For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Husband-Wife: पत्नीचे अनैतिक संबंध, पती बनला सैतान; संपूर्ण कुटुंबालाच...

06:31 PM Nov 20, 2023 IST | mahadev kamble
husband wife  पत्नीचे अनैतिक संबंध  पती बनला सैतान  संपूर्ण कुटुंबालाच
प्रेमप्रकरणामुळे वैतागलेल्या वृंदावन कर्माकर याने हे सगळं संपवण्याचाच निर्णय घेतला. तो स्वतःच इतका वैतागलेला की, त्याच्यामुळे त्याची पत्नीही त्याला वैतागलेली. त्यामुळे वादाला सुरुवात होण्याआधी त्याने आपल्या पत्नीची खूप समजूतही काढली. मात्र पत्नीने तिच्या प्रेमप्रकरणातून काही माघार घेण्याची तयारी दर्शवली नाही.
Advertisement

Family Murder: पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह पोलिसांना मिळाले असले तरी अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.  पश्चिम बंगालमधील 52 वर्षाचे असलेले कापड व्यापारी (cloth merchant) वृंदावन कर्माकर आपल्या कुटुंबासोबत एका फ्लॅटमध्ये राहत होते. कापड व्यापार करणाऱ्या कर्माकर यांचे अगदी सगळं काही सुरळीत चालले होते. त्यांचा व्यवसायही अगदी चांगल्या पद्धतीने चालला होता. त्यामुळे  त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ताही होती. मात्र काही दिवसांनी त्यांच्या कुटुंबामध्ये ताणतणाव निर्माण झाला. कारण होतं वृंदावन कर्माकर यांची पत्नी. तिच्यामुळेच सगळं कुटुंबच तणावग्रस्त झाले होते.

Advertisement Whatsapp share

पत्नी प्रेमात झाली आंधळी

देवश्री कर्माकर ही वृंदावन कर्माकर यांची पत्नी. तिच्या वागण्यामुळे सगळं कुटुंबच ताणतणावत होते. देबश्री ही कोणाच्या तरी प्रेमात पडली होती. ती प्रेमात आणि हळू-हळू ती त्यामध्ये वाहवतही गेली. देवश्री प्रेमात अकंठ बुडाल्याचे लक्षात यायला नवऱ्याला वेळ लागला नाही. त्यानंतर तिच्या त्या प्रेमप्रकरणामुळे त्या दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. ही ही गोष्ट त्यांच्या मुलांपासूनही लपून राहिली नाही. देवश्रीच्या प्रेमप्रकरणामुळे पतीसह आता तिची मुलंही नाराज दिसू लागली.

Advertisement

नवऱ्याच्या डोक्यात सैतान घुसला

देवश्रीचे प्रेमप्रकरणामुळे वैतागलेल्या वृंदावन कर्माकरने तिला संपवण्याचाच निर्णय घेतला. कारण तो स्वतःच इतका वैतागलेला की, त्याच्यामुळे त्यांच्या दोघांमध्येही वाद सुरु झालेले. या वादाला सुरुवात होण्याआधीच त्याने एकदा आपल्या पत्नीची समजूतही काढली होती. मात्र पत्नीने प्रेमप्रकरणातून काही माघार घेतली नाही. त्यामुळेच त्याने थंड डोक्याने एक प्लॅन आखला, तो प्लॅन होता पत्नीला संपवण्याचा.

Advertisement सब्सक्राइब करा

शांत डोक्यानं कट रचला

पत्नीला संपवण्याचं चक्र डोक्यात सुरु झाल्यानंतर मात्र त्याने मनाशी खूनगाठ बांधली. त्यामुळे त्याने पहिल्यांदा आपल्या पत्नीला अन्नातून विष घातले. पत्नीला विष घातल्यानंतर त्याच्या डोक्यात पोलीस, त्याच्या मुलांचा विचार येण्यास सुरुवात झाली. पत्नीला विष घातल्यामुळे पोलीस आपल्याला पकडणार, घराची बदनामी होणार, लोकं मुलांना बोलणार, त्यांना प्रश्न विचारणार अशा अनेक प्रश्नांच्या गर्तेत वृंदावन अडकून पडला.

हे ही वाचा >> धक्कादायक… मुंबईत सुटकेसमध्ये सापडला मुलीचा मृतदेह, कशी केली हत्या?

मुलांनाही पाजले विष

या सगळ्यातून सुटका करुन घ्यायची असेल तर एकच पर्याय त्याला दिसू लागला. ते म्हणजे त्याने आपल्या मुलांनाही संपवण्याचा कट रचला. त्याला वाटले की, मुलांनाही संपवलं तर हा सगळाच प्रश्न संपण्यासारखा आहे. त्यामुळे त्याने 17 वर्षाची देवलीना आणि 8 वर्षाचा मुलगा उत्सव त्यालाही त्याने विष दिले. मात्र आता मुलांना विष पाजले गेले की, ती स्वतः मरायला तयार होती असाही सवाल उपस्थित होऊ लागला आहे. पत्नी, दोन मुलांना संपवून वृंदावन कर्माकरने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसही आता तर्कवितर्क लढवत आहेत की, पोलिासांच्या भीतीने आणि बदनामीमुळे त्याने हे पाऊल उचलले असल्याचा संशयही व्यक्त होऊ लागला आहे.

Advertisement

वृंदावनही केला शेवट

या सर्व घटना कधी घडल्या हे आता शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मुलांना विष पाजले गेले की, त्यांनी स्वतःहून ते घेतले ही गोष्टही आता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कर्माकर कुटुंबीयांच्या मृत्यूमुळे आता अनेक सवाल उपस्थित केले गेले आहेत. वृंदावनचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला होता, तर अन्य तीन मृतदेह घरात वेगवेगळ्या ठिकाणी सापडले होते.

फ्लॅटमध्ये सडले मृतदेह

कर्माकर कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी फोन केल्यानंतर वृंदाबन यांच्याकडून कोणताच प्रतिसाद देण्यात आला नव्हता. तर त्यांच्या बंद फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांकडून ही माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी येऊन त्यांच्या घराचे दार तोडून आतामध्ये प्रवेश केल्यानंतर सगळ्यांचे मृतदेह बघून पोलिसांसह त्यांच्या नातेवाईकांनाही धक्का बसला.

हे ही वाचा >> संजय राऊतांकडून ‘कसिनो’तला फोटो ट्वीट, चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज