For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Crime: मेहुणीच्या प्रेमात झालेला वेडा, दाजीने केलं भलतंच काही..

08:14 PM Nov 03, 2023 IST | mahadev kamble
crime  मेहुणीच्या प्रेमात झालेला वेडा  दाजीने केलं भलतंच काही
मेहुण्याने आपल्या मेहुणीला मारण्यासाठी पूर्ण प्लॅनिंग केले होते. तिची हत्या करण्याआधी त्याने आपल्या मेहुणीला व्हिडीओ केला होता. त्यानंतर
Advertisement

Murder News: सहारनपूरमधील चालाकपूरमध्ये एका विवाहित मेहुण्याने आपल्याच मेहूणीची हत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून मेहुणा आपल्याच मेहुणीच्या प्रेमात पडला होता. त्यामुळे तो मेहुणीबरोबर लग्न करायच्याही तयारीत होता. मात्र लग्नाला नकार मिळताच त्याने प्लॅनिंग करुन मेहुणीची हत्या केली. या घटनेमुळे कुटुंबीयांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. मेहुण्याने मेहुणीची हत्या केल्यानंतर आता 6 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारंही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

Advertisement Whatsapp share

मेहुण्याच्या मित्रांनी केला घात

चालाकपूरमध्ये राहत असलेल्या मुशर्रफ यांच्या घरात घुसून काही जणांनी गोळ्या झाडून तरुणीची हत्या केली आहे. ही मुलगी चालकपूरमध्ये राहत होती. मात्र 24 ऑक्टोबरच्या रात्री मेहुण्याच्या मित्रांनी त्या मुलीच्या घरात घुसून तिच्यावर गोळी झाडून तिची हत्या केली आहे.

Advertisement

मेहुणीच्या हत्येसाठी लाखोंची सुपारी

मुलीच्या हत्येनंतर मेहुणा तौकीर आणि त्याचा मित्र रेहमान या संशयितांविरोधात बडकाला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर तौकीरची चौकशी करून पोलिसांनी गुन्हेगार शोएब, नौशाद, हुसेन व अलसमद, हसीन या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या हत्येची सुपारी घेणाऱ्या रेहमान आणि त्याचे साथीदार तालिब आणि पप्पू मात्र फरार झाले आहेत. या प्रकरणात आरोपींकडून दोन पिस्तूल, तीन काडतुसे, चार मोबाईल फोन आणि तीन दुचाकीही जप्त केल्या आहेत.

Advertisement सब्सक्राइब करा

हे ही वाचा >> Maratha Reservation साठी काँग्रेस आमदाराने स्वतःवरच झाडलेली गोळी, 1980 ची घटना काय?

हत्येचं पूर्ण प्लॅनिंग

मेहुणीची हत्या करण्यासाठी मेहुण्याने पूर्ण प्लॅनिंग केले होते. तिची हत्या करण्याआधी त्याने आपल्या मेहुणीला व्हिडीओ कॉलही  केला होता. त्यानंतर त्याने शोएबला मेहुणीच्या घरातील माहिती सांगितली होती. मेहुणी घरात कुठे आहे, ती कुठे झोपली आहे. हे सांगताना त्याने तिच्या ड्रेसचा कलरही त्याला सांगितला होता.

लग्नाची होती तयारी

त्यानंतर शोएब, नौशाद, अलसमद, हुसैन आणि हसीन तिची हत्या करण्यासाठी मेहुणीच्या गावात पोहचले होते.  यावेळी आरोपीनीही पूर्ण प्लॅनिंग केले होते. आरोपीनी घराजवळ पोहचताच त्यातील दोघं जण घराबाहेर पाहरा देत थांबले होते. तर शोएबने घरात घुसून तिच्या गळ्यावर गोळी झाडून तिची हत्या केली. या प्रकरणातील आरोपी तौकीर हा बिलासपूरमधील मदरशात इमाम आहे. ज्या मेहुणीची हत्या करण्यात आली होती, तिचे काही दिवसांनी लग्नही होणार होते. मात्र त्याआधीच तिची हत्या करण्यात आल्याने गावासह परिसरात खळबळ उडाली आहे.

Advertisement

करायचे होते मेहुणीबरोबर लग्न

ज्या मेहुणीची हत्या करण्यात आली आहे, ती गेल्या काही दिवसांपासून मेहुण्याबरोबर त्यांच्या घरी थांबली होती. त्यावेळीच त्याचे आणि तिचे प्रेमसंबंध जुळाले होते. त्यानंतर त्याला मेहुणीबरोबरही लग्न करायचे होते. मात्र या गोष्टीला तिच्या कुटुंबीयांनी नकार देताच मेहुण्याने तिच्या हत्येचा कट रचला. तिला त्यावेळी तिला बोलूनही दाखवण्यात आले होते की, तुझं माझ्याबरोबर लग्न झालं नाही तर तुझं ठिकाणीही लग्न होऊ देणार नाही अशी धमकी तिला देण्यात आली होती. त्यामुळे तिच्या हत्येसाठी त्याने आपला मित्र रेहमानला 2 लाख 90 हजार रुपयांची सुपारी देऊन मेहुण्याची हत्या केली.

हे ही वाचा >> रेव्ह पार्टी, सापांचं विष.. ‘वर्षा’वर आरती करणारा एल्विश यादव नेमका कोण?

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज