For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

मृतावर गोळीबार, सर्जिकल ब्लेडने केल्या जखमा, सुनेचा बदला घेण्यासाठी सासऱ्याने असा रचला कट

01:08 PM Nov 17, 2023 IST | mahadev kamble
मृतावर गोळीबार  सर्जिकल ब्लेडने केल्या जखमा  सुनेचा बदला घेण्यासाठी सासऱ्याने असा रचला कट
6-7 लोकांनी वडील सुरेश यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करुन त्यांना जखमी केले आहे. तर त्यांच्या मामाचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. दीपकने आपल्या सासरच्या लोकांवर हत्या केल्याचा आणि जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप केला होता.
Advertisement

UP Crime : एखादी व्‍यक्‍ती एखाद्याला खोट्या प्रकरणात अडकवण्‍यासाठी काय-काय करू शकते त्याचा एक नमुना उत्तर प्रदेशातील एटामध्ये (Uttar Pradesh Etah) घडला आहे. एटामधील एका सासऱ्याने आपल्या सून आणि तिच्या कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी एक मोठा कट (Murder Plan) रचला होता. मात्र त्याचा तो कट फार काळ टिकला नाही. पोलिसांनी त्याचा तो प्रकार उघडकीस आणत त्याचा खोटेपणा सगळ्यांसमोर आणला आहे.

Advertisement Whatsapp share

जीवघेणा हल्ला

एटामधील जैथरा पोलीस स्टेशनमध्ये 11 नोव्हेंबर रोजी दीपक नावाच्या व्यक्तीने एक गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी त्याने सांगितले की,  ते पारोळीचे रहिवासी आहेत. त्यांनी सांगितले की, 6-7 लोकांनी वडील सुरेश यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करुन त्यांना जखमी केले आहे. तर त्यांच्या मामाचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी दीपकने आपल्या सासरच्या लोकांवर हत्या केल्याचा आणि जीवघेणा हल्ला चढविल्याचा आरोप केला होता.

Advertisement

पिता-पुत्राच्या बोलण्यात फरक

त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपासही सुरू केला. त्यानंतर मात्र पिता-पुत्राच्या  बोलण्यात सातत्याने बदलत जाणवत गेला. त्यामुळे त्यांच्यावरच पोलिसांनी संशय व्यक्त केला. संशय बळावल्याने  पोलिसांनीही त्यांची कसून चौकशी सुरु केली. चौकशीनंतर मात्र त्यांना समजलं की, सुनेचा बदला घेण्यासाठी त्यांनी हा कट रचला आहे. या प्रकरणात एका डॉक्टरचाही समावेश असल्याने त्यालाही आता अटक करण्यात आली आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

खोट्या गुन्ह्यासाठी केला गोळीबार

पोलिसांनी त्यानंतर चौकशीला सुरुवात केल्यानंतर दीपकने सांगितले की, 2019 मध्ये त्याचे लग्न झाले होते. मात्र त्याच्या पत्नीचे त्यांच्याच नात्यातील मुलासोबत अफेअर सुरू झाले होते. हे प्रेमप्रकरण दीपकला समजल्यानंतर त्याने पत्नीला त्याचा जाबही विचारला होता.  त्यावरुन दोघांमध्ये जोरदार वादही झाले होते. तर त्याच कारणावरून त्यानंतर दीपकची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली. ती माहेरी गेल्यानंतर तिला वारंवार फोन करूनही ती आली नसल्याने पत्नीविरुद्ध दीपकने न्यायालयात खटला दाखल केला. ही खटला चालू असतानाच दीपकच्या वडिलांच्या मनात विचार आला की, षडयंत्र रचून सासरच्या लोकांना खोट्या गुन्ह्यात का अडकवू नये आणि तसा सल्लाही वडिलाने आपल्या मुलाला दिला.

हे ही वाचा >> Titwala Crime: रेल्वे ट्रॅकवरून घरी परतत होती महिला, नराधमाने ओढलं झुडपात अन्…

मृतावर झाडल्या गोळ्या

वडिलांच्या त्या प्लॅननुसार दीपकही त्यासाठी तयार झाला, त्यामध्ये एका डॉक्टरलाही घेण्यात आले. सासरच्या लोकांना अडकवण्यासाठी दीपकने आधी पिस्तुल आणले. त्यानंतर त्याने त्याच्याच मृत मामावर गोळीबार केला. मात्र त्याआधी डॉक्टरांच्या मदतीने मामाच्या शरीरावर हल्ल्याच्या खुणाही करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुरेश आणि दीपकच्या अंगावरही सर्जिकल ब्लेडने काही जखमा करण्यात आल्या. त्यातून त्यांना आपल्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचे दाखवायचे होते.

Advertisement

हल्लयाचे केले नाटक

हे हल्ल्याचे नाटक करुन झाल्यानंतर त्यांनी सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या जीवघेणा हल्ल्याचे नाटक करताना मुलगा आणि वडील दोघंही त्या प्रकरणात फसले आणि खोटं बोलल्यामुळे उघडे पडले. पोलिसांनीही त्यानंतर त्यांना तात्काळ अटक केली आणि न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी आता आरोपी डॉक्टरलाही अटक करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

हे ही वाचा >> Crime : गर्लफ्रेंडला निर्जनस्थळी बोलावलं अन् गळा चिरला, बॉयफ्रेंडने हत्या का केली?

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज