2000 मुली, 6 मसाज पार्लर, अय्याशीत जगलेला सेक्स किंग, आता भोगतोय...
Sex King: जगात काही लोकांविषयी अनेक किस्से सांगितले जातात. कारण काही माणसं ही त्यांच्या आयुष्यात जे करायचे आहे तेच करत असतात. मात्र शेवटी त्यांच्या हाती येतं काय तर फक्त पश्चात्ताप. सेक्स किंग (Sex King) म्हणून ज्यांची जगात ओळख आहे, ते चुविट कामोलविजिट (chuvit kamolvisit) आता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत. सगळं आयुष्य ऐशोआरामात घालवणाऱ्या चुविट कामोलविजिटला आता पश्चात्ताप होत आहे. त्याला पश्चात्ताप होत आहे की तो आपलं जीवन कसा जगला, त्या गोष्टींचा होतो आहे पश्चात्ताप. वर्षानुवर्षे केलेल अवैध धंदे (Illegal businesses), मुली (girls), सेक्स (Sex), भ्रष्टाचार (corruption) आणि अनेक गोष्टींचा आता त्याला पश्चात्ताप होतो आहे.
आयुष्य दोन नंबरच्या धंद्यात
जगात चुविट हा सेक्स किंग म्हणून प्रसिद्ध असला तरी थायलंडमधील लोकं आजही त्याला भ्रष्टाचार संपवणारा खरा हिरो असच समजतात. चुविटला खरी ओळख मिळाली ती 2003 नंतरच. चुविट अनेक वर्षापासून अवैध धंद्यातच गुंतला होता. थायलंडमध्ये वेश्याव्यवसाय हा बेकायदेशीर मानला जातो मात्र चुविटने त्या धंद्याचाही आपल्यासाठी फायदा करुन घेतला. कारण बँकॉकमध्ये त्याचे 6 मसाज पार्लर होते, ज्यामध्ये 2 हजार पेक्षा जास्त मुली काम करत होत्या. तो दोन नंबरच्या धंद्यात असल्यामुळेच थायलंडमधील पोलीसही त्याच्या हातातील बाहुले झाले होते.
हे ही वाचा >> Viral Video: हेलिकॉप्टरने उतरले अन् जहाज केलं हायजॅक, Israel ला थेट आव्हान?
सेक्स किंग चुविट
चुविट कामोलविजिट हा भ्रष्टाचारासाठी इतका प्रसिद्ध होता की, आपले गुन्हे लपवण्यासाठी पोलिसांना तो पिशव्या भरुन पैसे पाठवत होता. आपले काळे धंदे लपवण्यासाठी पोलिसांना तो रोलेक्स घड्याळे काय किंवा मसाज पार्लरमधील मुली असो या सेक्स किंगने पोलिसांसाठी पाहिजे त्या गोष्टी केल्या आहेत. चुविट सांगतो की, त्याने 1 हजार पेक्षा अधिक पोलिसांना लाच दिली होती, आणि हे कित्येक वर्षे चालूच होते असंही तो सांगतो. मात्र 2003 मध्ये सेक्स किंग चुविटला पोलिसांना अटक केली आणि त्याचे अनेक गुन्हे उघड झाले. त्यानंतर मात्र महागड्या कारमधून फिरणारा आणि अलिशान बंगल्यात राहणारा हा सेक्स किंग नंतर थेट तुरुंगात पोहचला होता.
हजारो पोलिसांना दिली लाच
ज्या सेक्स किंगने हजारो पोलिसांना लाच दिली होती, त्यातील एकही पोलीस नंतर त्याच्या मदतीला आला नव्हता. त्यामुळे तो तुरुंगात गेल्यानंतर मात्र त्याचं आयुष्य सगळच बदलून गेले होते. मात्र जेव्हा तो तुरुंगातून बाहेर आला त्यावेळी मात्र त्याने टीव्ही शोच्या माध्यमातून चुविटने आपल्या आयुष्यातील वास्तव सांगण्यास सुरुवात केली, मात्र तोपर्यंत त्याच्या आयुष्याची कोणालाच काही कल्पना नव्हती.
भ्रष्टाचारविरुद्ध नायक
जगभर सेक्स किंग म्हणून ओळख असलेला चुविट ज्यावेळी तुरुंगातून बाहेर आला त्यावेळी मात्र त्याने भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला. देशातील भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत त्याने भरीव कामगिरी करणाऱ्या पोलिसांनाही त्यांनी त्याची माहिती देण्यास सुरुवात केली.त्यानंतर चुविटने त्यांच्या देशाच्या राजकारणातही प्रवेश करुन त्याने स्वतःचा वेगळा पक्ष काढला. आणि त्यानंतर तो 2005 मध्ये खासदारही झाला होता. त्यामुळे तो कधी सेक्स किंग तर कधी भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा नायक, त्यामुळे त्याचे तुरुंगात जाण्याआधीचे आयुष्य आणि नंतरचे त्याचे आयुष्य सगळंच साऱ्यांसाठी आश्चर्यकारक होते.
भूतकाळ फक्त दुःखाचा
आपल्या 62 वर्षाच्या आयुष्यात अनेक अनुभव घेतलेला सेक्स किंग चुविट आता आपल्या भूतकाळाकडे पाहताना म्हणतो की, त्या सगळ्या गोष्टींचा मला आता अनुभव होतो. सध्या त्याला पश्चात्ताप होत असला तरी तो आता कॅन्सरग्रस्त झाला आहे. त्याला झालेला कॅन्सर आता तिसऱ्या टप्प्यात पोहचला आहे. त्यामुळे त्याच्याकडे आता फक्त 8 महिनेच असल्याचे त्याच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे आता हा सेक्स किंग आपल्या भूतकाळातील आयुष्याकडे पाहतो तेव्हा त्याच्याकडे पश्चात्तापाशिवाय काहीच नाही. वेश्याव्यवसायातून त्याने कोट्यधीश रुपये कमावले आहेत, मात्र आता त्याच्याकडे आता पैसे असल्याचे सुख नाही तर पश्चातापाचे फक्त दुःख आहे.