For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

दिल्ली ते पुणे... डेटिंग अ‍ॅपवर भेटलेल्या प्रेमानेच केला 'गेम', तुम्हीही व्हा सावध!

12:43 PM Nov 02, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
दिल्ली ते पुणे    डेटिंग अ‍ॅपवर भेटलेल्या प्रेमानेच केला  गेम   तुम्हीही व्हा सावध
Online Dating shocking cases in Delhi And Pune you Also Be careful too
Advertisement

Online Dating App Scam : आजकाल डेटिंग अ‍ॅप्सचा वापर सामान्य झाला आहे. चांगले पार्टनरच्या शोधात अनेकजण डेटिंग अ‍ॅप्स वापरतात. पण डेटिंग अ‍ॅप (Dating App) वापरण्याचे काही तोटेही आहेत. हे अ‍ॅप वापरताना, स्वतःच्या सुरक्षितता खूप महत्वाची आहे. अनेकवेळा लोक डेटिंग अ‍ॅप्स डेट करायला लागतात आणि शोषणाला बळी पडतात. अशाच दोन प्रकरणांबद्दल जाणून घेऊयात. ज्यांना डेटिंग अ‍ॅपवरून प्रेम करणं महागात पडलं आहे. (Online Dating shocking cases in Delhi And Pune you Also Be careful too)

Advertisement Whatsapp share

पुण्यात राहणारे सपना-सचिन (बदललेले नाव), अ‍ॅडव्हेंचर सीकिंग या डेटिंग अ‍ॅपवरून एकमेकांना भेटले. प्रेमाच्या शोधात असलेल्या सचिनला सपना आपल्यासाठी परफेक्ट असेल असे वाटले. त्यांच्यात बोलणं सुरू झालं, काही दिवसानंतर सपनाने तिचा नंबर दिला, त्यानंतर दोघांमध्ये टेलिग्रामवर खासगी बोलणं सुरू झालं. दोघांनीही एकमेकांना त्यांचे फोटो पाठवायला सुरुवात केली. मग एक दिवस हॉटेलवर भेटायचं ठरलं. सचिनने पुणे गेट हॉटेलमध्ये स्वत:साठी रूम बुक केली.

Advertisement

वाचा: Maratha Reservation : “…तर तुम्ही मूर्ख, मुर्दाड आहात”, किरण मानेंची खरमरीत पोस्ट

सपना सचिनला भेटायला आली. दोघांमध्ये कोणतेही नाते निर्माण होण्यापूर्वी सपनाने आपल्या काही अडचणींबद्दल सांगत सचिनकडे तातडीने 12 हजार रुपये मागितले. त्याने ते लगेच दिले. तो संबंध ठेवण्यासाठी उत्साही होता, पण तिच्या मनात काही वेगळंच होतं. तिने त्याच्याकडे पुन्हा ३८ हजार रुपये मागितले.

Advertisement सब्सक्राइब करा

पैसे देण्यास नकार देताच केली बेदम मारहाण!

सपना आपली फसवणूक करत आहे हे सचिनला समजू लागले होते. त्याने पैसे देण्यास नकार दिला. यानंतर तिने कुणालातरी फोन लावला, त्यानंतर काही लोक त्यांच्या हॉटेल रूममध्ये घुसले आणि सचिनला बेदम मारहाण केली. त्याच्याकडे असलेले पैसे, घड्याळ, सोन्याची चैन, अंगठी हे सर्व लुटून त्यांनी तिथून पळ काढला. सचिनने कशीतरी हिंमत करून पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना याबद्दल सगळी माहिती दिली.

पोलिसांनी भादंवि कलम 394, 506 आणि 34 अन्वये अज्ञात लोकांविरुद्ध 90 हजार रुपयांच्या लुटमारीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध सुरू होता. इकडे सपना आणि तिचे साथी मुंबईत आणखी एका बळीच्या बकऱ्याच्या शोधात होते. यावेळी पुणे पोलिसांना याची माहिती हाती लागली. पोलिसांनी तिथे जाऊन त्यांना अटक केली.

Advertisement

वाचा: Mumbai Crime : जीव वाचवण्यासाठी बाथरूमकडे धावली, पण…; मीरा रोडमध्ये भयंकर हत्याकांड

दरवर्षी लाखो लोक ऑनलाइन फसवणुकीला पडतायेत बळी

दरवर्षी मोठ्या संख्येने लोक ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरत आहेत. त्यात मुख्यतः तरुणांचा समावेश आहे, जे खऱ्या प्रेमाच्या शोधात डेटिंग अ‍ॅप्स वापरतात. एका अहवालानुसार, सध्या आपल्या देशात जवळपास 3 कोटी लोक डेटिंग अ‍ॅप्स वापरत आहेत. 2024 पर्यंत ही संख्या 5 कोटी होईल. यासोबतच डेटिंग अ‍ॅप्सचा उद्योग सुमारे 3 हजार 700 कोटी रुपयांचा आहे, जो येत्या दोन वर्षांत सुमारे 6 हजार 500 कोटी रुपयांपर्यंत वाढेल. भारतीय तरुण या डेटिंग अ‍ॅप्सवर सरासरी तीन तास घालवतात.

दिल्लीच्या तरूणाने स्विस तरुणीची केली हत्या, कारण...

2021 मध्ये स्वित्झर्लंडची राजधानी झुरिच येथे राहणारी नीना बर्गर एका डेटिंग अ‍ॅपद्वारे दिल्लीच्या गुरप्रीत सिंगच्या संपर्कात आली. काही दिवस संपर्कात राहिल्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर गुरप्रीत तिला भेटण्यासाठी झुरिचला गेला. हे अनेकवेळा सुरू राहिलं. गुरप्रीतला तिच्याशी लग्न करायचे होते. याबाबत तिच्याशी किमान सहा ते सात वेळा बोलणे झाले होते. पण तिने लग्नाला स्पष्ट नकार दिला. नीनाने नकार दिल्याने गुरप्रीत नाराज झाला.

यानंतर 2023 मध्ये त्याने तिला संपवण्याचा निर्णय घेतला. या कटाचा एक भाग म्हणून त्याने 11 ऑक्टोबर रोजी नीनाला बहाण्याने दिल्लीला बोलावले. हत्येच्या दोन दिवस अगोदर 16 ऑक्टोबर रोजी जनकपुरी येथील एका दुकानातून त्याने 600 रुपयांना साखळी आणि कुलूप खरेदी केले होते. यानंतर नीनाचे हात-पाय त्याच साखळी आणि कुलूपाने बांधले.

वाचा: Mumbai Crime : मेहंदीवाले केस, कानातले…; महिलेची हत्या करणारा कसा सापडला?

18 ऑक्टोबरच्या रात्री सेन्ट्रो कारमध्ये नीनाची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. तिचा मृतदेह दोन दिवस त्याच सेन्ट्रो कारमध्ये पडून होता. दरम्यान, संधी साधून त्याने मृतदेह काळ्या पॉलिथिनमध्ये गुंडाळून टिळक नगर परिसरातील सरकारी शाळेजवळ फेकून दिला. 20 ऑक्टोबर रोजी एका दूधवाल्याला हे आढळलं आतून उग्र वास येत होता. कोणाचा तरी मृतदेह असल्याचा अंदाज त्याला आला. मृतदेह पडलेल्या जागेच्या अगदी समोर असलेल्या घरात राहणाऱ्या लोकांना त्याने माहिती दिली. पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. यानंतर जेव्हा सीसीटीव्ही फुटेज पाहिली तेव्हा आरोपीची ओळख पटली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली, तेव्हा हा धक्कादायक खुलासा झाला.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज