For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

हात-पाय बांधून पुजाऱ्याची केली हत्या, 2 महिलांनी घडवलं भयानक कांड

10:44 AM Nov 13, 2023 IST | mahadev kamble
हात पाय बांधून पुजाऱ्याची केली हत्या  2 महिलांनी घडवलं भयानक कांड
या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 73 वर्षाचे असलेले रमेशचंद्र त्रिपाठी यांचा मृतदेह बुधी ठाकुराणी मंदिराजवळील घरात मृतावस्थेत आढळून आला. रमेशचंद्र त्रिपाठी यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासकार्याला सुरुवात केली.
Advertisement

Pujari Murder: ओडिशामध्ये रविवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कोरापूट जिल्ह्यातील एका मंदिराच्या पुजाऱ्याची दोन महिलांसह 7 जणांनी हत्या (Murder) केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी (Police) सांगितले की, 73 वर्षाचे असलेले रमेशचंद्र त्रिपाठी यांचा मृतदेह बुधी ठाकुराणी मंदिराजवळील घरात मृतावस्थेत आढळून आला.

Advertisement Whatsapp share

महिलांनी रचला कट

रमेशचंद्र त्रिपाठी यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासकार्याला सुरुवात केली. त्रिपाठी यांच्या घरात काम करणाऱ्या दोन महिलांची पोलिसांनी चौकशी सुरु केल्यानंतर या प्रकरणाचा उलघडा झाला. यावेळी त्यांनी सांगितले की, आणखी काही साथीदारांच्या मदतीने आम्ही त्रिपाठी पुजाऱ्यांची हत्या केल्याचे त्यांनी कबूल केले. याप्रकरणी आता सरस्वती जानी (वय 20), रामा गौडा (21), प्रताप टाकरी (24), किशन बाग (20), नीरज बेनिया (21), महेंद्र पाणिग्रही (25) आणि अशोक रे (35) या आरोपींचा या प्रकरणात समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

हे ही वाचा >> अनैतिक संबंधातून पतीसोबत भयानक कांड, झोपेत गळा घोटला, मृतदेहाचे तुकडे तुकडे…

तोंडात कोंबला कापडाचा बोळा

रमेश त्रिपाठी हे त्यांच्या घरी एकटेच राहत होते. हे त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलांना माहिती होते.त्यामुळे त्यांनी त्यांच्या साथीदारांसह पुजाऱ्याच्या घरातील मौल्यवान वस्तू लुटण्याचा त्यांनी कट रचला. घरातील किंमती वस्तू लुटण्यासाठी त्या दोन महिलांसह त्याचे साथीदार त्रिपाठींच्या घरात घुसले तेव्हा, त्यांनी मदतीसाठी आरडाओरडही केला. मात्र त्यांचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी त्या टोळीने त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा घातला होता. तर हालचाल करु नये यासाठी त्यांचे हातपायही बांधले होते, या सर्व प्रकारामुळे त्यांचा त्यामध्ये गुदमरुन मृत्यू झाला.

Advertisement सब्सक्राइब करा

सगळं घर लुटलं

पुजाऱ्याची हत्या झाल्यानंतर आरोपींनी घरातील कपाटातील दागिने, पैसे घेऊन हे सगळे फरार झाले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करत आरोपींना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडून 15 हजार रुपये रोख, सोन्या-चांदीचे दागिने आणि 6 मोबाईल जप्त केले आहेत.

हे ही वाचा >> OBC नोंद असलेला शरद पवारांचा दाखला व्हायरल, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज