For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Mukesh Ambani : CS चं घेतोय शिक्षण, अंबानींना धमकी देणारा राजवीर कोण?

10:26 AM Nov 05, 2023 IST | प्रशांत गोमाणे
mukesh ambani   cs चं घेतोय शिक्षण  अंबानींना धमकी देणारा राजवीर कोण
mukesh ambani death threat two accused arrested who are the accuse
Advertisement

Mukesh Ambani Death Threat Two Accused Arrested : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन तरूणांना मुंबई पोलिसांनी शनिवारी तेलंगाणा आणि गुजरातमधून अटक केली आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या (क्राइम इंटेलिजेंस युनिट) गुजरातच्या गांधीनगरच्या कल्लोलवरून राजवीर खंत नावाच्या एका 20 वर्षीय तरूणाला अटक केली आहे. हा आरोपी Shadanchan@mailfence.com या ईमेल आयडीवरून शादाब खान नावाने अंबानींना धमकी द्यायचा. आरोपी त्याची मुळ ओळख लपवून हे काम करत असल्याने पोलिसांना त्याला अटक करण्यास उशीर झाला. आता देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला धमकी देणारा हा राजवीर कोण आहे? हे जाणून घेऊयात. (mukesh ambani death threat two accused arrested who are the accuse dark web vpn)

Advertisement Whatsapp share

VPN चा वापर करून धमक्या

आरोपी राजवीर हा खूप शातीर आहे. त्याने गेल्या शुक्रवारी धमकीचा पहिला ईमेल पाठवून 20 करोड रूपयाच्या खंडणीची मागणी केली. यानंतर त्याने आणखीण तीन ईमेल पाठवून खंडणीची मागणी 400 करोडपर्यंत नेली. तसेच खंडणी न दिल्यास अंबानींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. विशेष बाब म्हणजे आरोपीने धमकीचा ईमेल पाठवण्यासाठी वीपीएन मास्किंगचा वापर केला होता. याच कारणामुळे धमकीचा ईमेल नेटवर्क सुरुवातीला बेल्जिअमचे लोकेशन दाखवत होती. राजवीर खंत हा कंम्प्युटर सायंसच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. तसेच तो डार्क वेबपर्यंत पोहोचण्यासाठी कंम्प्युटरवर तासनतास बसून असायचा.

Advertisement

हे ही वाचा : Crime : भयंकर! भाजप नेत्याची निर्घृण हत्या, कुऱ्हाडीने वार करून शरीराचे केले तुकडे तुकडे

पोलिसांना दिलं आव्हान

राजवीर खंतने पोलिसांनाही थेट आव्हान दिले होते. धमकी देताना त्याने लिहिले होते, 'जर तुम्ही मला पकडू शकत असाल तर मला पकडा,असे आव्हान त्याने पोलिसांना दिले होते.

Advertisement सब्सक्राइब करा

दुसरा आरोपी बी कॉमचा विद्यार्थी

दरम्यान या प्रकरणात गामदेवी पोलिसांनी शनिवारी दुसरी अटक केली. तेलंगणातील 19 वर्षीय आरोपी गणेश रमेश वनपारधी असे त्याचे नाव आहे. तो
TY B.Com चा विद्यार्थी आहे. वनपारधीने मुकेश अंबानी यांना धमकीचा मेल पाठवून 500 कोटींची मागणी केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनपारधीने गेल्या आठवड्यात अंबानींना पाठवलेल्या धमकीच्या ईमेलची बातमी पाहिली आणि त्यानंतर त्याने जीमेल ईमेल आयडी वापरून धमकीचा ईमेलही पाठवला. दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे ही वाचा : Drugs वरून संजय राऊतांचं खळबळजनक विधान, ‘मुख्यमंत्र्यांचं कुटुंब ड्रग्स व्यवहारात…’

Dark Web काय आहे?

डार्क वेब हा इंटरनेटच्या दुनियेचा तो भाग आहे, जिथे तुमचे सर्च इंजिन पोहोचत नाही.हे एका विशेष वेब ब्राउझरद्वारे ऍक्सेस केले जाऊ शकतात. त्याचा भाग लहान आहे. कॅस्परस्कीच्या मते, तो खोल वेबचा भाग मानला जातो. उदाहरण द्यायचं झालं तर, ज्याप्रमाणे समुद्राच्या पृष्ठभागाच्या काही भागांमध्ये आणि पाण्याखालील पाण्यापर्यंत प्रवेश आहे, तसाच एक भाग देखील आहे जिथे अद्याप कोणीही पोहोचलेले नाही. डार्क वेब हा इंटरनेट जगताचा तसाच एक भाग आहे.

Advertisement

डार्क वेब हा अतिशय धोकादायक मानला जातो आणि येथे अनेक बेकायदेशीर कामे होतात. सायबर जगतातील हे जग बेकायदेशीर कामांचे ठिकाण मानले जाते. एकेकाळी या जगावर हॅकर्स, कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी आणि सायबर गुन्हेगारांचे वर्चस्व होते.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज