For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Mumbai Crime : पतीसोबत भांडण झालं अन् पडली घराबाहेर, नंतर गार्डनमधील शौचालयात...

12:59 PM Oct 31, 2023 IST | प्रशांत गोमाणे
mumbai crime   पतीसोबत भांडण झालं अन् पडली घराबाहेर  नंतर गार्डनमधील शौचालयात
mumbai crime news women burn in garden washroom mulund shocking story
Advertisement

Mumbai Crime News : मुलुंडमधून (Mulund) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिलेचा तिच्या नवऱ्याशी वाद झाला होता. या वादानंतर महिला संतापून घराबाहेर पडली होती. या सर्व घटनेनंतर एका गार्डनच्या शौचालयात (washroom) तिला जळालेल्या अवस्थेत प्रत्यक्षदर्शीने पाहिले होते. ही घटना प्रत्यक्षदर्शीने पाहताच आग विझवून तिला रूग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. स्नेहल अमित बोबडे असे या मृत महिलेचे नाव आहे. आता या महिलेने आत्महत्या केली आहे की तिची हत्या करण्यात आली आहे? या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. (mumbai crime news women burn in garden washroom mulund shocking story)

Advertisement Whatsapp share

मुलुंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत स्नेहल बोबडे या ठाण्याच्या रघुनाथ नगर येथे पतीसोबत राहत होत्या. स्नेहल या खाजगी नोकरी करत होत्या. या दरम्यान रविवारी स्नेहला यांचा त्यांच्या पतीशी वाद झाला होता. या वादानंतर स्नेहल घराबाहेर पडल्या होत्या. या घटनेनंतर रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास एका गार्डनमधील शौचालयातून धूर येत होता.

Advertisement

हे ही वाचा : Manoj Jarange पाटलांची CM शिंदेंकडे मोठी मागणी, अर्धा तास काय झाली चर्चा?

ही घटना गार्डनचा सुरक्षारक्षक आनंद मिश्रा याने पाहताच तत्काळ शौचालयाकडे धाव घेतली होती. यावेळी शौचालयात स्नेहल जळालेल्या अवस्थेत दिसल्या होत्या. यावेळी ही आग तत्काळ विझवून स्नेहल यांना तत्काळ अग्रवाल रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी स्नेहल यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

दरम्यान आता या घटनेत स्नेहल यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे की त्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा कसून तपास सूरू आहे. मात्र प्राथमिक माहितीनुसार स्नेहल यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणात सुरक्षा रक्षक आनंद मिश्रा आणि मृत महिलेचा पती अमित बोबडे यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. त्याचसोबत या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

हे ही वाचा : Manoj Jarange : प्रकाश आंबेडकर, बच्चू कडूंचं घेतलं नाव; जरांगे पाटील काय बोलले?

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज