For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

ब्रह्मकुमारी आश्रमात सख्खा बहिणींनी संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये आसाराम बापूचा उल्लेख

12:32 PM Nov 11, 2023 IST | प्रशांत गोमाणे
ब्रह्मकुमारी आश्रमात सख्खा बहिणींनी संपवलं जीवन  सुसाईड नोटमध्ये आसाराम बापूचा उल्लेख
two sister commit suicide in brahma kumari ashram agra uttar pradesh crime story
Advertisement

Two Sister Commit Suicide : आग्र्यातील प्रजापती ब्रम्हकुमारी आश्रमात दोन सख्या बहिणींनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकता आणि शिखा असे आत्महत्या केलेल्या दोन बहिणींची नाव आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ माजली आहे. घटनास्थळी पोलिसांना एक तीन पानी सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये मृत बहिणींनी त्यांच्या आत्महत्येस (Suicide) संस्थेच्या चार जणांना जबाबदार धरले आहे. यामध्ये तीन पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी या सुसाईड नोटवरुन आरोपींचा शोध सुरू केला आहे. (two sister commit suicide in brahma kumari ashram agra uttar pradesh crime story)

Advertisement Whatsapp share

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) ही घटना घडली आहे. उत्तरप्रदेशच्या आग्र्यातील जगनेर येथे प्रजापती ब्रम्हकुमारी नावाचे आश्रम आहे. या आश्रमात एकता आणि शिखा यांनी 8 वर्षांपूर्वी ब्रह्मा कुमारीमध्ये दीक्षा घेतली होती. दीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी जगनेर येथे ब्रह्मा कुमारी केंद्र बांधले होते, ज्यामध्ये दोघेही राहत होत्या. या दोन्ही सख्या बहिणींनी आता आश्रमात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

Advertisement

हे ही वाचा : Ashish Shelar : ‘सलीम-जावेद मोठे असतील, पण मराठी कलाकार…’, भाजपाचा राज ठाकरेंना टोला

दोन्ही बहिणींचा भाऊ सोनूने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 11.18 च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी दोन्ही बहिणींनी आश्रम ग्रुपवर सुसाईड नोट टाकली. त्यांना फोन करून एकता आणि शिखा यांच्या सुसाईड नोटची माहिती देण्यात आली होती. अचानक बहिणींच्या सुसाईड नोटची माहिती मिळाल्यानंतर सोनू 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या आश्रमात धावला. त्यांने खोलीचा दरवाजा उघडला असता त्यांना दोन्ही बहिणी लटकलेल्या अवस्थेत दिसल्या.दोन दिवसांपूर्वी सोनूने आश्रमात येऊन दोन्ही बहिणींची भेट घेतली होती. या भेटीनंतर दोघांमध्ये संभाषण सुरु होते. मात्र दोन्ही इतकं टोकाचं पाऊल उचलतील याची कल्पना देखील नव्हती असे सोनू म्हणतो.

Advertisement सब्सक्राइब करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी तीन पानी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती, ज्यामध्ये त्यांनी आत्महत्येसाठी संस्थेच्या चार जणांना जबाबदार धरले होते. या चारही आरोपींवर पैशांचा अपहार तसेच अनैतिक कृत्ये केल्याचा आरोप आहे. तसेच आसाराम बापूप्रमाणे आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षा करावी अशी मागणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सुसाईड नोटमधून बहिणींनी केली आहे.

हे ही वाचा : PF interest : पीएफ धारकांना दिवाळी भेट! खात्यावरील व्याजासंदर्भात सरकारने दिली मोठी अपडेट

आत्महत्या केलेल्या दोन बहिणींच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलींच्या मृत्यूसाठी आश्रम कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपल्या मुलींना मृत्यूच्या उंबरठ्यावर आणणाऱ्या आश्रमातील कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाईल. आरोपींमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.चारही आरोपी आग्रा बाहेरील आहेत, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर दोघांचा शोध सुरु आहे, असे पोलीस अधिक्षक खैरागडे यांनी सांगितले आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज