For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Navi mumbai Crime : मॅट्रिमोनियल साईटवर भेट, महिलेला भुलवून घेऊन गेला हॉटेलवर; नंतर...

11:41 AM Nov 06, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
navi mumbai crime   मॅट्रिमोनियल साईटवर भेट  महिलेला भुलवून घेऊन गेला हॉटेलवर  नंतर
Navi mumbai Crime Met on matrimonial site accused tricked woman and took her to hotel Later he raped and made obscene videos
Advertisement

Crime News : दिवसेंदिवस आपल्या आसपासच्या परिसरात गुन्हेगारीच्या अनेक घटना घडत आहेत. महिलांसाठी असलेल्या सुरक्षेवरही या घटनांनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. असंच एक प्रकरण नवी मुंबई (Navi Mumbai) परिसरात घडलं आहे. सिंगापूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने नवी मुंबईतील एका 33 वर्षीय महिलेशी मॅट्रिमोनियल साईटवरून संपर्क साधला. यानंतर त्याने लग्नाच्या बहाण्याने महिलेला भेटण्यासाठी अनेक ठिकाणी बोलावून तिच्यावर बलात्कार (Rape Case) केला. याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनीही गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Navi mumbai Crime Met on matrimonial site accused tricked woman and took her to hotel Later he raped and made obscene videos)

Advertisement Whatsapp share

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत राहणाऱ्या या 33 वर्षीय महिलेने सिंगापूर येथे राहणाऱ्या या व्यक्तीला मॅट्रिमोनियल साईटवर (Matrimonial Site) पाहिले होते. यानंतर दोघांनी लग्नासाठी संपर्क केला. सिंगापूरमध्ये राहणाऱ्या आरोपीने महिलेशी लग्नाची बोलणी करून तिला अनेक ठिकाणी भेटायला बोलावले.

Advertisement

वाचा: ST Bus Strike: गुणरत्न सदावर्तेंमुळे CM शिंदेंचं ऐन दिवाळीत वाढणार टेन्शन?

महिलेने तक्रारीत आरोप केला आहे की, डिसेंबर 2020 ते मार्च 2023 या कालावधीत आरोपीने तिला नवी मुंबई, मुंबई आणि सिंगापूर येथील लॉज आणि हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले, जिथे तिच्यावर अनेकदा बलात्कार झाला.

Advertisement सब्सक्राइब करा

आरोपीने अश्लील फोटो काढत व्हिडीओही बनवले

पोलिसांचे म्हणणे आहे की, महिलेचा आरोपीशी मॅट्रिमोनियल साईटवर संपर्क झाला होता. आरोपीने तिला लग्नाचे आश्वासन दिले. याच बहाण्याने आरोपीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी भेटीसाठी बोलावले होते.

वाचा: Crime : मोबाईलमधील अश्लील फोटोमुळे आत्महत्येचं उलगडलं गूढ; सांताक्रुझमधील ‘ते’ प्रकरण काय?

आरोपीने महिलेचे आक्षेपार्ह फोटो काढून व्हिडीओही बनवले होते. याप्रकरणी सध्या कोणालाही अटक करण्यात आली नसून पुढील तपास करण्यात येत आहे. अशी पोलिसांनी माहिती दिली आहे.

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज