारण्यासाठी पाठवले होते. मात्र या घटनेची माहिती पोलिसांना कळताच बुधवारी थेट कारवाई करण्यात आली. त्यानंतर झालेल्या चकमकीत हल्लेखोरांना अटक करुन ताब्यात घेण्यात आले आहे. या चकमकीत 4 हल्लेखोरांना गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहे.

Advertisement Whatsapp share

मालमत्तेवरुन होता वाद सुरू

आग्रा झोनचे आयजी दीपक कुमार यांनी सांगितले की, वृंदावनसारख्या पवित्र स्थळाला बदनाम करण्याचा कट मथुरा आणि फिरोजाबाद पोलिसांनी उधळून लावला. किशोरी कुंज आश्रमाचे महंत स्वामी राज यांची हत्या करण्यासाठी काही हल्लेखोरांनी तेथे प्लॅन आखला होता. मात्र हा कट स्वामी राज यांचा मुलगा केशव दास यांनी रचून दिला होता असंही आता बोलले जात आहे. मुलगा आणि वडिलांच्या मालमत्तेवरुन हा वाद सुरू असल्याचे आता उघड झाले आहे.

Advertisement

हे ही वाचा >> Cabinet Meeting: मंत्रिमंडळाच्या बैठकीत CM शिंदेंचे प्रचंड मोठे निर्णय, मंत्रिमंडळ निर्णय जसेच्या तसे

परराज्यातील गुडांना दिली सुपारी

बिहार पोलिसांनी बिहार तुरुंगात बंद असलेल्या केशव दासला मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले होते. आश्रमाच्या वादावरुनच केशव दासने 11 जणांना आपल्या वडिलांची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. मात्र पोलिसांना या प्रकरणाची कुणकुण लागताच त्या अकरा जणांवर थेट कारवाई करण्यात आली. दोन्ही जिल्ह्यातील पोलिसांनी कारवाई करत एकूण 11 हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये 4 बिहारमधील आहेत आणि उर्वरित उत्तर प्रदेशातील आहेत.

Advertisement सब्सक्राइब करा

पोलिसांच्या नजरेनं आरोपींना हेरलं

पोलिसांनी 11 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून कार, चार पिस्तुले, अनेक काडतुसे, लोखंडी रॉड, दोरी, मोबाईल फोन आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपी टिटूचा 8 गुन्ह्यांमध्ये सहभाग असून, उर्वरित आरोपींचाही पोलीस शोध घेत आहेत. आयजी दीपक कुमार यांनी या प्रकरणाचा छडा लावणाऱ्या पोलीस पथकाला 50, 000 चे बक्षीसही जाहीर केले आहे.

हे ही वाचा >> 150 मिस्ड कॉल, पत्नीवर संशय; अन् .. सुखी संसाराची ‘ही’ थरकाप उडवणारी कहाणी

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज