For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Mumbai Crime : मुंबईत तरुणीवर शेजारी राहणाऱ्या मुलांनीच आळीपाळीने...; उच्चभ्रू वसाहतीत काय घडलं?

03:55 PM Nov 19, 2023 IST | प्रशांत गोमाणे
mumbai crime   मुंबईत तरुणीवर शेजारी राहणाऱ्या मुलांनीच आळीपाळीने     उच्चभ्रू वसाहतीत काय घडलं
mumbai barc gang rape case two boy gang rape a girl babha automic research Center mumbai crime stoy
Advertisement

Mumbai Barc Gang Rape:मुंबईच्या चेंबूर (chembur) भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चेंबूर भागात असलेल्या भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (Bhabha Automic Research Center)क्वाटरमधील फ्लॅटमध्ये तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.भाभा अणुसंशोधन केंद्राच्या क्वाटरमध्ये ही घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. आता या तरूणीसोबत बार्कच्या क्वाटरमध्ये नेमकं काय़ घडलं आहे? या घटनेतील आरोपींना अटक झाली आहे का? हे जाणून घेऊयात. (mumbai barc gang rape case two boy gang rape a girl bhabha atomic research Center mumbai crime story)

Advertisement Whatsapp share

चेंबूर पोलिसांनी (Chembur Police) दिलेल्या माहितीनूसार, भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (Barc)क्वाटरमध्ये 15 नोव्हेंबरला ही घटना घडली आहे. पिडीत तरूणी क्वाटरमधील रूममध्ये जेवण बनवत होती. यावेळी तिला एका सामानाची गरज होती. यासाठी ती आरोपीच्या घरी गेली. यावेळी आरोपीने तिला गूंगीचे औषध मिसळलेलं कोल्ड्रिक प्यायला दिले. ज्यामुळे ती आरोपीच्या घरातच बेशुद्ध झाली होती. तरूणी बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने आपल्या मित्राला बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

Advertisement

हे ही वाचा : Bhujbal Vs Damania : घर लाटल्याच्या दमानियांच्या आरोपांवर भुजबळांचं उत्तर, फर्नांडिस प्रकरण नेमकं काय?

बलात्काराच्या घटनेनंतर पिडीत तरूणी रात्री 12.30 च्या सुमारास शुद्धीवर आली होती. तरूणी शुद्धीवर आल्यानंतर तिला तिच्यासोबत बलात्कार झाल्याचे कळाले. या घटनेने घाबरून पीडित तरूणीने आपल्या रूमकडे धाव घेतली होती.

Advertisement सब्सक्राइब करा

दरम्यान पीडित तरूणी ही पालघर जिल्हयातील बोईसरमध्ये तिच्या आई आणि बहिणीसोबत राहते. तिचे वडील भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये काम करतात. त्यांना वर्षभरापूर्वीच या केंद्रामध्ये फ्लॅट मिळाला होता. त्यामु्ळे ती नेहमी वडिलांजवळ येऊन जाऊन राहायची. घटनेच्या दिवशी देखील पिडीत तरूणी केंद्रात आली होती.

या घटनेतील आरोपीचे वडील देखील याच भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये काम करत होते. त्यामुळे आरोपी तरूण देखील याच केंद्रातील फ्लॅटमध्ये त्याच्या वडिलांसोबत राहत होता. यावेळी आरोपी तरूणाच्या घरी आई वडीन नसल्याने तरूणाने मित्रासोबत मिळून हे कृत्य केले होते.

Advertisement

पीडीत तरूणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणात अजित कुमार यादव (26) आणि त्याचा मित्र प्रभाकर यादव (30) या दोघांना अटक केली आहे. या दोघांना पोलिसांनी कोर्टात हजर केले असता त्यांनी 20 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सूरू आहे.

हे ही वाचा : Miss Universe Winner : निकारागुआच्या शेनिस पॅलासिओसने जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा किताब

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज