For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

घरासमोरच पोलीस अधिकाऱ्यावर झाडल्या गोळ्या, तपासात झाली धक्कादायक माहिती उघड

06:14 PM Nov 14, 2023 IST | mahadev kamble
घरासमोरच पोलीस अधिकाऱ्यावर झाडल्या गोळ्या  तपासात झाली धक्कादायक माहिती उघड
ज्यावेळी पोलीस अधिकाऱ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. मात्र ज्यावेळी ही बातमी शहरात पसरली तेव्हा मात्र मोठी खळबळ उडाली.
Advertisement

Police Murder: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील इन्स्पेक्टरची गोळ्या झाडून हत्या (Murder) करण्यात आली आहे. ज्या इन्स्पेक्टरची (Inspector) हत्या करण्यात आली आहे ते प्रयागराजमध्ये (Prayagraj) सेवा बजावत होते. रात्री उशिरा ते कुटुंबासह घरी जात होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या गोळ्या झाडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला तेव्हा, त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि 10 वर्षाचा त्यांचा मुलगाही त्यांच्यासोबत होता.

Advertisement Whatsapp share

हल्लेखोरांनी डाव साधला

ज्यावेळी पोलीस अधिकाऱ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. मात्र ज्यावेळी ही बातमी शहरात पसरली तेव्हा मात्र मोठी खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत यापो प्रकरणाचा तपास सुरू केला.

Advertisement

सुट्टीसाठी गावी

अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात ठार झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव सतीश कुमार सिंग असे आहे. ते जून 2023 पासून ते प्रयागराजच्या चौथ्या बटालियनमध्ये कॅम्प इन्स्पेक्टर म्हणून सेवा बजावत होते. ते मूळचे रायबरेली जिल्ह्यातील होते. 11 नोव्हेंबर रोजी ते प्रयागराजहून लखनऊला सुट्टी घेऊन आले होते. ज्या परिसरात राहतात त्या परिसरातील शेवटचे घर एसके सिंह यांचे आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

हे ही वाचा >> NCP: शरद पवार म्हणाले ‘तब्येत बरी नाही’, पण अजितदादा तर गेलेले किल्ले पाहायला…

हल्लेखोर का दिसले नाहीत

पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्यानंतर आता अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. दिवाळीच्या रात्री ते कारमधून येत होते तर त्या कारच्या प्रकाशात समोरुन आलेले हल्लेखोर कसे काय दिसू शकले नाहीत. जर कोणी त्यांचा पाठलाग करत असेल तर एसके सिंग त्यांच्या मूळ गावी आले याची त्यांना माहिती कोणी दिली असा सवाल आता पोलीस खात्यातून उपस्थित केला जात आहे.

अनेक महिलांबरोबर अनैतिक संबंध

ही हत्या करताना त्यांच्यावर 4 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. मृताच्या मानेजवळ आणि कानाजवळ दोन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. तर त्यातीलच एक गोळी मृताच्या हाताला लागली आहे. तर चौथी गोळी त्यांना लागली नाही.पोलिसांनी सांगितले की, एसके सिंग यांचे अनेक महिलांबरोबर अनैतिक संबंध होते. त्या कारणामुळेही त्यांच्या घरात वारंवार वाद होत होते. त्यांची पत्नी सतत त्यांच्याबरोबर वाद घालत होती. ही माहिती त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलीने दिली आहे.

Advertisement

गेट लावतानाच हल्ला

याबाबत मृताच्या 10 वर्षांच्या मुलीने सांगितले की आम्हाला दिवाळी साजरी करायची होती म्हणून आम्ही मावशीच्या गावी गेलो होतो. त्यानंतर रात्री 2 वाजता आम्ही घरी परतलो तेव्हा वडील गेट लावण्यासाठी खाली आले होते. त्याचवेळी गोळीबार केल्याचा आवाज आला. त्यामुळे आई बाहेर धावत आली मात्र काळोखातून कोणीतरी पळून गेला असल्याची फक्त त्याची सावली दिसली. एसके सिंग यांच्या पत्नी म्हणाल्या की, आमचा इथे कोणाबरोबरही वाद नाही. मात्र काही वेळापूर्वी एक महिला आणि तिची मुलगी घरी येताना दिसली होती. त्याबाबत मला काही सिंग यांनी सांगितले नव्हते. मात्र ती वेश्या होती असं त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा >> Mumbai मधील हवेची गुणवत्ता ढासळली, दिवाळीनंतर सर्वाधिक प्रदूषण!

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज