For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Crime : 16 वर्षाच्या मुलाने 22 वर्षांच्या गर्लफ्रेंडची केली हत्या, ठाण्यात नेमकं काय घडलं?

06:14 PM Nov 16, 2023 IST | प्रशांत गोमाणे
crime   16 वर्षाच्या मुलाने 22 वर्षांच्या गर्लफ्रेंडची केली हत्या  ठाण्यात नेमकं काय घडलं
thane crime story 16 year old boy murder 22 year old girlfriend police arrested two accu
Advertisement

Thane 16 year old boy murder 22 year old girlfriend : ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका 22 वर्षीय तरूणीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ज्या तरूणीची आरोपीने हत्या केली ती तरूणी त्याची प्रेयसी होती. त्यामुळे अल्पवयीन मुलाने आपल्याच गर्लफ्रेंडची हत्या का केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नेमकं दोघांमध्ये असं काय घडलं ज्यामुळे मुलाला तरूणीची हत्या करावी लागली? या सर्व गोष्टीचा तपास आता पोलीस करीत आहेत. (thane crime story 16 year old boy murder 22 year old girlfriend police arrested two accuse)

Advertisement Whatsapp share

पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांनी दिलेल्या माहितीनूसार, गेल्या 27 ऑक्टोबरला हाजी मलंग डोंगराजवळील रेल्वे रुळाजवळ एका 22 वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी यावेळी तरूणीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. यानंतर पोलिसांनी तरूणाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सूरू केले होते. या दरम्यान पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तरूणीची हत्या दोरीने गळा आवळून केल्याचे समोर आले. याचवेळी तरूणीची ओळख देखील पटली होती. तरूणी ही उल्हासनगरची रहिवाशी होती. आणि तिचे आऱोपीसोबत प्रेमसंबंध होते.

Advertisement

हे ही वाचा : Uddhav Thackeray: ‘जय भवानी-जय शिवाजी म्हणा अन् मतदान करा’, ठाकरेंनी केलं मोदी-शाहांना टार्गेट

पोलीस तपासात अल्पवयीन 16 वर्षीय मुलगा आणि 22 वर्षीय तरूणीचे अफेयर सूरू असल्याची माहिती समोर आली होती. या अफेयरची ज्यावेळेस मुलाच्या कुटुंबियांना माहिती मिळाली, त्यावेळी त्यांनी या नात्यास विरोध दर्शवला. कारण तरूणी ही खालच्या जातीची होती. याच कारणामुळे आरोपी मुलगा त्याचे वडील आणि वडिलांच्या मित्राने तरूणीच्या हत्येचा कट रचला.

Advertisement सब्सक्राइब करा

प्रियकराच्या वडिलांनी आणि मित्राने मिळून दोरीच्या सहाय्याने तरूणीचा गळा आवळून तरूणीची हत्या केली. या हत्येनंतर मृतदेह ट्रॅकनजीक फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणात आता अल्पवयीन मुलगा व त्याच्या साथीदाराला 7 नोव्हेंबर रोजी बिहारमधून अटक केली होती. अल्पवयीन मुलीचे वडील अद्याप फरार आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे ही वाचा : Mohammed Shami: तीन वेळा आत्महत्येचा विचार… संघर्षातून असा घडला मोहम्मद शमी!

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज