For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Mira Road Murder: तीन बकेट रक्त... प्रेयसीचे तुकडे कुकरमध्ये शिजवले अन् मिक्सरमध्ये वाटले

01:26 PM Jun 08, 2023 IST | सौरभ वक्तानिया
mira road murder  तीन बकेट रक्त    प्रेयसीचे तुकडे कुकरमध्ये शिजवले अन् मिक्सरमध्ये वाटले
लिव्ह इन पार्टनरचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवायचे आणि नंतर ते कधी कुत्र्यांना खाऊ घालायचे, तर कधी मिक्सरमध्ये वाटून नाल्यात फेकायचे, असं सगळं त्याचं सुरू होतं.
Advertisement

Mira Road Murder News In Marathi : जिच्यावर प्रेम करायचा, तिलाच संपवलं. नंतर हत्या करूनच तो थांबला नाही, तर त्याने लाकूड कापायच्या कटरने तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. हत्येचा सुगावा कुणाला लागू नये म्हणून मग त्याने राक्षसी कृत्य केले. लिव्ह इन पार्टनरचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवायचे आणि नंतर ते कधी कुत्र्यांना खाऊ घालायचे, तर कधी मिक्सरमध्ये वाटून नाल्यात फेकायचे, असं सगळं त्याचं सुरू होतं, पण बुधवारी (7 जून) बिंग फुटलं. गुन्हेगारीवर आधारित मालिकेलाही मागे टाकणारी ही घटना समोर कळल्यानंतर पोलिसांचाही थरकाप उडाला.

Advertisement Whatsapp share

मुंबई उपनगरातील मीरा रोड भागात गीतानगर फेज 7 आहे. येथेच गीता आकाश दीप सोसायटी आहे. याच सोसायटीतील सातव्या मजल्यावर रुम क्रमांक 704 मध्ये 56 वर्षीय मनोज साने आणि 36 वर्षीय सरस्वती वैद्य हे दोघे राहत होते. मागील तीन वर्षांपासून ते या फ्लॅटमध्ये राहत होते. पण, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्यानंतर जे घडलं, त्याने मुंबई उपनगरच हादरले.

Advertisement

तुकडे केले, प्रेशर कुकरमध्ये शिजवले

मनोज आणि सरस्वती राहत असलेल्या फ्लॅटमधून आजूबाजूच्या लोकांना दुर्गंध येऊ लागला. त्याचबरोबर मनोज साहनीच्या हालचालीही संशयास्पद वाटल्या. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी याची माहिती नयानगर पोलिसांना दिली.

Advertisement सब्सक्राइब करा

हेही वाचा >> उद्धव ठाकरेंचे मेहुणे पुन्हा अडचणीत, आता कोणती कारवाई?

माहिती मिळाल्यानंतर पोलीस सोसायटीत आले. पोलीस आल्याची कुणकुण लागताच मनोज साने हा लिफ्टमधून पोबारा करत होता. मात्र, पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले. आणि फ्लॅटचा दरवाजा उघडला. त्यानंतर आत जे दृश्य दिसले, ते पाहून पोलीस आणि उपस्थितांचा धक्काच बसला.

फ्लॅट क्रमांक 704 मधून दुर्गंधी येण्याचं कारण होतं, सरस्वतीच्या मृतदेहाचे कुजलेले तुकडे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला खाक्या दम दिला आणि त्याने हत्येची सगळी गोष्ट सांगितली.

Advertisement

हेही वाचा >> Mira Road Murder : लिव्ह इन पार्टनरचे लाकूड कापायच्या मशीनने केले तुकडे

आरोपी मनोज साने याने पोलिसांनी दिलेल्या कबुली जबाबातून अनेक गोष्टी समोर आल्या. मनोज सानेने सरस्वती वैद्यची 4 जून रोजी हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कटरने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. ते कॅरीबॅगमध्ये ठेवले.

आरोपी हे तुकडे कुकरमध्ये शिजवायचा आणि मांस म्हणून कुत्र्यांना खाऊ घालत होता. त्यानंतर कळस म्हणजे त्याने शिजवलेले तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून जवळच असलेल्या नाल्यात नेऊन फेकले. असं करत त्याने अर्ध्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. नाल्यात तुकडे फेकण्यासाठी तो मोटारसायकल वापरत होता.

रुममध्ये काय सापडलं?

पोलिसांना 2 बीएचके फ्लॅटमधून लाकूड कापायचं कटर आढळलं. हे कटर हॉलमध्ये होतं. त्याचबरोबर प्लास्टिक बॅग्ज, कापलेले केस, आणि बेडरुममध्ये आणखी एक कटर होतं. तसेच रक्ताने भरलेल्या तीन बकेट आढळल्या आणि किचनमध्ये काही मृतदेहाचे तुकडे होते.

Video : आधी ओढणीने तिचा खून केला, नंतर रेल्वेखाली जाऊन त्याने केली आत्महत्या

पोलिसांनी या प्रकरणात मनोज सानेला अटक केली आहे. हत्येसाठी त्याने वापरलेले साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज