For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

हात जोडले, किंचाळत राहिली पण...; 25 वर्षीय तरुणीसोबत चार जणांचं सैतानी कृत्य, व्हिडीओ व्हायरल

09:37 AM Nov 13, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
हात जोडले  किंचाळत राहिली पण     25 वर्षीय तरुणीसोबत चार जणांचं सैतानी कृत्य  व्हिडीओ व्हायरल
Uttar pradesh Agra Crime News Gang Rape in Home Stay Hotel no one helped victim 5 Accused Arrested
Advertisement

Crime News : भयंकर... संतापजनक.. हे शब्दही कमी पडावेत अशी घटना समोर आलीये. एका 25 वर्षीय तरुणीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला. आग्रा (Agra) येथील होम स्टे हॉटेलमध्ये ही घटना घडली. आरोपींमध्ये एक तरुणीचा मित्र असून, त्याच्यासह पाच जणांनी तिला आधी दारू पाजण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर तिला मारहाण केली आणि नंतर आळीपाळीने अत्याचार केले. नराधमांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी तरुणी किंचाळत राहिली. तिच्या आवाजाने परिसरातील लोक हॉटेल बाहेर जमा झाले आणि त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. (Uttar pradesh Agra Crime News Gang Rape in Home Stay Hotel no one helped victim 5 Accused Arrested)

Advertisement Whatsapp share

आरोपींच्या जबरदस्तीमुळे घाबरलेल्या पीडित महिलेला जागेवरच लघवी झाली. पीडित महिलेसोबत होम स्टेमध्ये चार तरुणांनी हा गुन्हा केला. तिने या सर्वाला विरोध केल्यावर तिला ओढून मारहाणही केली.

Advertisement

वाचा : अनैतिक संबंधातून पतीसोबत भयानक कांड, झोपेत गळा घोटला, मृतदेहाचे तुकडे तुकडे…

महिलेचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. तिला जबरदस्तीने खोलीत नेऊन अमानुष मारहाण केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.

Advertisement सब्सक्राइब करा

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल होम स्टेमध्ये चार तरुण आणि एक महिला अशा पाच जणांनी पीडितेला जबरदस्तीने दारू पाजली आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेचे वय सुमारे 25 वर्षे आहे. तिने सांगितले की, याआधी तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवण्यात आला होता आणि त्याबद्दल तिला ब्लॅकमेल केले जात होते. आरोपींनी तिच्या डोक्यात काचेची बाटलीही फोडली होती. ताजगंज पोलीस स्टेशन हद्दीतील ताजनगरी फेज 2 मध्ये हे हॉटेल होम स्टे आहे.

वाचा : OBC नोंद असलेला शरद पवारांचा दाखला व्हायरल, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

पीडित मुलगी गेल्या दीड वर्षांपासून होम स्टेमध्ये काम करत होती. पीडितेचा मित्र जितेंद्र त्याच्या चार मित्रांसह हॉटेलमध्ये पोहोचला आणि तिला जबरदस्तीने दारू पाजण्याचा प्रयत्न केला. या घटनेशी संबंधित व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Advertisement

महिला विनवणी करत राहिली पण कोणी ऐकले नाही

एका व्हिडीओमध्ये पीडित मुलगी खोलीच्या बाहेर जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसत आहे, शेजारी एक तरुण उभा आहे आणि ती त्याला सांगत आहे की तिला लहान मुली आहेत. पीडिता अत्याचार केल्याचा आरोप करत वारंवार मदतीसाठी विनवणी करत होती.

काही तरुण तिला पकडून बाहेर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या व्हिडीओमध्ये एक तरुण पीडित महिलेला जबरदस्तीने पकडून ठेवत आहे. पीडित तरुणी हात जोडून जीव वाचवण्यासाठी सतत भीक मागत आहे पण तो तिला जमिनीवर ओढून दुसरीकडे घेऊन जात आहे.

वाचा : Crime : संतापलेल्या पतीने डोक्यात प्रेशर कुकर घातला, पत्नीचा जागीच गेला जीव

सर्व आरोपींना अटक

या घटनेबाबत एसीपी सदर अर्चना सिंह यांनी सांगितले की, ताजगंज पोलिसांना बसई चौकी परिसरातील होम स्टेमध्ये बलात्कार आणि मारहाणीची घटना घडल्याची माहिती मिळाली होती. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे घटनेची दखल घेत बलात्कार, प्राणघातक हल्ला आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत चार पुरुष आणि एका महिला असे पाच आरोपी आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज