For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

महिला टिचर आणि बॉयफ्रेंड... विद्यार्थ्याच्या हत्येची अंगावर काटा आणणारी कहाणी जशीच्या तशी...

05:23 PM Oct 31, 2023 IST | mahadev kamble
महिला टिचर आणि बॉयफ्रेंड    विद्यार्थ्याच्या हत्येची अंगावर काटा आणणारी कहाणी जशीच्या तशी
कुशाग्रच्या हत्येनंतर प्रभातने पोलिसांची दिशाभूल करण्याचा कट रचल्याचे सांगितले जात आहे. आणि हा खंडणीसाठी खुनाचा कट होता. कुशाग्रच्या हत्येत आपले नाव येऊ नये, अशी प्रभातची इच्छा होती.
Advertisement

Love Triangle : कानपूरमधील एका बड्या उद्योजकाची मुलाची हत्या (Son Murder) झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ज्याची हत्या झाली आहे, तो कुशाग्र हा दहावीचा विद्यार्थी (Student Death) होता. सोमवारी तो आपल्या ट्यूशनसाठी (Private Tutation) स्कुटीवरून घरातून बाहेर पडला होता. मात्र तो उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे घरचेही चिंतेत होते. तर दुसरीकडे एका अनोळखी व्यक्तीने कुशाग्रच्या घरावर 30 लाखांची खंडणी पाहिजे अशा आशयाची एक चिठ्ठी टाकून उद्योजकाच्या मुलाचे अपहरणाच्या (Kidnap) संशयामुळे पोलिसांनीही त्यादृष्टीने तपास सुरू केला. या प्रकरणात पोलीस सहआयुक्तांनी सहभाग घेत तपास सुरु करताच दुसऱ्या दिवशी कुशाग्रचा मृतदेह (Dead body) सकाळी आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी आता अनेक धक्कादायक खुलासा केला आहे.

Advertisement Whatsapp share

विद्यार्थी शिक्षिकेच्या घरात गेला अन्...

पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर सांगितले की, उद्योजकाचा 16 वर्षाचा मुलगा कुशाग्रचा मृतदेह फाजलगंज पोलीस स्टेशन परिसरात आढळला. त्याच्या ट्यूशनच्या शिक्षिका रचिताच्या घराच्या स्टोअर रूममध्येच त्याचा मृतदेह आढळून आला आहे. ज्या व्यक्तीने कुशाग्रचा गळा दाबून हत्या केली आहे. तो त्याची शिक्षिका रचिताचा प्रियकर प्रभात आहे. गेल्या काही दिवसांपासून कुशाग्रचे रचितासोबत अफेअर असल्याचा संशय प्रभातला होता. त्या संशयातूनच त्याने नियोजन करुन त्याने कुशाग्रची गळा दाबून हत्या केली आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात रचिता आणि प्रभातचा मित्र आर्यन हाही या गुन्ह्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

हे ही वाचा >> Maratha Reservation: “…तर आज आंदोलनाची वेळच आली नसती”, बावनकुळे ठाकरेंवर भडकले

दिशाभूल करण्याचा कट

कुशाग्रच्या हत्येनंतर प्रभातने पोलिसांची दिशाभूल करण्याचा कट रचल्याचे सांगितले जात आहे. आणि हा खंडणीसाठी खुनाचा कट होता. कुशाग्रच्या हत्येत आपले नाव येऊ नये, अशी प्रभातची इच्छा होती. अपहरणाच्या दृष्टिकोनातून या हत्येचा तपास करण्यात पोलीस व्यस्त होते. यासाठी प्रभातने त्याचा मित्र आर्यनची मदत घेतली.

Advertisement सब्सक्राइब करा

खंडणीचं रचलं नाट्य

रचिताच्या घरात कुशाग्रची हत्या केल्यानंतर प्रभातने तिची स्कूटर उचलली. मग काही अंतरावर जाऊन आर्यनला बसवले. याच स्कूटरवरून कुशाग्र रचिताच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे. पुढे जाऊन प्रभातने स्कूटरची नंबर प्लेट बदलली आणि तो थेट कुशाग्रांच्या घरी गेला. येथे त्याने 30 लाखांची खंडणीसाठी चिठ्ठी आत फेकली आणि तेथून पळ काढला. या पत्रकात त्यांनी धार्मिक घोषणाही लिहिल्या होत्या, त्यामुळे पोलिसांचा अधिकच गोंधळ उडेल.

रचिताच्या घरात घडलं सगळं नाट्य

कुशाग्रची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मात्र पोलिसांनी आता सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली आहे. तसेच या संदर्भात काही लोकांचीही चौकशी करण्यात येत आहे. सध्या कुशाग्रच्या ट्यूशन शिक्षिका रचिताचे नाव पुढे आले आहे. काही दिवसांपूर्वी रचिता कुशाग्रला घरी येऊन त्याच्या शिकवण्या घेत होती. मात्र काही दिवसांनंतर तिला घरात येणं बंद केलं होते. या प्रकरणी रचिताला पोलिसांनी ताब्यात घेताच तिने प्रभातचेही नाव घेतले आहे. त्यामुळे आता या दोघांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

हे ही वाचा >>Maratha Protest: जाळपोळ भोवणार; फडणवीसांनी म्हणाले, “त्या आंदोलकांवर जीवे…”

सीसीटीव्हीनं सगळं दाखवलं

तपासला सुरुवात करताना या दोघांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र सीसीटीव्हीमध्ये सगळं चित्र स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी माहिती सांगण्यास सुरुवात केली. खंडणीसाठी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रभातचेच अक्षर असल्याने त्यांच्यावरील संशय बळावला होता. त्यामुळे पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्हा कबुल केला.

शिक्षिका-विद्यार्थ्याचे प्रेम?

कुशाग्रचे आपल्या शिक्षिकेबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयातूनच प्रभातने त्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी खंडणीची मागणीचे नाटक केले होते असंही यावेळी पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सीटीव्हीमध्ये घडलेला प्रसंग सांगताना म्हणाले की, कुशाग्र स्वतः रचिताच्या घरी गेल्याचे दिसत आहे. त्यानंतर रचिताचा प्रियकर प्रभात घरी येतो, त्यामध्ये रचिताच्या प्रियकराचे घर तिच्या घराजवळच आहे. मात्र नंतर ज्यावेळी दोघंही बाहेर येतात, तर त्यावेळी कुशाग्र बाहेर येताना दिसत नाही. त्यामुळे त्याची घरातच हत्या झाली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी मात्र याबाबत अजूनही कोणताही खुलासा केला नाही.

हे ही वाचा >> Maratha Reservaton Live : धुळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या फलकाला फासलं काळं

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज