For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Mumbai Crime: भांडणानंतर प्रेयसीने केलं ब्लॉक, वरळीतील पोलिसाने घेतला गळफास

07:45 PM Nov 21, 2023 IST | mahadev kamble
mumbai crime  भांडणानंतर प्रेयसीने केलं ब्लॉक  वरळीतील पोलिसाने घेतला गळफास
इंद्रजीत सांळुखेचे आणि त्याच्या प्रेयसीचे एप्रिल 2023 पासून प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काल त्यांचे चॅटिंग करण्यावरुन वाद झाला होता. त्यानंतर ती दोघंही वरळी सी फेस येथे भेटली होती. त्यावेळीही त्यांचा वाद झाला.
Advertisement

Police Suicide : इन्स्टाग्रामवरुन इतर मुलींबरोबर चॅट (Chat) करतो म्हणून पोलीस असणाऱ्या प्रियकराबरोबर प्रेयसीचे (Girlfriend with boyfriend) भांडण झाले. त्या दोघांमधील वाद इतका टोकाला गेला की, त्याच वादातून पोलीस वसाहतीती राहणाऱ्या पोलिसाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसाने आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी पोलीस शिपायाने गळफास घेत असल्याचा फोटो प्रेयसीच्या मैत्रिणीला पाठवला असल्याचेही सांगण्यात आले आहे. या प्रकरणी वरळी पोलिसात गुन्हा (Crime) दाखल झाला असून पोलीस संबंधित व्यक्तींची तपासणी करत आहेत.(police constable committed suicide girlfriend mumbai worli ended his life by sending photos on whatsapp)

Advertisement Whatsapp share

खिडकीला लावला गळफास

ज्या पोलीस शिपायाने आत्महत्या केली आहे. तो स्थानिक पोलीस दलाच्या भोईवाडामध्ये सेवा बजावत होता. आत्महत्या केलेल्या शिपायाचे इंद्रजीत साळुंखे (वय 27) असून तो वरळी पोलिस वसाहतीत राहत होता. अभ्यासिकेच्या खिडकीला दोरीच्या साहाय्याने इंद्रजीत साळुंखेने गळफास घेत आत्महत्या केली असून आत्महत्या करण्याआधी त्याने आत्महत्या करत असल्याचा फोटो काढला, व त्याने तो व्हाटसअपवरूनही पाठवला होता.

Advertisement

हे ही वाचा >> 2000 मुली, 6 मसाज पार्लर, अय्याशीत जगलेला सेक्स किंग, आता भोगतोय…

प्रेयसीने केले ब्लॉक

इंद्रजीत सांळुखेचे आणि त्याच्या प्रेयसीचे एप्रिल 2023 पासून प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काल त्यांचे चॅटिंग करण्यावरुन वाद झाला होता. त्यानंतर ती दोघंही वरळी सी फेस येथे भेटली होती. त्यावेळीही त्यांचा वाद झाला. वाद झाल्यानंतर त्याने प्रेयसीला दादर स्टेशनलाही आणून सोडले होते. त्यावेळी प्रेयसीने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला हे त्याला समजले. त्या गोष्टीवरुन तो प्रचंड नाराज झाला होता. आपल्याला प्रेयसीने ब्लॉक केल्यामुळेच त्याने गळफास घेत असल्याचा फोटो काढून त्याने तिच्या मैत्रिणीला पाठवला व त्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली.

Advertisement सब्सक्राइब करा

चॅटिंगवरुन झाला वाद

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत इंद्रजीत सांळुखेचा मृतदेह ताब्यात घेतला, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या जबाब नोंदवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंद्रजीत आणि त्याची प्रेयसीचे गेल्या काही दिवसांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. मात्र मोबाईलमधील चॅटिंगवरुन त्या दोघांमध्ये वाद झाला होता. इंद्रजीत प्रेयसी आणि अन्य मुलींसोबत चॅटिंग करत असल्याच्या कारणावरुन त्या दोघांमध्ये प्रचंड वाद झाला होता. त्यावरुनच त्याच्या प्रेयसीने त्याला ब्लॉक केले होते. त्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलत आपण आत्महत्या करत असल्याचे सांगत प्रेयसीच्या मैत्रिणीला फोटो पाठवत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हे ही वाचा >> Parenting Tips : पालकांच्या ‘या’ सवयी मुलांच भविष्य करतात खराब, आजच बदला

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज